Typically पाहिलं, तर स्त्रियांना, त्यातही गृहिणींना अनेकदा दुर्लक्षित वाटत असतं. "मी मरमर मरते तरी माझं कोणाला कौतुक नाही", "मी इतकं करते तरी त्याची कोणाला जाणीव नाही", वगैरे. याला काही रास्त कारणेही असतील, पण अनेकदा असं उगाचच वाटू शकतं हेही सत्य नाकारता येणार नाही. "मी जसं घराबाहेर काम करतो आणि माझं कोणी सारखं कौतुक करत नाही, तसं तू घरात काम करतेस, त्यांचं सारखं काय कौतुक करायचं?" असा घरच्यांचा विशेषतः नवऱ्याचा अप्रोच असू शकतो. त्यांच्या दृष्टीने पाहिलं तर ते काही फारसं चुकीचंही नसतं.
पण स्त्रियांना underwhelmed आणि underappreciated वाटतं खरं. पूर्वी अशा स्त्रिया आपापल्या मैत्रिणींमध्ये किंवा माहेरच्या लोकांमध्ये आपलं मन मोकळं करून या वैतागाला वाट करून द्यायच्या. पण आता स्त्रियांच्या हातात असतो मोबाईल आणि डेटा. मग त्याचा वापर करून घरात जे मिळत नाही ते बाहेरून मिळवायचा प्रयत्न सुरू होतो. म्हणजेच अनोळखी लोकांकडून तात्पुरती पण सतत प्रशंसा आणि कौतुक मिळवण्याचा प्रयत्न! त्यांचं सुंदर दिसणं, सुंदर ड्रेस, सुंदर शरीर, सुंदर पाककृती... त्यांचं कौतुक करायला सोशल मीडियावर रिकामे पुरुष बसलेलेच असतात. "J१ झालं का?" ही त्याची सुरूवात.
मग स्त्रीची desperation level किती आहे याप्रमाणे हे नाते इनबॉक्समध्ये ब्लॉक करणे, इनबॉक्समध्ये माफक बोलणे, बोलणे व्हाट्सअपवर नेणे, फोटो, व्हिडिओ कॉल, प्रत्यक्ष भेटणे, बहुचर्चित "ब्रेडक्रंबिंग", विवाहबाह्य संबंध असे कुठेही जाऊ शकते. पण याची सुरूवात होते, ती भावनिक स्तरावर स्त्री एकटी पडल्याने. तिला बहुतांश वेळेला बाह्य शारीरिक संबंध हवेच असतात असे नाही, पण तिला तिचे ऐकून घेणारा, तिला सहानुभूती दाखवणारा आणि क्वचित जवळ घेणारा कोणीतरी मात्र नक्की हवा असतो. खरंतर, नवऱ्याने हे सगळं करावं अशी तिची अपेक्षा असते. पण ती पूर्ण होत नाही, आणि विशेषतः मानसिकरित्या कमकुवत असलेल्या स्त्रियांची वाहवत जाण्याची शक्यता वाढते.
मग अशा भावनिक दृष्ट्या एकट्या पडलेल्या स्त्रियांना Generative responses देणारा एखादा AI robot मिळाला तर? तर त्यांची मानसिक कुतरओढ कमी होईल का? "किती सुंदर दिसतेस तू", "तू आहेस म्हणून सगळं सहन करतेस", "कसं काय जमतं बाई तुला" असं न थकता न कंटाळता अविरत बोलणारा एखादा रोबोट मिळाला तर अशा स्त्रिया नैराश्याच्या उंबरठ्यावरून परत फिरतील का?
असा विचार माझ्या मनात आला आणि त्यावर मी एक कथा लिहिली आहे! यंदाच्या एका दिवाळी अंकात ती येईल.
ही कथा मला शक्यतांच्या अनेक प्रदेशात घेऊन गेली. संपूर्ण विनोदी ते अतिशय गंभीर शक्यता मला दिसल्या. त्यातल्या एका चित्रांची चौकट निवडून मी ही कथा लिहिली आहे. अशा प्रकारची कथा मी पहिल्यांदाच लिहिली आहे. त्यामुळे वाचकांच्या प्रतिक्रियेसाठी आतूर आहे. तो अंक तयार होत आला, की यथावकाश त्याची जाहिरात करेनच
काल #breadcrumbing या विषयावर fb वर भरपूर चर्चा झाली, ते वाचताना मला मी आधीच लिहिलेल्या कथेबद्दल आठवलं, म्हणून हे सगळं पुराण!
Hormones मुळे असेल किंवा नैसर्गिकरित्या भावनाप्रधान असल्यामुळे असेल, पण स्त्रियांना मानसिक आधार देणारे नक्की कोणीतरी हवे असते. अति आणि फाजील लाडही नकोत आणि सतत दुर्लक्षही नको. या मधला समतोल जर घरातल्यांना साधता आला, तर किमान सोशल मीडियामुळे होणाऱ्या संसारांच्या पडझडीवर तरी थोडा आळा बसू शकेल.
***
0 comments:
Post a Comment