Elon Musk हे नाव सर्वदूर परिचित आहे. जगातली सर्वात श्रीमंत व्यक्ती असे बिरूद ते मिरवतात, अनेक बिलियन डॉलर्सची संपत्ती त्यांच्याकडे आहेत, राक्षसी वाटतील अशा तांत्रिक कंपन्यांची स्थापना त्यांनी केलेली आहे आणि भयंकर अफाट परिश्रम करून त्या भरभराटीलाही आणल्या आहेत. Tesla च्या रूपाने त्यांनी अमेरिकेत बॅटरी वर चालणाऱ्या कारची क्रांती आणली, Spacex मधून त्यांनी चक्क रॉकेट बांधणी केली आणि ही रॉकेट्स पृथ्वीबाहेर पोचवली, X (Twitter) द्वारे ते समाज माध्यमांवर आले, तर Grok मधून ते बुद्धिमान आणि तांत्रिक कृत्रिम प्रज्ञेच्या जगात कार्यरत आहेत. याशिवाय, humanoid robots, mission to Mars, संपूर्णपणे स्वयंचलित, driverless car हे त्यांचे प्रकल्प सुरू आहेतच.
ही झाली यशोगाथा. इतकं मोठं साम्राज्य उभं करणाऱ्या इलॉन मस्क यांचा अत्यंत जिद्दी जिगरबाज आणि बेधडक स्वभावही करायला कारणीभूत आहे. एखादा चटकन निराश होणारा किंवा कमकुवत हृदयाचा उद्योजक असता तर त्याला इतकं मोठं साम्राज्य उभारता आलं नसतं, हेही मान्य करायला हवं.
आज मस्क आपल्याला यशस्वी दिसतात पण त्यामागे त्यांची अनेक वर्षांची अथक मेहनत आहे. त्यांनी अनेक, मोठी अपयशं पचवलेली आहेत. शिवाय, मस्क त्यांच्या विक्षिप्त स्वभाव आणि बेफिकीर वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. व्यावसायिक आयुष्यात अतिशय यशस्वी असलेल्या मस्क यांचं वैयक्तिक आयुष्य अतिशय विवादास्पद आहे. त्यांच्या व्यक्त होण्यात कोणतंही filter नसतं. ते आज एक बोलतात, उद्या त्याच्या विरुद्ध बोलतात. ट्रम्प यांच्याबरोबर असलेली "भागीदारी" हे एकच उदाहरण पुरेसं आहे.
अशा या दुहेरी व्यक्तिमत्वाच्या बालपणापासूनच्या जडणघडणीचे पैलू, त्यांच्या मेंदूचं वायरिंग, त्यांच्या स्वभावाची कारणे यांचा शोध श्री. वॉल्टर आयझॅकसन या ज्येष्ठ चरित्रकाराने या पुस्तकातून घेतला आहे. त्यांच्या जन्माआधीपासून ते ट्विटरचं अधिग्रहण त्यांनी एप्रिल २०२३ मध्ये केलं इथपर्यंतचा सर्व प्रवास या चरित्रात आहे.या चरित्राचा मराठी अनुवाद करायची संधी मला मिळाली. मधुश्री पब्लिकेशनतर्फे हे पुस्तक प्रकाशित झालं आहे.
इलॉन मस्क हे व्यक्तिमत्व अतिशय प्रसिद्ध असल्यामुळे त्यांच्यावर लिहिलेली अनेक डुप्लिकेट पुस्तकं बाजारात आली आहेत, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. एक तर वॉल्टर आयझॅकसन यांचं इंग्रजी नाहीतर माझं मराठी हीच पुस्तकं वाचा 
पुस्तक ६०० पानी आहे, महाग आहे, विकत घेतलेत, तर उत्तमच, it will be a great purchase. कदाचित विकत घेणं शक्य होणार नाही, पण ग्रंथालयात मिळू शकेल. मुद्दा असा, की पुस्तक वाचा आणि मला प्रतिक्रिया जरूर कळवा. फार मोठ्या प्रतिक्षेनंतर माझं फार महत्त्वाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे 




0 comments:
Post a Comment