बदामी इथे लाल रंगाच्या प्रचंड मोठ्या शिळा आहेत, टेकड्याच म्हणू शकतो. त्यात चार सुंदर लेणी आहेत. त्यापैकी तीन शंकराची, तर एक बौद्ध लेणे आहे. #BadamiCaves नावाने त्या जगप्रसिद्ध आहेत. सुंदर, स्वच्छ कोरीवकाम आहे, बऱ्यापैकी सुस्थितीत आहेत. शंकर पार्वती, विष्णूचे अवतार, लहान मुलं, सुंदर स्त्रिया, खांब आणि छत यावर नक्षी... सारं काही त्या छोट्या लेण्यांमध्ये कोरलंय. लाल दगड लक्ष वेधून घेतो. महाराष्ट्रात सगळीकडे काळा कातळ आहे, वेरूळची लेणीही काळया दगडातली आहेत. हे लाल दगडात कोरीवकाम अधिक सुबक दिसतं, असं मला वाटलं
या
लेण्यांच्या बरोबर समोर बदामीचा किल्ला आहे. तोही पूर्ण natural stones
चा. वर काही तटबंदी दिसते. पण पायथ्यापासून प्रचंड शिळा आहेत. त्यांच्या
formation मुळे नैसर्गिक घळ तयार झाली आहे. किल्ला तसा बुटका आहे, पण
एकेकाळी त्यावरून बदामीच्या आसपास सर्वत्र लक्ष ठेवता येत होते. वर तीन
फाटे फुटतात, एका फाट्यावर watch tower आहे, एकावर lower shivalay म्हणून
एक लहान शंकराचे मंदिर आहे आणि खूप उंच असलेल्या तिसऱ्या फाट्याने चढून
गेलं की upper shivalay
म्हणून शंकराचंच, पण मोठं मंदिर आहे. लेणी आणि इथेही बऱ्यापैकी चढावं
लागतं, म्हणून लोक लेणी पाहिल्यावर इथे येत नाहीत. पण इथे लोकांनी नक्की
यावं. अपार भव्यता आणि शांतता अनुभवायला मिळते इथे
हा, इथे Rowdy Rathore या सिनेमाचा काही भाग चित्रित झाला होता म्हणे. हा त्याचा selling point आहे सध्या ![]()
चला, किमान त्यासाठी तरी हा किल्ला पहाच.









0 comments:
Post a Comment