January 18, 2024

सेल्युलर जेल आणि समुद्र किनारा...


पोर्ट ब्लेअर विमानतळाच्या बाहेर पडल्या बरोबर स्वा. सावरकर यांचा हा सुंदर आणि भव्य पुतळा नजरेस पडतो. फार मस्त पुतळा केला आहे. Detailing awesome. अर्थातच उर अभिमानाने भरून येतो 🇮🇳
 

 
दुसरा फोटो cellular jail मधून काढलेला आहे. इथे आत गेल्या गेल्या दोन museums आहेत. सर्व क्रांतिकारकांचे फोटो, त्यांना कोणत्या "गुन्ह्यासाठी" किती शिक्षा झाली याचे तपशील, cellular jail का, कशी बांधली गेली याचे तपशील असे खूप काही वाचण्यासारखे आहे. मग खुद्द परिसरात गेल्यावर अंगावर शहारा येतो. गाईड उत्कृष्ट माहिती सांगून सगळीकडे फिरवतात, फोटो काढायला वेळ देतात. तुरुंगातले cell, अर्थात खोल्या आता उघड्या आहेत, आपण आत जाऊन सगळे पाहू शकतो. सावरकरांची खोली तर एका मंदिराप्रमाणेच ठेवलेली आहे. आणि या सगळ्याचा कळस म्हणजे light and sound show. अंगावर शहारे, डोळ्यात पाणी आणणारा...
अंदमानचे दोन स्पष्ट भाग आहेत - सुरेख समुद्रकिनारा, स्वच्छ पाणी, वैविध्यपूर्ण सागरसृष्टी, समुद्री साहसी खेळ हा एक भाग आणि सेल्युलर जेल हा एक भाग... एक मजेचा, एक अंतर्मुख करणारा... 
 

 
अर्थात, इथेही बेअकलीपणा करणारे लोक आहेतच. आपल्याला सावरकर माहित आहेत, त्यांचे हाल, धैर्य माहित आहे म्हणून मराठी माणसाला jail चे गांभीर्य समजते. दुर्दैव असं, की इथे कैदी म्हणून बंगाली क्रांतीकारक संख्येने खूप होते, आणि tourist म्हणूनही बंगाली लोक सर्वाधिक येतात. तरी त्यांना म्हणावे इतके या स्थळाचे गांभीर्य नाही 😔 आज अक्षरश: तोंड वर करून आपण जगू शकतो, वाटेल ते बोलू शकतो, स्वतंत्र आहोत याचे कणभर तरी मोल किमान या स्थळी तरी सर्वांनी बाळगायला हवे, अशी अपेक्षा आपल्या लोकांकडून बाळगणे चूकच असते, नाही का? खूप जोरात बोलणे, फोटोसाठी जीव काढणे, माहिती नीट न ऐकणे आणि सतत तो मोबाईल फोन वापरणे!! 😔 We totally lack in civic sense याचे ठायी ठायी दर्शन होत होते 😡
आणि honeymoon couples बद्दल काय बोलावे! म्हणजे बोलूच नये 😏 आमच्या बरोबरच्या एक जण म्हणाल्या की सेल्युलर जेल बघायला या couples ना मनाईच करायला हवी! Totally agree! आपण कुठे आहोत याचे भान न बाळगता cell च्या आत, corridors मध्ये, तेल काढायचा कोलू आणि कैद्यांना फटके द्यायचे त्या जागांवर सेल्फी आणि फोटोचे जे काही नाटक चालले होते, की डोकं फिरलं. Honeymoon ला आला आहात, सेल्युलर जेल हा टुरिस्ट स्पॉट नाही, इथे येण्याची मुळीच सक्ती नाही, पण आला आहात तर नीट पाहा तरी. इतकीही अक्कल कशी नसते यांना? 😡
 
असो.
पण या बावळट couples मुळे राधानगरी बीचवर मात्र आमची प्रचंड करमणूकही झाली 😁😁 फार सुंदर किनारा आहे इथे. तुम्ही pre wedding photo shoot बद्दल ऐकलं असेल, पण honeymoon shoot बद्दल ऐकलं आहे का कधी? अं? आम्ही तर नुसतं ऐकलं नाही, तर पाहिलं! एक नव्हे, किमान पन्नास 😂😂
या बीचवर फोटग्राफर असतात आणि अर्थात पैसे घेऊन, सूर्यास्ताच्या बॅकग्राऊंडवर ते couple shoot करून देतात. त्यात काहीही romantic नसून, अत्यंत विनोदी प्रकार असतो तो! 🤭🤭 आपल्याला अजिबात न शोभणारे अत्यंत तोकडे कपडे घातलेली मुलगी, फुलांचा शर्ट घातलेला, आत्ता तिशीतच पोट सुटलेला मुलगा आणि तो फोटोग्राफर यांची जी काही जुगलबंदी सुरू होती की ज्याचे नाव ते! 😁 तो मुलाला वेगवेगळ्या पोझ द्यायला सांगत होता, कधी मुलीला उचलायला सांगत होता, ती मुलाला उचलता येत नव्हती (sooo embarassing, my God! 🤣🤣) त्यात पायाखालची वाळू घसरत होती, पडायला होत होतं, पोझ नीट येत नव्हती, कपडे कुठेही उडत होते, अंधार पडायला लागला होता म्हणून घाईही होत होती... वाट्टेल ते सुरू होतं 😂😂 पुढच्याच ठेच लागतेय तर मागचा शहाणा होईल की नाही! छ्या! "बेबी, हम भी फोटो लेते है ना..." बहुदा नवीन बायकोचा लाडिक हट्ट असावा... एकाचे बघून दुसराही तोच गाढवपणा करत होता. एरवी अत्यंत स्मार्ट, शहाणे, प्रॅक्टिकल असलेले हे सगळेच तरुण स्वत:चं total हसू करून घेत होते 😝😝
खेद याचा वाटला, की या भानगडीत ना दोघांनी एकमेकांबरोबर सूर्यास्त बघितला, ना हातात हात गुंफून फिरले, ना गोड कुजबुज केली, ना एकत्र स्वप्न पहिली 😔 सारी धडपड instagram साठी चालली होती! 😛 नशीब दोन चार couples मिळून ग्रुप शूट केलं नाही, किंवा आम्हाला तरी दिसलं नाही बाबा 😜
असो. तर अंदमान आत्ता जसं आहे, तसं सुंदर आहे. उत्तम व्यवस्थापन आहे. अगत्यशील लोक आहेत. Already commercial झाले आहे. पण आता आणखी होणार आहे असं म्हणतात, म्हणजे आत्ता एकदम परफेक्ट आहे, त्याची वाट लागणार हे निश्चित 😐 जाऊन आला नसाल, तर लवकर जाऊन या.
आणि जिथे कुठे जाल, तिथे त्या स्थळाचे गांभीर्य समजून वागा प्लीज 😛

0 comments: