December 27, 2020

तेरे चुम्मे में च्यवनप्राश है!

 #लिरिक्सवालागाना

शीर्षक वाचताच चमकलात ना? डोळे मोठे झाले, कान टवकारले गेले ना? माझेही झाले होते. मुळात आपल्याकडे ’चुम्मा’, ’चुंबन’, ’किस’ हे शब्द ऐकले की आयदर काहीतरी प्रचंड सेन्सेशनल, किंवा प्रचंड अश्लील, समाजविघातक वगैरे काहीतरी घडतंय असं वाटतं. आत्ताआत्तापर्यंत हिंदी सिनेमांत ’दो फूलों का टकराना’ वॉज इक्वल टू अ चुम्मा. ती ’प्रथा’ आता कधीचीच मागे पडलेली आहे, आता हिंदी ओटीटीवर चुम्मेच चुम्मे दिसतात, गरज असो, नसो. असो! 🙈 हिंदी सिनेमांच्या गाण्यांतही क्वचित चुम्मा रेफरन्स आहे. पण या सगळ्याच चुम्म्यांचा संबंध आहे प्रेमाशी. आणि, या गाण्यात तर चुंबनाची चक्क तुलना केली आहे च्यवनप्राशशी !! त्यामुळे, ही ओळ ऐकली आणि जागच्या जागी स्टॅच्यू झाले, या कल्पनेबद्दल गीतकाराला दाद दिली आणि पुढे ऐकायला लागले. पुढचे लिरिक्स तर एकदम भारी आहेत. च्यवनप्राशची कल्पना किती जबरदस्त कॅरी केली आहे पहा-

तेरे चुम्मे में च्यवनप्राश आहे

व्हिटॅमिन जैसा हर अंदाज है

स्वास्थ्य के लिए चुम्मा अच्छा है बडा

चुम्मा ये तेरा सच्चा है बडा

दिन में दो दफा चाहिए सनम

रखता है मेरे खून को गरम

मेरी तंदुरुस्ती का यही राज है!

आहे की नाही मज्जा! आलं की नाही चेह-यावर हसू? 😁 एखादी कल्पना सुचणं वेगळं, पण ती चपखलपणे पूर्ण गाणंभर सीमलेसली नेणं वेगळं. प्रेम हे प्रचंड एनर्जेटिक असतातच, इट्स ऑल अ केमिकल थिंग, इट रिलीजेज सेरोटॉनिन, इट रिलीजेज हॅपी थॉट्स, पॉझिटिव एनर्जी हे आपण शिकलेलो असतो, अनुभवलेलं असतं. चुंबन हा तर प्रेमाचा कळस. आपल्या आवडत्या व्यक्तीचं चुंबन घेतलं की नक्की काय वाटतं, हे काही मी कोणाला सांगायला नको. पण हे सारं एका सिनेमाच्या गाण्यात आणणं किती अवघड आहे! कोणाला वाटेल, शी! यात किती छचोरपणा आहे, किती उथळ आहे हे! ’गाणं’ काय असं असतं का? पण मी त्यांना सांगेन, की यातलं कवित्व बघा. थोडं मोकळं हसणं, ’शब्द’ अप्रिशिएट करणं तब्येतीसाठी चांगलं असतं, यू नो!

या मस्त गाण्यासाठी दाद द्या अमिताभ भट्टाचार्यला.👏

या निमित्ताने या अवली गीतकाराबद्दलही थोडं सांगायला हवं. लखनऊमध्ये शिक्षण संपवून ’गायक’ होण्यासाठी हा मुंबईत आला, अनेक ऑडिशन्स दिल्या, पण कोणीही गायला बोलावलं नाही. स्ट्रगल करता करता ’अमित त्रिवेदी’ नामक बुद्धीमान संगीतकाराशी याची भेट झाली. अमित ट्यून्स करायचा, त्यावर गीतकाराचे शब्द नंतर यायचे. टाईमपास म्हणून अमिताभ अमितच्या ट्यून्सवर ’रफ शब्द’ लिहायला लागला. लिहिता लिहिता त्याच्या लक्षात आलं की हे आपल्याला चांगलं जमतंय. अशात, त्याने लिहिलेली ’रफ गाणी’ ’देव डी’ नावाच्या सिनेमात तशीच्यातशी ठेवली गेली. ’तौबा तेरा जलवा तौबा तेरा प्यार, तेरा इमोशनल अत्याचार’ हे गाणं अमिताभचं ’रफ’ गाणं आहे! ’इमोशनल अत्याचार’ हा शब्द बोलण्यात नेहेमी वापरला जायचा, पण तो गाण्यात त्याने इतका पर्फेक्ट आणला, की ते गाणं हिट झालं. मग ’बलम पिचकारी’, ’बदतमीज दिल’, ’गलतीसे मिस्टेक’ असे आगळेवेगळे शब्दसमूह गाण्यात आणायचं त्याला वेडच लागलं. अर्थातच, ’कबीरा’ ’गेरुआ’, ’चन्ना मेरेया’, ’अभी मुझ में कही’ अशी अप्रतिम गाणीही त्याने लिहिलेली आहेत. त्याची गाणी ’smartly worded' असतात असं समीक्षकांचं म्हणणं आहे. आणि हे खरंही आहे. त्याचे शब्द ’काहीही’ वाटतात, पण त्यातही त्याचा इन्टेलिजन्स दिसतो.

बर्फी’ सिनेमातलं ’गलतीसे मिस्टेक’ या गाण्यात त्याने वयात आलेल्या एखाद्या मुलग्याला काय वाटत असतं याचं सहीसही वर्णन केलेलं आहे, तर ’बदतमीज दिल’ या गाण्यात सुरुवातीला जे ’जिबरिश’ त्याने लिहिलेलं आहे, तेही कमाल आहे. अमिताभच्या एकेक लिरिकल कल्पना ऐकताना खरंच मजा येते. तर, परत ’च्यवनप्राश’कडे येऊया... पुढे तर या गाण्यात ’अरनॉल्ड’, ’योगा क्लास’, ’शुगरफ्री डायट’ वगैरेही येतात 😂😂 ते कसे येतात, का येतात हे कळण्यासाठी तुम्ही पूर्ण गाणं ऐकायलाच हवं!

हे गाणं आहे ’भावेश जोशी- सुपरहीरो’ या सिनेमातलं. हा सिनेमा ब-यापैकी वेगळा असूनही, दुर्दैवाने अजिबात चालला नाही. म्हणूनच तर हे भन्नाट गाणंही मागेच पडलं. अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूर या सिनेमाचा नायक आहे, पण हे गाणं सिनेमात पार्श्वभूमीला वापरलंय. याच गाण्याचा एक प्रमोशनल व्हिडिओ केला आहे, त्यात अर्जुन कपूरही आहे! हे सगळं सांगितल्यावर गाणं ’पाहण्याची’ इच्छा कमी झालेली असणार आहे, कल्पना आहे मला 😉 पण त्यामुळे मूळ गाण्यावर अन्याय करू नका. ’दिव्य कुमार’ नावाच्या गायकाने या गाण्याला साजेल असा खणखणीत, रस्टिक आवाज दिला आहे. एखाद्या ऑडिओ स्ट्रीमिंग ऍपवर हे गाणं स्वतंत्रपणे ऐकता आलं तर ऐकाच, पण तोवर त्याचा व्हिडिओ शेअर करते आहे, तो जरूर ’ऐका’ आणि आनंद घ्या.

अरे हो, एक सांगायचं राहिलंच- संपूर्ण गाणं ’चुम्माधारित’ असूनही, मूळ गाण्यात आणि व्हिडिओतही एकही चुम्मा नाहीये हे विशेष! आय गेस, च्यवनप्राशरूपी चुम्मा हा प्रत्येकाने आपापला प्रायव्हेट मामला ठेवावा, हे गोड, नाजूक प्रकरण प्रदर्शनीय करू नये असं तर दिग्दर्शकाला सुचवायचं नसेल ना? 😊 एन्जॉय


 

0 comments: