July 18, 2024

मौन/ Silence

#PCWrites एका मासिकाने #मौन #Silence या विषयावर लेखन मागवले होते. तेव्हा मी हे लिहिले होते. प्रत्येक मुलीला, तरुणीला, स्त्रीला बोलायला निसर्गत:च आवडते, पण पुढे ती बोलेनाशी होते, अबोल होते, गप्प होते, ते का? हे मांडायचा हा माझा प्रयत्न, मराठी आणि इंग्रजीतही.

माझा आवडता #शतशब्द #100words format या साठी मुद्दामच निवडला, कारण “मौना”वर लिहिताना तरी शब्दबंबाळ होऊ नये!  

****

 

चूप

“आता हिचे प्रश्न होतील सुरू!” कोणीतरी कुत्सितपणे म्हणायचं.

“किती प्रश्न विचारतेस गं? गप जरा.” कोणीतरी वैतागून म्हणायचं.

“शूऽऽऽ, गप्प बस”, कोणीतरी दटावायचं.

“ए बाई, तुझे प्रश्न नकोत हं”, कोणीतरी तिचं तोंड बंद करायचं.

“आली चालती-बोलती ’प्रश्नावली’”, कोणीतरी हिणवायचं.

प्रश्न विचारलेले आवडत नाहीत लोकांना हे हळूहळू तिच्या लक्षात आलं. मनातली शंका विचारलेली, चुकीच्या प्रश्नाला प्रतिप्रश्न केलेला, आरोप ऐकून न घेतलेला, प्रतिवाद केलेला लोकांना पचत नाही, कारण त्यांच्याकडे उत्तरं नसतात. निरुत्तर झाले, की लोक टोमणे मारतात, विषयाला फाटे फोडतात, गैरसमज करून घेतात, क्वचित हिंसाही करतात हे तिला कळलं.

हळूहळू ती गप्प झाली.

मग ते विचारायला लागले, “हल्ली तू बोलत नाहीस?!”

 

*******

 

Quiet

“Yes, let the questions begin.” Someone would make a snide comment.

“Oh! You and your questions!” Someone would admonish her.

“Shut up.” Someone would say.

“No questions.” Someone would stop her mid-way.

“Here comes ‘Miss Questionnaire’”. Someone would taunt her.

People don’t like questions; she realized over time. Clearing doubts, clarifying the wrong questions, dismissing wrongful accusations, cross questioning, etc. is not acceptable to people, because they don’t have answers. And hence they taunt, change the subject, mislead and sometimes resort to violence too.

She understood.

She became quiet.

And then they started asking, “Nowadays, you don’t say much?!”

*******

0 comments: