मला कविता लिहिता येत
असती, तर ही गोष्ट मी निश्चितच एका कवितेच्या फॉर्ममध्ये लिहिली असती. पण दुर्दैवाने,
मला कविता लिहिला येत नाही. कविकल्पना मात्र भरपूर सुचत असतात. त्यातलाच एकीला दिलेलं हे शब्दरूप.
स्वप्न
हे असं घडावं असं स्वप्न
मी रोज बघत होते. एका अत्यंत अनपेक्षित ठिकाणी आपण दोघं अचानक भेटू… तू आधी गोंधळशील,
मग तुला आश्चर्य वाटेल आणि मग तू हसून माझ्याजवळ बोलायला येशील… अगदी असंच घडत होतं
आत्ता. नाटकाच्या तिकिटाच्या रांगेत मीही होते, तूही. तू तिकिटं काढलीस, मागे वळलास,
चार-पाच लोकांनंतर मी उभी! मला पाहून तू गोंधळलास, तुला आश्चर्य वाटलं आणि आता तू हसून
माझ्याशी बोलतो आहेस. मी स्वप्न बघितलं होतं तसंच तंतोतंत घडतंय...
आणि मी! मठ्ठपणे मुखदुर्बळासारखी
गप्प तुझ्यासमोर उभी आहे. मी ओळखीचं हसतेय तरी की नाही कोणास ठाऊक.
हे होणारच होतं. ’तू
माझ्याकडे पाहून हसतोस आणि माझ्याशी बोलायला येतोस’ इथे येऊन माझं स्वप्न संपतं. नेहेमीच.
त्यानंतर मी कसं वागते-हसते-बोलते-लाजते हे मी स्वप्नात कधी पाहिलेलंच नाहीये!
तू पाहिलं आहेस का
रे असं माझ्यासारखं स्वप्न कधी? मग सांग ना, आपण अचानक भेटल्यावर मी कशी वागते-हसते-बोलते-लाजते?
**************
5 comments:
छान !
Thanks Bob!
chhan lihil ahe ..
खुपच छान. पण मला अस का वाट्टय की तुला खरच अस स्वप्न पडल!!!
mast!
Post a Comment