December 4, 2023

ऍनिमलच्या ट्रेलरची चीरफाड

 

'ऍनिमल'चे ट्रेलर पाहिले आणि थर्टी इयर्सचा एक्स्पिरियन्समुळे लगेचच समजले की पिक्चर बकवास असणार आहे. (ट्रेलर तयार करणाऱ्यांचे आभार मानण्यात येत आहेत या ठिकाणी.) 😝 अनिल कपूरने वठवलेल्या त्याच्या बापाच्या जवळपास तोंडातच जाऊन त्याच्याचवर जवळपास भुंकणारा रणबीर पाहूनच, ’गेला का जुन्या वळणावर’ असं वाटलं. आणि बाप झालेला अनिल कपूर स्तंभित होऊन पाहतोय नुसता! त्याला स्मृतीभ्रंश झालाय का कसला ’सद्मा पहुंचा है' असं वाटलं. तर नंतर आलेल्या रिव्ह्यूजमधून कळलं, की छे! हे तर अनिल कपूरचं अत्युच्च का कायसं ऍक्टिंग आहे! 😂 मग रणबीरचा परत एकदा खिट्टी पडलेला, deranged मुलगा दिसला. कधी बापाला please करणारा, कधी त्याच्याच अंगावर धावून जाणारा! नक्की काय करायचं आहे रे तुला? मग दिसली ती भयानक बंदूक, का जे काय म्हणायचं तिला ते! गोळ्यांचा खच, अनेक पगडीधारी बंदूकधारी, रक्ताने बरबटलेला रणबीर, गळ्यात ’आश्रम’मधली माळ पळवून आणलेला बॉबी आणि दोघांची अपर बॉडी दाखवण्यासाठी केलेली मारामारी! हॅत! सलमान बरा तुमच्यापेक्षा. तो तर साधी बस धुताना पण शर्ट काढतो. फुकट मारामाऱ्या करत नाही. आणि बझूका असताना, प्रायव्हेट का काय ती आर्मी असताना शेवटी परत हातानेच मारामारी?? किती बोअर! ती थंड डोळ्यांची रश्मिका आणि रणबीरची आई दिसली मध्ये. सिनेमात त्यांना काय कोणी भाव दिलेला नाही, उलट वापरच करून घेतला आहे असे कळले. ऍक्च्युअली, रश्मिकाचे डोळे इतके भावहीन आहेत, की प्लॉट ट्विस्ट म्हणून तीच सगळ्यात जास्त ऍनिमलिस्टिक असते असं दाखवलं असतं तरी चाललं असतं! 😁 आणि कहर म्हणजे, बाप सारखा फक्त बायकोला म्हणत असतो, की आपलं पोरगं क्रिमिनल निघालं! ना दु:ख, ना पश्चात्ताप. अरे एवढं कळतं तर तूच पोलिसांकडे दे की त्याला! नुसती बडबड काय करतोस? ’शक्ती’च आठवला. पण दाक्षिणात्य लेखकाला तो रेफरन्स माहित नसणार, तो तरी काय करेल बिचारा. ट्रेलरच्या शेवट्च्या फ्रेममध्ये रणबीरला लोळवून बॉबी त्याच्या अंगावर झोपलाय. मग तो शानसे खिशातली सिगारेट आणि लायटर काढतो आणि ती पेटवतो. अरे, आता कुस्ती केलीस ना त्याच्याशी? हे खिशातलं सामान पडत कसं नाही खाली? मला असे लॉजिकल प्रश्न फार पडतात आणि आंधळ्या प्रेक्षकांना ते आवडत नाहीत! चालायचंच 😉

ट्रेलर आला, आणि फुल्ल हवा. पब्लिक म्हणे, काय भारी आहे, काय ऍक्शन आहे. मग सिनेमाही आला. पब्लिक म्हणे, काय हिंसा आहे, काय रक्तपात आहे आहाहा. वर हेही म्हणे, समाजात असे बाप असतातच, मुलं अशी होणारच, समाजात हिंसा आहेच, घराघरात बायकांचं शोषण होतंच, संदीप वंगा किती शूर आहे, त्याने समाजाचाच आरसा दाखवलाय.

मला ही समर्थनं चिंतेत टाकत आहेत. कारण यात बेसिक लोचा असा आहे, की समाजात जे आहे ते सिनेमात दाखवत असतील, तर मग सिनेमा स्वप्न दाखवतो, जे सामान्य माणसाला शक्य नाही ते लार्जर दॅन लाईफ दाखवतो असं शंभर वर्ष म्हणत आलेत त्याचं काय झालं? वर हेही म्हणतात, भावनाप्रधान लोकांनी बघू नका! कमालचे! भावना आहे म्हणूनच जग चाललंय ना? का फक्त हिंसेवर चालणार आहे? हिंसा जगभर, अगदी रस्त्यावरही सुरू आहे. तीच परत साडेतीन तास बघता? (हां बाय द वे, साडेतीन तास सिनेमा, एक तास जाणे-येणे, इंटर्व्हल आणि आधी अर्धा तास असे साडेपाच तास रिकामे लोकांकडे असतात? पैसे तर असतातच, ते उडवायलाही लोकांना काही वाटत नाही. पण वेळेचे काय??? इतका वेळ इतक्या सेन्सलेस सिनेमासाठी?) ती हिंसा काय रोज करायची आहे का? रस्त्यावर दोन टाळकी भांडत असतील तर आपण लांबून पळून जातो. हिंसेचे काय समर्थन करता? उलट ती कमी व्हावी, मासेसपर्यंत subtly का होईना, थोडी अक्कल पोचावी, भावना पोचाव्या, सदसदविवेकबुद्ध पोचावी यासाठी सिनेमा असायला नको?

नीतू सिंगने सिनेमा रीलीज झाल्यावर इन्स्टा स्टोरीत लिहिलं होतं- Wish Rishi ji was here का तत्सम काहीतरी. म्हणलं, बाई कशाला उगाच गेलेल्या जिवाला छळते? ऋषी कपूरने त्याच्या आत्मचरित्रात रणबीरच्या सिनेमाच्या निवडीबाबत स्पष्ट भाष्य केलेले आहे. त्याचे तरी स्मरण कर! Let him rest in peace. 🙏 

चाटू सिनेपत्रकारांनी या avoidable trash ला उचलूनच घेतलं आहे, पण सगळ्यात खरा आणि निर्भीड रिव्ह्यू इंडियन एक्स्प्रेसने दिलाय. शीर्षकच आहे- Whats the point? आणि शेवट आहे, If you really wish, go watch a real animal 😂😂😂

असो. सिनेमाचा उदोउदो वाचून कंटाळा आला होता. पण आता अनेक सेन्सिबल लोक याच मुद्द्यांबाबत लिहित आहेत, ते बघून जीव भांड्यात पडतोय. सिनेमा येत्या शुक्रवारी निघून जावा. ओटीटीवरही तो कुणी बघू नये हीच प्रार्थना!

***

0 comments: