May 2, 2026

दोन महत्त्वाची पुस्तकं...

 

दोन महत्त्वाची पुस्तकं, दोन वेगळी कामे, दोन वेगळे अनुभव 😇😊 खालच्या फोटोतल्या "आर्ट ऑफ सिडक्शन"चं संपादन मी केलंय, तर "द सायकोलॉजी ऑफ मनी" या अतिशय लोकप्रिय पुस्तकाच्या फक्त नवीन दोन प्रकरणांचा अनुवाद केलाय.
 

 
 
सहसा, संपादन करताना मूळ इंग्रजी मजकूर आणि अनुवादकाने केलेला अनुवाद यांचा ताळमेळ आहे ना, अर्थाची काही तफावत तर नाही ना, काही राहिले तर नाही ना, हे सर्व बघावे लागते. #robertgreen रॉबर्ट ग्रीन लिखित #artofseduction हा विषय मुळातच अतिशय धाडसी, स्फोटक आहे आणि मजकूरही तसाच आहे! 😁 या वेगळ्या विषयाच्या मोहात पडून मी हे काम माझ्या परीने पूर्णत्वास नेले. मजा आली. ज्ञानात नवी भरही पडली! 🤪😄
 
#thepsychologyofmoney म्हणजेच "पैशाचे मानसशास्त्र" या अनुवादाची ही तब्बल ३५ वी आवृत्ती आहे!! 👍👍 श्री जयंत कुलकर्णी यांनी या मॉर्गन हाऊजेल लिखित पुस्तकाचा उत्तम, समर्थ अनुवाद केला आहे. २०१३ साली अनुवाद केलेलं हे पुस्तक अजूनही अतिशय लोकप्रिय आहे. मूळ लेखकानेच त्यात आता दोन नवीन प्रकरणे लिहिली आहेत. फक्त तेवढ्या दोन प्रकरणांचा अनुवाद मी केला आहे. जेव्हा आपण मूळ लेखकाने लिहिलेल्या पुस्तकात नव्याने काही लिहीत असतो, तेव्हा त्यांची शैली, त्यांनी वापरलेली टर्मिनोलॉजी आधी बघून मग तीच शैली, तीच भाषा, तीच टर्मिनोलॉजी आपल्याही अनुवादात येते आहे ना, हे बघण्याचे अनुवादाव्यतिरिक्तचे आणखी एक वेगळे आव्हान असते. हे यासाठी करायचे, जेणेकरून नवीन वाचकाला पुस्तक सलग वाचताना कोणताही अडथळा येऊ नये. त्यामुळे हा अनुवाद करतानाही मजा आली आणि मला खूप काही शिकायलाही मिळाले 😊 शिवाय हे पुस्तक इंग्रजी आणि मराठीतूनही वाचायला मिळाले हा additional बोनस.
 
तुम्ही ही पुस्तकं वाचली, तर आपला अभिप्राय जरूर मला कळवा. दोन्ही पुस्तकं मधुश्री पब्लिकेशनची आहेत. www.madhushreepublication.com या त्यांच्या वेबसाईटवर तुम्हाला ती विकत घेता येतील. 
 

0 comments: