February 8, 2023

Valentine's Week आणि पुरुष! 🤪😜

 

ही पोस्ट खास पुरुषांसाठी, जनहितार्थ जारी! 😛 आजपासून पुढे सात दिवस "व्हॅलेंटाईन्स वीक" सुरू होत आहे. आता बाजू घेण्याची वेळ आलेली आहे! एकतर तुम्ही त्या सर्व वेडेपणात संपूर्ण समर्पणभावाने सामील व्हा, नाहीतर "मला असले काही आवडत नाही. सगळा भंपकपणा आहे", असे स्पष्टपणे सांगायचे धाडस करून त्यातून बाहेर पडा. "प्रेमाचा काय एकच दिवस असतो का? पण तुला आवडतं म्हणून..." वगैरे डळमळीत, बोटचेपी, गुळगुळीत भूमिका घेऊ नका. Be a man!
😁
 
आणि हो! या आठवड्यात गणित, लॉजिक, lateral thinking, thinking out of the box वगैरे सगळं विसरा. In fact, ते विसरता येणार असेल तरच यात भाग घ्या 😛 प्रेम आणि लॉजिक यांचे कधीही मीलन होऊ शकत नाही. तुम्ही उगाचच हिरोगिरी करून त्यांचा सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न करू नका. एक वेळ तुम्ही काहीही केले / आणले नाहीत तरी तुमचे प्रेमपात्र ते समजून घेऊ शकेल. पण, प्रेम तर दाखवायचं आणि त्यात तुमचा शहाणपणाही करायचा असे दोन्ही यात साध्य होऊ शकत नाही 😆
 
उदा. "आज rose day आहे, तर एका गुलाबासाठी पन्नास रुपये खर्च करण्यापेक्षा मी त्यापेक्षा कमी पैशात घरच्या देवांसाठी झेंडूचा हार आणला आहे. तूच घराची लक्ष्मी, तुला हा हार देतो, तो तू देवांना घाल" वगैरे आज केलेत, तर दोन दिवस (आणि दोन रात्री) एखाद्या देवळात काढावे लागतील! 😅😂 गुलाबाला पर्याय नसतो. गुलाब द्या नाहीतर देऊ नका. हेच teddy, hug, chocolate day ना लागू आहे. द्या नाहीतर देऊ नका. एक पे रहो! काहीही दिले नाहीत तरी चालेल, पण ग्यान देऊ नका बाबा! 😱
 
आणि मग शिरोमणी V Day! तेव्हाही gift द्या किंवा देऊ नका. पण, लॉजिक आणि प्रेम यांचा संगम साधत जर तुम्ही:
१. ही घे cash, तुला हवे ते घे यातून.
२. हे घे हेल्मेट, तुझ्या safety साठी.
३. हे घे pathology lab चे gift certificate. वार्षिक तपासणी कर आजच्या दिवशी.
 
असे काही केलेत तर मेलात तुम्ही 😡 तुमचा उद्देश अतिशय स्तुत्य, उत्तम आहे. पण परत तेच. तो दर्शवण्याचा हा आठवडा नव्हे. रोख पैसे द्यायला काय तुम्ही तिचे काका आहात का आजोबा? 🙄 हेल्मेट, annual tests साठी women's day आहे पुढच्या महिन्यात. या आठवड्यात गुलाब, चॉकलेट्स, perfume, कपडे, jewellery, cosmetics, date in a restaurant, one day trip असे अनेक पर्याय आहेत. आणि खरेच यातले काहीही जमले नाही आणि केवळ हातात हात घेऊन, तिच्या डोळ्यात बघत प्रेमाची कबूली दिली, तरी पुरेल तिला ❤️
 
पण कृपा करा आणि तुम्हा दोघांमध्ये लॉजिक आणू नका या सात दिवसात. एरवी बायका कितीही practical, logical असल्या तरी in their hearts, they love to be pampered ☺️ जेवढे जमेल तेवढे करा. अती भव्य काही करायची गरज नाही. पण जे कराल ते मनापासून करा आणि परत एकदा... त्यात लॉजिक आणू न का!!
 
All the best 😀 प्रत्येकाला आपल्या प्रिय व्यक्तीकडून अविरत प्रेम ( आणि त्याचा पुरावा म्हणून अधूनमधून gifts ) मिळत राहो! 😁🤗

4 comments:

Unknown said...

Perfect 👍 जनहितार्थ Viral करा हि post 😃

पूनम छत्रे said...

मीच कशी करणार व्हायरल? तुम्ही नावासकट शेअर केली तर होईल व्हायरल :)
तुम्ही स्वत: unknown आहात, पण माझ्या नावासकट पोस्ट पुढे पाठवली, तर माझी हरकत मुळीच नाही!

Unknown said...

Mazya WhatsApp WhatsApp group var तुमच्या नावा sahit karate. Maze naav Shilpa Pendharkar. Me तुमची नियमीत वाचक आहे. आणि मला तुमचे लिखाण आवडते. नाव unknown ठेवणे असा काही उद्देश नव्हता. Comment kartana mobile var login Kara अशी विचारणा झाली नाही म्हणून login kele nahi

पूनम छत्रे said...

थॅंक यू शिल्पाजी :)
कमेंट अननोन दिलीत तरी हरकत नाही, कमेंटच्या खाली नाव लिहा, छान वाटते नाव पाहून :)