पहिल्या फोटोत कुटुंबासहित जी उभी आहे, ती आहे ग्रेट ब्रिटनची हेलन ग्लोव्हर, आत्ता पॅरिस ऑलिम्पिक्समध्ये २ ऑगस्ट, २०२४ला तिने रोइंगच्या विमेन्स ४ या स्पर्धेत रजतपदक मिळवलं
दुसऱ्या फोटोत ज्या दोन मुली दिसत आहेत, त्या आहेत न्यु झीलंडच्या लुसी स्पूअर्स आणि ब्रुक फ्रान्सिस. त्यांनीही रोइंग या क्रीडाप्रकारात महिलांच्या स्कल्स प्रकारात सुवर्णपदक मिळवलं
या तिघींमध्ये आणखी एक गोष्ट समान आहे, तिघीही वयाच्या तिशीत आहेत आणि माता आहेत लुसी आणि ब्रुकची मुलं तर दोन वर्षाच्या आतली आहेत आणि हेलनला दहा वर्षाच्या आतली तीन मुलं आहेत. तिघींचीही मुलं त्यांना चिअर करायला काठावर उभी होती, स्पर्धा खेळताना त्यांची मुलं हीच त्यांची प्रेरणा असते, असंही त्या अभिमानाने सांगतात
आपलं स्त्रीत्व त्यांनी लपवलं नाही, मातृत्व नाकारलं नाही आणि स्वत:ची ओळख असलेला खेळही जपला, ऑलिंपिक पातळीचा खेळ खेळून पदकं मिळवली.
This is womanhood at its perfect best.
0 comments:
Post a Comment