February 9, 2026

#dhurandhar

 

खूप जणांचं खूप लिहून झालंय यावर, म्हणून मग मीही लिहितेय 😜😁 points मध्ये लिहिते म्हणजे थोडक्यात आवरेल 😝
 
१) मला सिनेमाचा वेग फार आवडला. सतत काहीतरी घडतं त्यामुळे उत्कंठा कायम राहते.
 
२) chapters ची नावे अगदी योजनापूर्वक दिली आहेत, त्यासाठी केलेला विचार आवडला.
 
३) अक्षय खन्ना overhyped वाटला. मला खूप आवडतो तो एरवी, पण यात उगाच एक ताणलेला चेहरा घेऊन वावरला आहे. तो इतका खप्पड, इतका बारीक का झाला आहे याची काळजीच जास्त वाटली 😆😆 फक्त शेवटी, जेव्हा आपण trap झालोय हे त्याला realize होतं, तेव्हाचा अभिनय आवडला.
 
४) अनेक subtle hints : हमझा आल्याच्या रात्री त्याची मारामारी होते, तेव्हा फक्त डोळ्यातून अन्वर चाचा त्याला "मार खा" चा इशारा करतो, रहमान बलोचच्या मोठ्या मुलाचं रक्त हमझा मुद्दाम आपल्या कपड्यांना लावून घेतो, हमझा जमालीला ज्या पद्धतीने स्वतः ला जावई करून घ्यायला सुचवतो, त्यासाठी incriminating video delete करतो, महत्त्वाच्या क्षणांना दिसणारा हमझाचा भूतकाळ, etc
 
५) राकेश बेदी कमाल! जमालीच्या चेहऱ्यावरचा तिरस्कार, तू मेरा बच्चा है असं प्रत्येकाला म्हणणं... बेस्ट ऍक्टिंग.
 
६) संजय दत्तला आदित्य धरने का cast केलं असेल? दगडी शरीर, दगडी चेहरा! 🙂‍↔️😑
 
७) टोंगाचे वाईट वाटले. असे अनेक वफादार असतात जे केवळ loyalty पायी मरतात. पण तो actor भारी आहे एकदम 😊
 
८) २६/११ चा सीन बघताना अंगावर काटा आला. तेव्हाचे सगळ्यांचेच ॲक्टिंग जबरदस्त. तेव्हाचा रणवीर उच्च!
 
९) netflix वर बघितला. घरी, दिवे चालू ठेवून बघितल्यामुळे हिंसेचा impact कमी झाला. Scenes कापलेही आहेत म्हणे. ते एक बरं झालं.
 
१०) रणवीर सिंगच्या screen presence बद्दल काय बोलावं? प्रत्येक भूमिकेत शोभतो. अगदी ladies vs ricky behel मध्ये सुद्धा 🤭😁 गली बॉय, दिल धडकने दो मधला तरुण जितका impressive तितकाच मला थोरले बाजीराव म्हणून पण आवडला होता. यात तर omg, uff वगैरे सगळाच आहे 😍🤩 ग्रे घारे डोळे काय शोभलेत त्याला! काय swag ने चालतो ...ओहो!
 


 
पुढच्या भागात त्याचा भूतकाळ, त्याच्या कुटुंबावर झालेले अत्याचार, त्यातून तो गुन्हेगार कसा झाला आणि त्यातून धुरंधर कसा झाला हे असेल, असा अंदाज. शिवाय त्याला कराचीवर राज्य करायचं आहे, तेही होतं का ते कळेल.
 
मला ही propoganda film वाटली नाही. हुशारीने केलेला मसाला मूव्ही वाटला. Review पहिल्या भागाईतकेच चांगले असतील, तर दुसरा भाग थिएटर वर जाऊन बघणार 😊 #धुरंधर

0 comments: