May 12, 2024

Mother's Day!

 

“आता पाच मिनिटं तो मोबाईल बंद ठेवून मी सांगते ते ऐक!”
कडक शब्दांमध्ये ऑर्डर दिल्यामुळे लगेच फोन उलटा ठेवण्यात आला. (बंद नसतो होत!)
“तर, आत्ता किती वाजलेत?”
“अं… ते सांगण्यासाठी मोबाईल बघावा लागेल”, क्षणार्धात उत्तर! 🙃
*** 
 
“तू संध्याकाळी जेवायला आहेस की नाही?”
“थोड्या वेळाने सांगतो.”
“त्यासाठी वेळ कशाला हवाय? ’हो’ किंवा ’नाही’ पटकन सांग आणि मला मोकळं कर.”
“अगं, आम्ही पाच जण आहोत. प्रत्येकाला त्याच्या आईला विचारून सांगायचं आहे. आणि तुला तर माहितच आहे… कोणतीही आई लगेच ’हो’ म्हणत नाही आणि ’नाही’ही म्हणत नाही. मग मी तुला लगेच ’हो’ किंवा ’नाही’ कसं सांगू?” 😝
 ***
केस जरा कापल्यासारखे दिसूदेत. मला जरा पैशाचा मोबदला मिळाल्याचं सुख मिळूदे. न्हाव्यालाही केस कापायचं सुख मिळूदे.”
“आई, मला सुख केव्हापासून मिळायला लागेल?” 😆😁
***
 
“तू माझ्याकडून काही शिकला आहेस की नाही आयुष्यात?”
“हो तर! शिस्त, खरे बोलणे, सतत काम करणे… मला जमणं जरा अवघडच आहे. आई तू ग्रेट आहेस!”
“मला खरंतर, फक्त “चहा” हे उत्तरही चाललं असतं. पण हेही शिकलास शाम? आता मी सुडोमिमो!” 😝
“आई, चहा हवा होता, तर तसं सांग ना. उगाच काय विचार करायला लावतेस मला!” 😐
***
 
आमच्यात हे संवाद वर्षभर सुरू असतात आणि रहावेत 😊 डोक्याला ताप असण्याचे दिवस तर रोजचेच आहेत, पण अशा जमकर होणाऱ्या टोलेबाजीमुळे तर नात्यात खरी मजा येते! 🥰
*****

Happy Mother's to all mothers. We all are in the same fight our entire lives. Cheers and have fun with kids as much as you can.

0 comments: