#drishyam3 #nospoilers
माणूस आपल्या कुटुंबाला वाचवण्यासाठी कोणत्याही मर्यादेपर्यंत जाऊ शकतो, हा base आणि हा सिनेमा आहे, timepass म्हणून बघा आणि सोडून द्या, हे गृहितक मान्य करूनही दृश्यम ३ या भागातल्या काही गोष्टी पटल्या नाहीत.
अक्षय्य खन्ना ऐवजी नवीन पात्र आणले आहे जयदीप अहलावत चे. अर्थात त्याची grand entry, पुढे त्याचा swag establish करणे गरजेचेच होते. खुद्द त्याचा screen presence अत्यंत भारी आहे. त्यामुळे त्याला एखादा वाक्प्रचार, विशिष्ट लकब किंवा एखादी accessory दिली असती तरी चालले असते. पण त्याला काय दिले, तर सिगारेट! सिनेमाभर, गरज असो - नसो तो सतत फुंकत आहे. ते smoking डोक्यात गेले! सपोज तो फुंकत नसता तर काय बिघडले असते? त्याने त्याच्या character ला काहीच फरक पडला नाहीये. अशाने smoking ला सर्वमान्यता दिल्यासारखे होते. भारीवाला पोलिस व्हायचे असेल, तर दारू आणि सिगरेटला पर्याय नाही, हे soft marketing होत असते!
आणि सगळ्यात मोठा concern... 'आपला मुलगा चुकला होता', हे तीन चित्रपटांमध्ये मिळून एकदाही मीरा देशमुख मान्य करत नाही!!!
फक्त, सॅम मारला गेला आणि विजयने तो खून पचवला हा एकच जप करते. सॅम का मारला गेला? तो अपरात्री तिथे काय करत होता? मान्य आहे, की खून हे उत्तर नाही. पण त्या मुलीकडूनही स्व संरक्षणातून ते कृत्य झाले. तो तिथे नको ते उद्योग करायला गेला नसता, तर आजही जिवंत असता! याची जाणीव किमान तिसऱ्या भागात तरी दोन वाक्यात तिला करून द्यायला हवी होती लेखकांनी. कसला न्याय हवा होता तिला? बये तुझ्या पोझिशन आणि पैशाचा गैरवापर करून तुझं कार्ट गैर उद्योग करत होतं, याचा एकदा तरी खेद व्यक्त करशील??
या दोन्ही चुका मी लेखकांच्या पारड्यात घालेन. सिनेमा भारी करताना डायलॉग, दिग्दर्शन सगळं महत्त्वाचं आहेच, पण त्या बरोबर याही गोष्टी केल्या असत्या, तर सिनेमाची उंची अधिक वाढली असती.
लोकांना दुसरा भाग आवडला नव्हता. माझ्या मते, तो best जमून आला होता. त्यात विजय सॅमच्या वडिलांचे दुःख जाणती आणि त्यांना व्यवस्थित closure देतो. शिवाय, आपल्यावरचे बालंटही धुवून काढतो. तेच conclusion योग्य होतं.
(आता त्या सांगाड्यांचा जो काही घोळ घातला आहे, की ज्याचं नाव ते! 
)
कीर्तन ऐकून माणूस सुधारत नाही आणि तमाशा पाहून बिघडत नाही, असं म्हणतात. पण कित्येक वर्षांपासून व्यसनांना आणि गैरकृत्यांना सिनेमातून आणि आता web series मधून सतत glorify केलं जात आहे. कथा, पात्र यांमध्ये वेगळेपण आणण्यासाठी लेखक, दिग्दर्शक प्रयत्न करतात, मग clean comedy, clean taking साठी का नाही करत? त्यावरून तमाशा पाहून लोक नाहीत, तरी सिनेमाकर्ते बिघडले आहेत, असं conclusion आपण का काढू नये?
****

0 comments:
Post a Comment