June 20, 2022

Father's Day

 

My Papa Smartest 😎
Papa is quite badass 😄 has been all his life! १९७०च्या दशकात सरकारी नोकरीत आपल्याला काही स्कोप नाही हे लक्षात आल्यावर त्यांनी चक्क ती सोडण्याचं धाडस केलं आणि पुणे सोडून थेट गेले पंजाबात. भारतातला पहिलावहिला MBA चा अभ्यासक्रम तिथे सुरू झाला होता. So, नोकरी सोडून, माझी आई आणि मोठी बहीण त्यांना पुण्यात ठेवून दोन वर्ष घरसंसारापासून लांब राहून त्यांनी परत अभ्यास केला आणि Management Degree मिळवली. मग काही वर्ष चंडीगढलाच त्यांनी नोकरी केली. मग आम्ही सगळे परत पुण्याला आलो आणि पपांनी किर्लोस्कर कंपनी जॉईन केली. त्यांच्या शिस्तीच्या स्वभावाशी जुळणारीच कंपनी होती ती. त्यामुळे तिथे ते रमले.
 
मी लहान असताना, पपा म्हणजे माझ्यासाठी terror! त्यांचा आवाज चढत नाही, ते ओरडत नाहीत पण त्यांचा चेहरा राग आल्यावर जो काही बदलतो! My God! मी भयंकर उद्योग केले, उलटून बोलले की एकच जालीम शिक्षा द्यायचे ते - त्यांच्या हाताच्या भल्या मोठ्या पंजात माझा हात ठेवून दाबायचे. खूप दुखायचं. मग सोडून द्यायचे. हीच, एवढीच शिक्षा. बाकी कधी फटका सुद्धा मारला नाही (ते आईने मारले खूप! 😥😁
 
मग १९९० चं थोडं अवघड दशक आलं. त्यांची आधी नोकरी सुटली, त्यांनी कन्सल्टन्सी सुरू केली, ती फारशी चालली नाही. ही काही वर्ष फार मानसिक त्रासाची गेली असणार. मोठ्या बहिणीचं लग्न झालं होतं, पण माझं सगळं शिक्षण बाकी होतं. संसार होताच, जबाबदाऱ्या होत्या. पण त्यांना प्राध्यापकीची वाट गवसली आणि तिथे मात्र तर बहरले. पुण्यातल्या सर्वोत्तम Management Institutes मध्ये त्यांना बोलावणी यायला लागली. हजारो विद्यार्थी त्यांच्या हाताखाली शिकले. देशभर, परदेशातही व्यवस्थापनातल्या मोठ्या पदावर कामाला लागले. आजही त्यांना कितीतरी जण मानतात. त्यांचं fan page काढलं आहे त्यांच्या विद्यार्थ्यांनी ☺️ पण दिव्याखाली अंधार या उक्तीनुसार मी आणि बहिण मात्र त्यांच्याकडून अभ्यासाचं काही शिकलो नाही. त्यांनी आम्हाला सल्ले दिले, पण ढवळाढवळ कधी केली नाही. त्यांची आम्हाला शिकवण्याची पद्धत, म्हणजे practical. बँकेचे व्यवहार, अर्ज भरणे, माहिती मिळवणे, admission घेणे - सगळं काही independently करायला शिकवलं. उगाच बोट धरून कुठे नेलं नाही. 
 
पपा म्हणजे धडाकेबाज स्वभाव, शिस्त, वक्तशीरपणा, to the point बोलणं, उत्तम इंग्रजी, भरपूर वाचन, व्यायामाची भयंकर आवड, हिंडण्याचा उत्साह , खाण्याचे शौकीन, अभ्यासू वृत्ती आणि अतिशय practical approach. अर्थात, स्वभावाला अनेक बोचरे कंगोरेही. पण ते आईला सोसावे लागले. आम्हाला फारसे नाही. 
 
२०१० मध्ये त्यांची bypass surgery झाली आणि it was a turn around for him and for us too! त्यानंतर पपा इतके positive झाले! त्यांची सर्जरी बरीच complicated होती, तरी अत्यंत सकारात्मक राहून ते त्या आजारातून बाहेर आले, फिट झाले आणि अगदी regular जीवनशैली परत मिळवली. पण ते थोडे हळवेही झाले. आम्हा मुलींबद्दल आणि विशेषत: त्यांच्या दोन्ही नातवांबद्दल. दोन्ही नातू त्यांचे लाडके. त्यांच्याबरोबर त्यांनी मुद्दामहून, परिश्रमपूर्वक संबंध develop केले. आजही त्यांच्याशी त्यांच्या reference ने, त्यांच्या विषयांच्या गप्पा मारतात, त्यांना सल्ले देतात, शिकवतात आणि चर्चाही करतात! कायम जगाबरोबर up to date राहणं हाही पपांचा गुण. त्यामुळे ते अगदी टीनएजर्सशीही संवाद साधू शकतात. सतत कार्यरत असतात, सतत नवीन शिकत असतात, वाचत असतात आणि कधीही विचारलं, पपा कसे आहात, तर 'मजेत' असंच उत्तर देतात! 😇
 
मी माझ्या आईवर, आईबद्दल खूप लिहिलं आहे. गप्पाही आईशी जास्त होतात. तेव्हा एकदा मला म्हणाले होते, माझ्याबद्दल लिही, मीही बरा आहे तसा 😄😄 म्हणून आज Father's Day चं औचित्य साधून लिहिलं आहे थोडं. सगळं काही लिहिता आलं नाही. खूप आहे अजून सांगण्यासारखं. सध्या इतकंच.

0 comments: