"भव्य", "विशाल", "hugeness", "awesomeness", "celebration", "splurge", "देखणेपण", "श्रीमंती", "राजेशाही थाट", "रुबाब" या शब्दांचा अर्थ #हंपी मध्ये "विठ्ठल मंदिर" परिसरात समजतो!!
Like, seriously WOW!! 
अतिशय प्रसिद्ध, कमालीचं देखणं, वैविध्यपूर्ण, सौंदर्यपूर्ण, कल्पनाशक्तीचं प्रत्यक्ष रूप असलेला तो पूर्ण परिसर... मुख्य शिखर, मुख्य मंदिर, तो जगप्रसिद्ध दगडी रथ, संगीत मंडप, सभा मंडप, निरनिराळ्या मंदिरातले असंख्य खांब, त्यावर कोरलेले विष्णूचे अवतार, संपूर्ण रामायण कथा, गणपतीची चित्र, माणसं, बाया, लहान मुलं, घोडे, सिंह, अनेक repeat patterns... काय कलाकार असतील हे! काय कसबी हात असतील त्यांचे! केवढं वैविध्य, केवढं सातत्य आणि एकसारखं निर्दोष काम! अबब! खरोखर hats off, salute to them 


तितकंच सुंदर आहे विरूपाक्ष मंदिर. भव्य, उंच प्रवेशद्वार, आतला देखणा कळस, छतावरची नैसर्गिक रंगातली चित्र आणि त्यांची रूपकं, खांबावरची शिल्पकला, पुष्करणी... सगळंच सुंदर
या मंदिरात शिवलिंगाची पूजा होते, गर्दी ठिकठाक होती, त्यामुळे आम्हाला जवळून दर्शन घेता आलं
त्याचबरोबर जवळ जवळ विखुरलेल्या महा-नरसिंह, महादेवाची महा-पिंड, एका शिळेतला महा-गणपती यांच्या भव्य मूर्ती, बाळकृष्ण मंदिर, हजारीराम मंदिर यांच्यातलं कोरीवकाम, राजसदरेची भव्यता, लोटस महालाची symmetry पाहून थक्क झालो 

ही अतिशय प्रसिद्ध ठिकाणं आहेतच. पण "किष्किंधानगरी" मधला शबरीचा तलाव, तिची गुहा, अनेगुंडी किल्ला, त्यातली छोटी मंदिरं, बाली आणि सुग्रीवाची गुहा, चिंतामणी मठ, त्यातली रामाची गुहा आणि या सर्वांना कवेत घेऊन वळसे घालत जाणारी तुंग्रभद्रा नदी... हंपीचा हा भागही आम्हाला अतिशय आवडला
मोठमोठ्या शिळांमुळे तयार झालेल्या नैसर्गिक गुहा, त्यातला छाया प्रकाशाचा खेळ, अंधारे बोळ, छोटी कुंड, तलाव आणि त्यांना जोडलेल्या पुराणकथा ऐकायला भारी वाटलं 
आणि अनेक छोट्या टेकडांपैकी कोणत्याही टेकडीवरून दिसणारा अप्रतिम सूर्यास्त म्हणजे cherry on the cake!
Coracle ride नावाचं साहस पण आम्ही इथेच अनुभवलं, फार फार मजा आली
आमचा नावाडी फार हौशी होता, धारेचा थरार, आडवळणावरचे संथ पाणी, जंगल हे सगळं त्याने फिरवलं. इथेच आम्ही शांततेचा आवाज "ऐकला" 
अंजनाद्री मंदिर तेवढं राहिलं 
No wonder, Hampi is very very popular and world famous. It ought to be









0 comments:
Post a Comment