’दिल चाहता है’मधला सिड, म्हणजेच अक्षय खन्ना भुवयांनी बोलतो! 😊😊 सिडचं कलात्मक मन, त्याचे वयाच्या मानाने असलेले मॅच्युअर विचार, त्याचा आनंद, दु:ख, इन्सेक्युरिटी आणि रागदेखील व्यक्त होतो त्याच्या भुवयांतून! तसाही अक्षय खन्ना मला नेहेमीच आवडतो, पण DCH मधला सिड, नव्हे त्याची एक्स्प्रेशन्स ’बघणं’ हा एक वेगळाच अनुभव आहे.
तीन मित्रांपैकी सगळ्यात ’सुलझं’ पात्र आहे हे. तो टीपी करतो, मजा करतो, खेचाखेचीही करतो, पण तारा point out करते त्याप्रमाणे introvert आहे, तरल मनाचा आहे, sensitive आहे. दीपा आकाशवर एकतर्फी प्रेम करते, त्याच्या मागे धावू नकोस, ’तो’ तुझ्यालायक नाही हे सांगण्याची हिंमत फक्त त्याच्याकडे आहे. तेव्हाही त्याच्या भुवयाच बोलतात, मोजक्या शब्दांत दीपाची समजूत काढतात. त्याचं aggression ही दाखवतात त्याच्या भुवया. कमी पट्टीचा आवाजही धारदार असतो; हळू आवाजात संताप, राग, खेद भेदकपणे सांगता येतो हे माहिताय केवळ सिडला. आठवा तो संवाद- ’हर दोस्ती की अपनी हद होती है’- आकाशला थोबाडीत मारलेली आहे, शब्दांत थरथर आहे, प्रक्षोभ आहे, तरीही बोलण्यात संयम आहे आणि बोलण्याला साथ आहे डोळ्यांची आणि भुवयांची! कम्माल साथ! मग अखेर मैत्रीची किंमत जाणवून आकाश सिडला फोन करतो, भेटतो, मिठी मारतो तेव्हाही शांत शांत होत जातात सिडच्या भुवया. आणि अगदी शेवटी एक गोड मुलगी भेटते, तेव्हाही तिचं स्वागत करतात त्याच्या भुवयाच! :)
अक्षयने DCH च्या आधीही आणि नंतरही कितीतरी सिनेमे केले, वेगवेगळे रोल्स केले. त्याच्या अभिनयातली इन्टेन्सिटी कायम जाणवली, त्याच्या अभिनयाची ताकद नेहेमीच दिसली, पण त्याच्या भुवयांचा आणि एकूण चेहऱ्याचा वापर जसा फरहानने करून घेतलाय तसा तो इतर कोणालाही नाही करून घेता आलाय.
या रोलसाठी अक्षय खन्नाची निवड कोणी केली, का केली हे माहित नाही, पण ज्याने केली त्याला चितळेंचं श्रीखंड, धारवाडी पेढे आणि जनसेवेची रबडी असा कॉम्बो पॅक गिफ्ट आहे माझ्याकडून! 😀
वीस वर्ष झाली ’दिल
चाहता है’ रीलीज होऊन. मी (खऱ्या अर्थाने) तरुण होते तेव्हाची ही गोष्ट! तेव्हा अर्थातच
तो भिडला होता, त्याच्या गाण्यांनी, डायलॉग्जनी वेड लावलं होतं. नंतरही तो केबलवर लागला
तेव्हातेव्ह पाहिलाच. मग मुलालाही दाखवला ;) आणि आता मुलगा जवळपास आकाश- सिड-समीरच्या
वयाचा होतोय तेव्हाही त्याच्याबरोबर आणि माझ्याबरोबरही आहे DCH! त्याची चाहत कमीच होत
नाही असा हा सिनेमा. अनेक साहित्यकृती, चित्रकृती कालातीत असतात. DCH is
undoubtedly one of them 💓
0 comments:
Post a Comment