चहा आणि कॉफीच्या बरोबरीने "हॉट चॉकलेट" हे आमच्या आवडीचं पेय आहे. थंडी किंवा पावसाळ्यातलं हे आमचं comfort drink 
परदेशात आपल्या जिभेला ज्याची सवय असते, असा चहा किंवा कॉफी मिळत नाही. कॉफी अत्यंत कडू असते आणि गरम चहामध्ये गारढोण दूध घालून त्याची मजाच घालवतात. अशावेळी आम्ही अनेकदा "हॉट चॉकलेट"चा पर्याय स्वीकारतो 
एक तर ते परदेशात नक्की मिळतं आणि त्याची चव आपल्याकडे मिळणाऱ्या #hotchocolate सारखीच असते
त्यामुळे निराशा होत नाही
जशी चहा, कॉफीची vending machines असतात, तसंच हेही मशीनमधून सर्रास सर्वत्र मिळतं.
पॅरिस मधल्या अलौकिक Louvre संग्रहालयाच्या समोर "Angelina" नावाचं एक अतिशय लोकप्रिय रेस्तरां आहे, तिथलं HC अतिशय प्रसिद्ध आहे, ते त्याच्या विशेष थाटामुळे!
Angelina चे "to sit" आणि "to go" असे दोन मेन्यू आहेत. HC देखील "to go" menu मध्ये आहे आणि मोठ्या कपांमधून पॅक करून देतातही ते. पण इथे बसून HC पिण्यातच मजा आहे, कारण इथे HC एका विशिष्ट पद्धतीने serve केलं जातं, आणि त्यामुळे या पेयाची लज्जतच वाढते 

सर्वप्रथम, HC येतं चक्क एक छोट्या किटलीतून. आणि त्याबरोबर एका छोट्या ग्लासमध्ये "fresh cream" देखील दिलं जातं. आपण हॉट चॉकलेट कपात ओतायचं, त्यावर एक मोठा चमचा भरून फ्रेश क्रीम घालायचं, ते विरघळताना बघायचं आणि मग घोट घोट घेत "भारीवालं फिलिंग" कसं येतं याचा अनुभव घ्यायचा 
विशेषतः Louvre फिरून आल्यावर, पायाचे तुकडे पडल्यावर आणि डोळ्याचं पारणं फिटल्यावर असे "cherishable" क्षण आणखी हवेहवेसे वाटतात 
आत्ता आपल्याकडे पाऊस पडतोय. गरम चहा, भजी, वडापाव, मॅगी हे नेहेमीचे आवडीचे पदार्थ केले आणि खाल्ले जातीलच. नेहेमीप्रमाणे एखाद्या गार पावसाळी रात्री हॉट चॉकलेटही केलं जाईल. आणि आता त्यात भर पडेल Angelina च्या आठवणीची 

0 comments:
Post a Comment