May 2, 2023

क्षेत्र महाबळेश्वर

 

छोट्या सुट्टीसाठी महाबळेश्वरला आम्ही अनेकदा गेलो आहोत, अधिककरून पावसाळ्यात - अर्थातच धबधबे, थंड हवा आणि mapro garden साठी 😁 यावेळी अनेक वर्षांनी भर उन्हाळ्यात गेलो. सगळे points अनेकदा बघून झाले होते. म्हणून मग मुद्दाम महाबळेश्वरच्या देवळात गेलो. केवढा बदलला आहे तो परिसर... प्रॉपर बाजारपेठ झाली आहे दोन्ही बाजूला. पर्यटकांना आकर्षित करतील अशा सगळ्या वस्तू - टोप्या, लाकडी वस्तू, पिशव्या, जेली sweets, स्ट्रॉबेरी आणि इतर बेऱ्या, खाण्याच्या टपऱ्या... त्यातून वाट काढत देवळात पोचायलाच विसरायचा एखादा 😅
 
अतीबळेश्वर, महाबळेश्वर या दोन्ही देवळात सुंदर, विना गर्दी दर्शन झालं. पंचगंगेच्या मंदिरात थोडी गर्दी होती. पण कुंडातलं गारेगार पाणी पायावर घेत थांबलो. या दगडी देवळांतून बाहेर पडावं असं वाटतच नाही, नाही? 😇 गर्दी होती, तरी शांत वाटत होतं. तिथून बाहेर पडताना कृष्णामाईच्या देवळाची पाटी दिसली. सासर सांगलीचे. त्यामुळे कृष्णामाई अधिक जवळची 😜 शिवाय, हे मंदिर आधी पाहिलं नव्हतं. म्हणून गेलो, आणि इतकं सुंदर दृश्य दिसलं!
 
या मंदिर परिसरातून रस्ता cross करून थोडं खाली उतरलं की दरीच्या टोकावरच हे कृष्णेचे मंदिर आहे, अगदी जीर्ण आहे, फोटोतून कल्पना येईलच. सुमारे ४,५०० वर्षांपूर्वीचे आहे म्हणे! तिथे कृष्णेची अगदी बारीक धार भर उन्हाळा असूनही कुंडात पडत होती. संपूर्ण काळोख्या गर्भगृहात शंकराची भली मोठी पिंड आहे आणि बाहेर नंदीमुखातून वाहणारा कृष्णेचा झरा! ❤️ देवळाची पडझड झाली आहे. खूप रेखीव बांधणी नाहीये, एकावर एक दगड रचले आहेत जणू. आणि तिथून दिसणारा नजारा पुढच्या फोटोत! 😊 महाबळेश्वरला आल्याचे सार्थक झाले!
 


 
 
कधीकधी माहित असलेल्या जागा (आणि माणसे) नव्याने सापडतात ना... अगदी तसाच अनुभव होता हा. आनंददायक आणि निशब्द करणारा.

2 comments:

Anonymous said...

छान लिहिलंय...शेवटच्या वाक्याशी हजारदा सहमत

poonam said...

dhanyawaad :)