Showing posts with label स्वागत. Show all posts
Showing posts with label स्वागत. Show all posts

May 16, 2007

स्वागत आहे...

नमस्कार! माझ्या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत!!

कथालेखनात मी नवीनच! २००६ मधेच लिहायला सुरुवात केली मायबोली.कॉम या वेबसाईटवर. सुरुवात तशी दबकत दबकतच केली, पण लोकांनी कथा वाचल्या, प्रतिक्रिया दिल्या आणि मला लिहायला हुरुप मिळाला, थोडा आत्मविश्वासही आला.

मी लिहिलेल्या कथा काही उच्च साहित्यिक दर्जाच्या नाहीत. आजूबाजूला ज्या घटना घडतात, तेव्हा त्यातली पात्रं कशी वागू शकतील हेच मी सांगायचा प्रयत्न करते- अर्थात माझ्या दृष्टितून! त्यातून कोणाला उपदेश करायचा अथवा संदेश द्यायचा हेतू नाही. साधंसरळ लेखन आहे, ते गोड मानून घ्याल अशी इच्छा आहे.

या ब्लॉगवर पूर्वी मायबोलीवर लिहिलेल्या कथा, ललित आहेतच. त्याबरोबर नव्या कथा, ललित इत्यादी लिहायचा मानस आहे. तुम्ही ते वाचाल, तुम्हाला ते आवडेल अशी अपेक्षा ठेवते. तुमच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्यासाठी लेखन जितकं महत्वाचं आहे, तितकच हे सुद्धा जाणून घेणं की लोकांना ते आवडतय की नाही...

वाचून जे काही वाटलं ते अवश्य कळवा, सुधारणा सुचवा, काही खटकलं तर तेही!

तुमचं पुन्हा एकदा इथे मनापासून स्वागत!
येत राहा...

पूनम