August 6, 2026

वाचनव्रत - माझ्या कथेचे अभिवाचन

 लेखन आणि अभिनय यात कमालीची व्यग्र असलेली सुप्रसिद्ध अभिनेत्री, लेखिका मुग्धा गोडबोले अनेक उपक्रमही चालवते. त्यातला एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे "वाचनव्रत". Screen entertainment चा भडीमार होत असताना लोकांना परत पुस्तकांच्या वाचनाकडे वळवण्यासाठी तिने हा स्तुत्य उपक्रम सुरू केला आहे.

मुग्धा माझी, आजच्या भाषेत सांगायचं, तर "favourite person" आहे 😊 "कथापौर्णिमा" या माझ्या कथासंग्रहाचे प्रकाशन मुग्धाच्या हस्ते व्हावे अशी माझी फार इच्छा होती. काही कारणाने तिला जमले नाही. पण माझ्या आयडॉल आणि मुग्धाची आई, ज्येष्ठ साहित्यिका मंगलाताई गोडबोले यांच्या हस्ते "कथापौर्णिमा"चे प्रकाशन झाले, असा दुधात केशर योग तेव्हा आला 🥰❤️

मुग्धाला "कथापौर्णिमा" देता आले नाही याची रुखरुख तेव्हापासून होती. पण आनंदाची गोष्ट अशी, की तिच्या "वाचनव्रत" या उपक्रमात मला "कथापौर्णिमा" मधल्या एका कथेचे वाचन करण्याची संधी तिने मला उपलब्ध करून दिली 😊 त्या कथावाचनाची लिंक खाली दिली आहे. जरूर ऐका. अभिप्राय तिथे लिहा आणि इथेही कळवा.

आणि, कथा ऐकून "कथापौर्णिमा" घ्यावेसे वाटले, तर माझ्याशी कधीही संपर्क साधू शकताच! 😊🙏



https://youtu.be/Cl6ZBQfw7cM?si=f7WjKkDhmAs-dPD- 

ही युट्युबची लिंक कॉपी करून दुसऱ्या विंडोमध्ये पेस्ट करा, म्हणजे तुम्ही थेट कथावाचनाच्या व्हिडिओवर जाल. अन्यथा, थेट मुग्धा गोडबोलेच्या युट्युब चॅनलवर जा, तिथे "वाचनव्रत"चे अनेक व्हिडिओ तुम्हाला दिसतील. त्यातच माझाही आहे, वाचनव्रत, भाग क्र. ८३ :) 
 
हीच लिंक मी कॉमेन्ट्समध्येही पेस्ट करत आहे, तिच्यावरही तुम्ही क्लिक करून कथा ऐकू शकता. 

1 comments:

poonam said...

https://www.youtube.com/watch?v=Cl6ZBQfw7cM