#PCWrites २८ ऑक्टोबर, २०२३ रोजी, कोजागिरी पौर्णिमेच्या संध्याकाळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात रसिक आंतरभारती निर्मित, “कथापौर्णिमा” या माझ्या कथासंग्रहाचा हृद्य प्रकाशन सोहळा संपन्न झाला. ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लेखिका, समीक्षिका मंगलाताई गोडबोले आणि विचारवंत, बहुआयामी लेखक, दिग्दर्शक, किरण यज्ञोपवीत यांच्या शुभहस्ते “कथापौर्णिमा”चे प्रकाशन झाले.
या प्रकाशनाच्या निमित्ताने रसिक आंतरभारतीचे संचालक, श्री. शैलेश नांदूरकर यांनी प्रकाशकाची भूमिका मांडली. मी आणि शैलेश आम्ही मित्र आहोत आणि लेखक-प्रकाशक हे नातेही आता आमच्यात आहे. आमच्यात उत्तम समन्वय असल्यामुळे, पुस्तकाची निर्मिती अगदी सुविहीत झाली.
या जगामध्ये एकही जीव असा नाही की ज्याच्या आयुष्यात कोणती गोष्ट आली नाही, किंवा एकही असा जीव नाही ज्याची काही गोष्ट झाली नाही. म्हणून कथा सांगितल्या गेल्या पाहिजेत, असे मत किरण यज्ञोपवीत यांनी व्यक्त केले. अनेक विचारवंतांची वाक्ये उद्धृत करून आणि अनुभवातील उदाहरणे देऊन त्यांनी सर्व श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले
मंगलाताई गोडबोले यांनी त्यांच्या खुसखुशीत शैलीत नवीन पिढीला मार्गदर्शन केले. प्रयोगासाठी प्रयोग आणि भाषिक अट्टहास यांमुळे रसिक कलाकृतीपासून लांब जातात, तर अकृत्रिम शैली, मनापासून अनुभवलेले किंवा कल्पिलेले काही मांडले, तर त्याचे स्वागत होते असा अनुभव असल्याचे त्यांनी सांगितले. कथा हा साहित्यप्रकार असा आहे, जो एकटेपणात सोबत करतो आणि गर्दीतही दिलासा देतो, त्यामुळे कथालेखन करत राहिले पाहिजे असेही त्यांनी आवर्जून सांगितले. या वाक्यासाठी मी त्यांची परत fan झाले
माझ्या कथा समकालीन आहेत, विषयांचे त्यात वैविध्य आहे, पात्रांचा पुरेसा अभ्यास करून मग त्यांनी त्याभोवती कथा गुंफलेली आहे, असे कौतुक दोन्ही पाहुण्यांनी केले तसेच, आणखी अभ्यासाने शैलीत आणि विषयांच्या मांडणीत वैविध्य आणता येईल, असेही सुचवले.
किरण यज्ञोपवीत यांनी संग्रहातल्या "वटवृक्ष" या कथेचे चित्रदर्शी शैलीत अभिवाचन केले
यज्ञेश छत्रे याने चांगले सूत्रसंचालन केले कार्यक्रमानंतर सर्व रसिकांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त मसाला दुधाचा आस्वाद घेतला.
माझे सगळे जवळचे नातेवाईक, मित्र मैत्रिणी, स्नेही आवर्जून उपस्थित होते. अतिशय बिझी असूनही, अनेक इतर कार्यक्रम असूनही माझ्यासाठी लोक आले होते. अविस्मरणीय अशी संध्याकाळ होती कालची. Truly grateful and thankful 🙏
"कथापौर्णिमा" कुठे मिळेल?
१) रसिक साहित्य, अप्पा बळवंत चौक, पुणे या दुकानात. रसिक आंतरभारती हे आपले प्रकाशक आहेत, त्यामुळे त्यांच्या या दुकानात कधीही गेलात, तर हे पुस्तक मिळत राहील.
२) रसिकसाहित्य वरून online देखील तुम्ही संग्रह मागवू शकता. त्याची लिंक देत आहे :-
https://rasiksahitya.com/products/kathapournima-%E0%A4%95%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AA%E0%A5%8C%E0%A4%B0%E0%A5%8D%E0%A4%A3%E0%A4%BF%E0%A4%AE%E0%A4%BE-by-poonam-chhatre?_pos=1&_psq=kathap&_ss=e&_v=1.0&fbclid=IwAR2r0onjpDILqAqJqaDbFKem-X_h2ydGfCXTK7UAckuYY7yKcb_71OwTMcM
३) आपला संग्रह Amazon वरही आला आहे तिथूनही खरेदी करू शकता. त्याची लिंकही देत आहे :-
इथून लिंकवर थेट जाता येत नसेल, तर दोन्ही साईट्सवर "पूनम छत्रे" किंवा "कथापौर्णिमा" हे key words देऊन पुस्तक खरेदी करू शकाल.
चला, तीन पर्याय दिलेले आहेत, तुम्ही कोणता निवडताय? 😊
"कथापौर्णिमा" घ्या, तुमच्यासाठी. दिवाळी येत आहे, तुमच्या स्नेही, नातेवाइकांसाठीही जरूर घ्या, संग्रह वाचा आणि मला प्रतिक्रिया नक्की कळवा :)
2 comments:
माझी copy book केली, वाचून कळवतो
धन्यवाद! :) जरूर अभिप्राय कळवा.
कृपया आपले नाव सांगता का?
Post a Comment