“एखादी कथा सुरू केली, की पूर्ण होईपर्यंत चैन पडत नाही, पुढे काय असेल याची उत्सुकता वाटत राहते...”
“संवाद अतिशय ओघवते आहेत.”
“जणू काही माझ्यासमोर कथा घडत आहे, असं वाटत होतं.”
“आम्ही वेळा ठरवून संग्रह वाचतोय, नाहीतर भांडणं होत आहेत.”
“unputdownable!”
“कथापौर्णिमा” वाचून मला मिळालेल्या काही खऱ्याखुऱ्या प्रतिक्रिया!
गेली अनेक वर्ष मी सुट्या कथा लिहित आहे. पण कथासंग्रह काढताना “हे पुस्तक कोण आणि का वाचेल? यासाठी कोणी पैसे का खर्च करेल?” हा प्रश्न मीच मला विचारत होते. त्यामुळे, जेव्हा वाचकाने संग्रहावर खर्च केलेले पैसे त्याला ’वाया गेले’ असे वाटणार नाही, अशा कथा तयार झाल्या, त्यानंतरच संग्रह काढायचा, असं ठरवलं होतं. अर्थात, “मला” वाटत होतं, की कथा चांगल्या आहेत, संग्रहात वेगवेगळे विषय आहेत, वाचताना कंटाळा येत नाहीये, तेचतेच वाटत नाहीये...
पण वाचकांना वाटणं महत्त्वाचं होतं!
आणि, या आणि अशा अनेक प्रतिक्रियांमधून हेच प्रतीत होतंय, की “कथापौर्णिमा” वाचून वाचकांचे समाधान होतंय प्रतिक्रिया देणाऱ्यांमध्ये कुटुंबीय, मित्र-मैत्रीणी, नातेवाईक, परिचित यांचा समावेश आहेच, पण अनेक अनोळखी, केवळ वाचक असलेल्या स्नेहींकडूनही भरभरून कौतुक करणारे फोन, व्हॉट्सॅप मेसेजेस, ईमेल्स आल्या आहेत, येत आहेत. अनेकांनी केवळ माझ्या लेखनावर विश्वास ठेवून दिवाळी भेट, वाढदिवस भेट म्हणून “कथापौर्णिमा” घेतले आहे. काही जणांना मला प्रत्यक्ष भेटून काही कथांवर चर्चा करायची आहे, काहींनी माझ्या पात्रांच्या नावांचं,
कथांमधल्या तपशिलांचं खास कौतुक केलं, काहींनी मनापासून आशीर्वाद दिला- Truly grateful to them
एकूण कल असा दिसतोय, की विविध वयाच्या, विविध अनुभव घेतलेल्या लोकांना वेगवेगळ्या कथा आवडत आहेत. तरी, “होते कुरूप वेडे…” आणि “मनाचिये गुंती”ला सर्वाधिक वाचकपसंती मिळत आहे पण मला आणखी प्रतिक्रियांची उत्सुकता आहे. तुम्हाला एखादी कथा ’का’ आवडली हे मला सांगितलंत, तर मला फार आवडेल.
“कथापौर्णिमा” अधिकाधिक लोकांपर्यंत पोचावे, अशी माझी आणि प्रकाशक, रसिक आंतरभारती यांची इच्छा होती. तसे ते पोचत आहे, पण आणखी पोचायला हवे आहे. Amazon वर “Poonam Chhatre books” असा सर्च केलात, की “कथापौर्णिमा” दिसेल. अर्थातच, ’रसिक साहित्य’च्या दुकानातून, ऑनलाईन आणि माझ्याकडूनही थेट संग्रह घेता येईलच. फक्त आमच्याशी संपर्क साधा.
तुम्ही जरूर हा संग्रह घ्या- स्वत:साठी घ्या, भेट देण्यासाठी घ्या. तुम्ही निराश नक्की होणार नाही, इतकं आता खातरीनं सांगू शकते
“तुझा संग्रह आला” म्हणून प्रेमाने मिठी मारणारी आणि अनेक प्रती विकत घेणारी मैत्रीण, मला दुसऱ्या गावाहून खास भेटायला येऊन, ट्रीट प्लस गिफ्ट देणाऱ्या मैत्रिणी, माझ्या संग्रहाबद्दल आपुलकीने लोकांना सांगणारे मित्र-मैत्रिणी, मला खाऊ देणारे, भेटी देणारे नातेवाईक आणि स्नेही आणि केवळ कथा वाचायला आवडतात म्हणून संग्रह विकत घेणारे असंख्य वाचक … “कथापौर्णिमा” भरभरून देत आहे. I choose to count my blessings. And yet, I want more of them
0 comments:
Post a Comment