July 31, 2023

Gautam Adani Biography

 


 
You can love him, you can hate him, but you can't ignore him! 😀 उद्योगपती गौतम अदानी यांचे चरित्र आता मराठीत उपलब्ध! अनुवादक - पूनम छत्रे ☺️☺️
गौतम अदानी हे नाव आता सुपरिचित आहे. त्यांच्या कंपन्या, त्यांचे उलाढालीचे आकडे, कथित घोटाळे वगैरे. पण हे सारे आत्ताचे. त्या आधीचे गौतम कसे होते, त्यांचे कुटुंब, पार्श्वभूमी, स्वभाव, त्यांनी घेतलेले कष्ट, जिद्द, उभारलेले साम्राज्य, कठीण प्रसंगांना दिलेले तोंड आणि पुढील योजना... याचे वर्णन या पुस्तकात आहे. पुस्तक सध्या सोप्या भाषेत आहे, विधानांना पुष्टी देणारी भरपूर आकडेवारी आणि छायाचित्रही पुस्तकात आहेत. पुस्तक इंटरेस्टिंग आहे, निश्चित ☺️
 
"लोकशाहीचे वास्तव" आणि आता "गौतम अदानी" ही मी अनुवादित केलेली दोन्ही पुस्तकं अगदी पाठोपाठ प्रकाशित झाली, याचा फार फार आनंद होत आहे. ही दोन्ही पुस्तकं अगदी वेगळ्या धाटणीची होती. पहिलं राजकीय, तर दुसरं चरित्र. अशी पुस्तकं अनुवाद करण्यासाठी नेहेमी मिळत नाहीत, म्हणून ही पुस्तकं माझ्या दृष्टीने महत्त्वाचीही आहेत आणि विशेषदेखील ☺️ दोन्ही मधुश्री पब्लिकेशनची आहेत आणि amazon वर खरेदीसाठी उपलब्ध आहेत.
 

 
विकत घ्या किंवा लायब्ररीमधून घेऊन वाचा, पण वाचा जरूर. ही चांगली पुस्तकं आहेत (आणि हेच तुम्ही अनुवादाबद्दलही म्हणावे, अशी माझी आशा आणि अपेक्षा आहे 😁).

2 comments:

Anonymous said...

अभिनंदन

पूनम छत्रे said...

धन्यवाद! :)