इंग्रजी
साहित्यात लेखनाचे अनेक प्रयोग होत असतात. Terribly Tiny Tales (TTT) हा त्यातलाच एक प्रकार. मराठीत त्याला ’अतीलघुकथा’
किंवा ’अलक’ म्हणतात. मराठीत शतशब्दकथा, अलक लिहितात लोक, पण प्रमाण कमी. मला लेखक
म्हणून हे असे प्रयोग करायला फार आवडतं. एक तर आपला साचा मोडून वेगळा विचार केला जातो,
त्यात जे आव्हान असतं, ते पेलता येतं का हे तपासून बघता येतं आणि जमलं लिहायला, तर
छानही वाटतंच की! 😄
आज
२७ फेब्रुवारी, मराठी राजभाषा दिवस. त्या निमित्तानं माझ्या या तीन अतीलघुकथा. कथा
लांबीने ’लघु’ असल्या, तरी आशय सखोल आहे. तुम्हाला आवडेल अशी आशा.
*****
१.
“तू मला कधीच विसरणार नाहीस ना?”, ती त्याच्या कानात कुजबुजली.
“कधीच नाही”, तो तिच्या फोटोचं चुंबन घेत म्हणाला.💔
***
२.
“तुमच्या लग्नाला ५० वर्ष झाली. तुमच्या सुखी संसाराचं रहस्य मला सांगाल का?”, बातमीदारानं उत्साहानं विचारलं.
“बघू”, पती म्हणाला.
“आत्ता नाही”, पत्नी म्हणाली.
😜😁
***
३.
“दारात रांगोळी, देवाची प्रसन्न पूजा, चंदनाची उदबत्ती, केसात गजरा, नवीन ड्रेस, जेवायला गोड… आज कोणता सण आहे?”, त्याने आश्चर्यानं विचारलं.
“आज
माझा वाढदिवस आहे”, शांतपणे हसून ती म्हणाली 😊
***
0 comments:
Post a Comment