काल ऑफिसमधे लंच करत असताना एकीनी तिची आजी गेल्याची बातमी सांगितली.. ती दोन दिवस आली नव्हती, आज आल्यावर हे कळलं. खूपच धक्का बसला होता तिला.. आजी ८७ वर्षाची होती तिची, घरातच गेली.. काहीही आजार नव्हता, वृद्धापकाळानी आलेला क्षीणपणा फ़क्त. एकही व्याधी नव्हती आजींना- बीपी, डायबीटीस तर नाहीच, पण ७-८ दातही शाबूत होते.. कवळी सुद्धा नव्हती! सकाळी उठून त्यांनी सर्व आन्हिकं स्वत:ची स्वत: उरकली, आंघोळ केली, देवाला नमस्कार करायला वाकल्या आणि गेल्याच! बापरे.. आम्ही ऐकता ऐकताच शहारलो. लंच अर्थातच नंतर अबोलपणे संपला.
नंतर जागेवर आले आणि सहजच विचार करत होते.. काय होतं ना या बायकांचं आयुष्य! साधारणपणे ७०-७५ वर्षापूर्वी यांनी संसाराला सुरुवात केली असेल.. वय अगदी लहान- तेराव्या किंवा चौदाव्या वर्षी लग्न- शिक्षण असेल किंवा नसेलही, असलं तरी शालेयच. त्या वेळची कुटुंबही किती मोठी.. घरात सहज १५-२० माणसं. ही बिचारी नवं लग्न झालेली मुलगी त्या गोंधळात पार हरवून जात असेल. ती भांबावली तरी तिला जवळ घेणारे, समजून घेणारे हात सुद्धा नव्हते त्या काळी. नवर्याशी मोकळेपणी बोलायची पद्धत नाही, सासू-जावा ही नाती अशी की त्यात मोकळेपणा अजूनही नाही, त्या काळी तर शक्यच नाही. तर अश्या पूर्णपणे अनोळखी वातावरणात संसाराला सुरुवात करायची.. घराच्या रगाड्यात स्वत:ला जुंपायचे. मोठे कुटुंब असल्यामुळे सासू जे काम देईल ते निमूटपणे करायचे. दिवसरात्र तेच- स्वयंपाक, रांधणे, घराची स्वच्छता, आल्यागेल्याचं करणं, स्वत:ची बाळंतपणं, मुलांची आजारपणं! मुलं जितकी होतील तितकी- ८, ९, १० कितीही.. त्यातली किती जगली, किती आजारपणामुळे, उपचाराअभावी गेली याची खंत कोणाकडे बोलून दाखवायची? सासूरवास पण चिकार असायचा त्या काळी.. शारिरीक आणि मानसिकही. नवरेही त्याकाळी ’बायकोला समजून घेणारे’ वगैरे कमीच. पैसेही बेताचेच मिळायचे, त्यामुळे हौसमौज, बाहेर खाणं, हिंडणं-फिरणं, सिनेमे पहाणं तर अशक्य कोटीतल्या गोष्टी! एखादी जाऊ किंवा नणंद बरी असेल तर तिच्यापाशी मन मोकळं तरी करता येत असेल, नाहीतर कुढणं हेच नशीबी. अर्थात कालांतरानी यातलं सगळंच कमी झालं, या पिढीचा त्रासही कमी झाला. मुलं शिकली, परिस्थिती सुधारली.. पण ऐन तारुण्य तसं म्हणलं तर हालाखीचच. पण या बायका मनानी फारच खंबीर. संसारात जे पुढे आलं ते निमूटपणे सोसलं, आहे ते गोड मानून घेतलं. पुढे परिस्थिती बदलल्यानंतर ते बदलही स्वीकारले. नाती कमी झाली, मुलं परगावी गेली, तीर्थयात्रा घडल्या, थोडीफार हौसमौजही झाली. देवकृपेनी यातील बर्याच बायकांना दीर्घायुष्य मिळाले. अतोनात कष्टांपासून ते सुखासीन आयुष्यपर्यंत- किती मोठी स्थित्यंतरं आली आणि सगळीच पचवली त्यांनी.
आणि आज! मी आणि माझ्यासारख्या लाखो बायका स्वत:ला ’सूपरवूमन’ म्हणवण्यात धन्यता मानतो. कारण आम्ही शिकलेल्या आहोत, कमावत्या आहोत. घर, मुलं आणि ऑफिस सगळं व्यवस्थितपणे ’मॅनेज’ करतो. पण आम्हाला कितीतरी सोयी उपलब्ध आहेत, आणि म्हणून आम्ही उभ्या आहोत याचा विसर पडतो कधीकधी. कामवाली बाई माझं घर स्वच्छ करते, पाळणाघरात माझं मूल वाढतं, नवर्याचं तर प्रत्येक बाबतीत सहकार्य असतं. ऑफिसमधेही बॉस, कलीग्स अडचणी समजावून घेतात. सासूरवास आम्हाला नाहीच, कारण आम्ही मुळात स्वतंत्र रहातो, किंवा बरोबर रहात असलो तरी कोणतीच गोष्ट मनाविरुद्ध आम्ही सहन करत नाही. नातेवाईक, आलागेला ही संकल्पना तर आता जवळजवळ संपुष्टात आली आहे. कोणी आलं तरी आमची वेळ आणि सोय पाहून, फोन करून येतं. अश्या सर्व सोयी जेव्हा असतील तेव्हाच आणि त्यांच्याच बळावर आमचं आयुष्य सुरळीत सुरु असतं. यातलं एक जरी काही नसेल तर ’आमच्यावर अन्याय होतोय’ असं वाटतं आम्हाला.
मग असं असताना ’सूपरवूमन’ ही बिरूदावली मिरवायला आम्ही योग्य आहोत की या ३-४ पिढीपूर्वीच्या बायका?- माझ्या दृष्टीने याच बायका खर्या अर्थानी सुपरवीमेन. यांच्या कष्टांचं ना कधी चीज झालं आणि यांचं कर्तृत्व कायमच डावललं गेलं. They never got their due! ’तुम्ही काय विशेष केलं’ असा प्रश्न कदाचित आजही विचारला जाईल त्यांना. पण आपण कल्पनाही करू शकणार नाही अश्या प्रतिकूल परिस्थितीला, अनेक संकटांना यशस्वीपणे, स्वत:च्या हिंमतीवर तोंड दिलं त्यांनी. अत्यंत स्वावलंबी आणि कणखर होत्या या बायका. आणि मला खात्री आहे, त्यांना संधी मिळाली असती तर नक्कीच त्यांनी स्वत:च्या एकटीच्या बळावर उज्ज्वल यशही मिळवलं असतं.
या समस्त ’सूपरवीमेन’ना माझा प्रणाम!
July 27, 2007
July 16, 2007
सोयराबाई
’श्रीमनयोगी’ आणि ’छावा’ ही पुस्तकं वाचल्यानंतर शिवाजीमहाराजांचा थोरपणा आणि संभाजीची तडफ याबरोबरच लक्षात येतो सोयराबाईचा सत्तेचा ध्यास आणि त्यापायी स्वराज्याच्या स्वप्नाचं झालेलं नुकसान. सोयराबाई शिवाजीमहाराजांची द्वितीय पत्नि. अप्रतिम लावण्यवती होती. तिचं माहेर म्हणजे मातब्बर सरदार मोहित्यांचं घराणं. सोयराबाई दिसायला जितकी सुंदर तितकीच मनानी कुरुप. जबरदस्त महत्त्वाकांक्षी स्त्री होती ती. ’सत्तापिपासू’ म्हणू शकू इथपर्यंत.
संभाजी दोन वर्षाचे असतानाच त्यांच्या आईचा, सईचा अकाली मृत्यु झाला. त्यांचं पालन-पोषण त्यांची दूध-आई ’धाराऊ’ हिने केले आणि संस्कार जीजाबाईंनी. संभाजी स्वभावाने निर्मळ आणी संवेदनशील. वास्तविक तेव्हाच सोयराबाईने त्यांना ममतेनी जवळ घेऊन माया लावली असती तर कदाचित माराठेशाहीचं चित्र पुढे वेगळं दिसलं असतं. पण तिने कायमच संभाजीला ’सावत्र’ नजरेनी पाहिलं. शिवाजीमहाराजांचेच आदर्श त्यांच्यासमोर असल्याने ’रयतेचा राजा’ म्हणजे काय हे संभाजींना पुरेपूर ठाऊक होते आणि ते तसे आचरणही करत होते. मात्र हेच सोयराबाईला बघवले नाही.
मराठेशाहीला आकार दिला, वाढवले शिवाजीमहाराजांनी आणि तिची जोपासना करणे, तिचे साम्राज्य पूर्ण भारतात पसरवणे यासाठी संभाजी समर्थ होते. सुदैवाने मराठेशाहीचा योग्य असा दरारा चहूकडे निर्माणही झाला होता. खुद्द औरंगझेबाचं आसन तिथे दूर दिल्लीत अस्वस्थ झालं होतं. पण राज्याच्या हितापेक्षा स्वत:च हित जास्त मोठं ठरलं. सोयराबाईला येनकेनप्रकारे सत्ता हवी होती. तिने तिच्यासारखेच लोक हेरले, निवडले आणि पद्धतशीरपणे कामाला लागली. सर्वप्रथम शिवाजीमहाराज आणि संभाजी यांच्यात दुरावा आणणे अत्यंत जरूरीचे होते. एकदा का महाराजांच्या मनात संभाजीबद्दल किन्तु निर्माण झाला की संभाजीला एकटे पाडणे अवघड नव्हते.
पहिली संधी मिळाली सोयराबाईला ’गंगू’च्या निमित्ताने. गंगू ही आण्णाजी दत्तो सुरनिस यांची मुलगी. संभाजी आणि तिची भेट झाली होती राजगडाच्या देवळात. या एकाच गोष्टीचे भांडवल करून सोयराबाईने त्या दोघांबद्दल घाणेरड्या अफवा पसरवल्या. संभाजी हे रातोरात ’स्त्रीलंपट’ ठरले. ज्या महाराजांनी परस्त्रीकडे चुकूनही पाहिले नाही, खुद्द त्यांचाच मुलगा ’बाहेरख्याली’ ठरवला गेला. दुर्दैवानी हे असले आरोप सहन न झाल्यामुळे गंगूनी जीव दिला आणि समोरासमोर या आरोपांची शहानिशा होऊ शकली नाही. नाहीतर संभाजी आणि गंगूच्या मनात काहीच नव्हते हे सहज सिद्ध होऊ शकले असते. पण या सर्व प्रकाराने शिवाजीमहाराज कुठेतरी दुखावले गेलेच. पण याच प्रकरणामुळे आण्णाजी दत्तो यांच्या रूपात संभाजीला एक कायमस्वारूपी शत्रू मिळाला. हेच आण्णाजी दत्तो संभाजीराजेंच्या विरुद्ध केलेल्या प्रत्येक कटात सहभागी होते. पहिला कट फसून त्यांचे नाव उघडकीला आल्यानंतरही, संभाजींनी त्यांना माफ करून ’मुजुमदारी’ दिली होती. पण त्यांच्या मनातली द्वेष कमी झाला नाही. संभाजींच्याच जीवावर उठले ते. शेवटी हत्तीच्या पायाखाली त्यांचा अंत झाला. क्षणभरतरी त्यांनी सद्सदविवेकबुद्धीला स्मरून ’आपली मुलगी आणि प्रत्यक्ष युवराज असं करू धजतील का?’ इतक्या साध्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी शोधले असते तर पुढच्या बर्याच अप्रिय गोष्टी टळल्या असत्या.
सर्वात मोठं कारस्थान रचलं सोयाराबाईने जेव्हा शिवाजीमहाराज कर्नाटक स्वारीच्या निमित्ताने ३ वर्षं दूर होते. गडाच्या बातम्यांच्या निमित्ताने सतत संभाजींविरुद्ध बातम्या पुरवणे, पराचा कावळा करणे, खोट्यानाट्या अफवा पसरवणे हे तिने पद्धतशीरपणे केले. दिलेरखानाच्या गोटातून खोटे खलिते संभाजींच्या नावे पाठवणे आणि असे भासवणे की संभाजी आणि दिलेरची दोस्ती आहे, संभाजी महाराजांच्या जीवावर उठले आहेत अश्या अफवा पसरवणे यात ती आणि तिचे साथीदार पुढे होते. दुर्दैवाने महाराज जेव्हा परत आले तेव्हा त्यांचा या सर्वावर विश्वास बसला आणि त्यांनी संभाजीची भेट नाकारली. कधीकधी एक खोटं सातत्यानी खरं म्हणून समोर आणलं गेलं तर तेच खरं मानलं जातं त्यातलाच प्रकार हा. इथे जरका असे गैरसमजाचे वादळ पसरले नसते तर इतिहास बदलला असता का? खर्याखोट्याची शहानिशा झाली असती तर सोयराबाईचे पितळ उघडे पडले नसते? पण तसे होणे नव्हते. परस्पर गैरसमज इतक्या थरला गेले आणि परिस्थितीच अशी विचित्र झाली की संभाजी चक्क दिलेरखानाला जाऊन मिळाले. ही सर्वात मोठी आणि दुर्दैवी चूक संभाजींची. परिस्थिती कशीही असो, शत्रूला जाऊन मिळणे हा कधीही अक्षम्य अपराधच. त्या निमित्ताने सोयराबाईला एक नवीन अस्त्र मिळाले आणि संभाजींवर एक कायमचा डाग लागला.
नंतर संभाजींना पश्चात्ताप झाला आणि ते परत आले, महाराजांनीही त्यांना पुन्हा राज्यकारभारात सामावून घेतलं आणि सर्व काही सुरळीत होतंय असं वाटत असतानाच सोयराबाईनी पुन्हा विषप्रयोगाचं अस्त्र काढलं. शिवाजीमहाराजांवरचा पहिला विषप्रयोग असफ़ल झाला होता. पण तेव्हा संभाजी महाराजांबरोबर होते, नामांकित वैद्य सेवेस होते आणि समर्थ रामदासांचे शिष्यही तत्पर होते. दुसर्या वेळी तिने बरोब्बर डाव टाकला. संभाजी मोहीमेवर होते, मातब्बर आणि विश्वासू सरदारही असेच गुंतले होते. हीच वेळ साधून, महाराजांना एकटे गाठून तिने महाराजांवर दुसरा आणि अत्यंत घातक विषप्रयोग करवला. कल्पना करा ही स्त्री सत्तेच्या हव्यासापायी किती अंध झाली होती. प्रत्यक्ष नवर्यावर विषप्रयोग.. आणि तिचा नवरा काही साधासुधा, सामान्य होता का? राज्याभिषेकाचा संस्कार झालेले ’छत्रपति’ होते ते. एक स्वप्न उराशी बाळगून होते ते आणि ते स्वप्न स्वराज्याचं होतं. तिथे व्यक्तिगत हेवेदावे आणि अधिकारांना कुठे स्थान होतं? पण सोयराबाईला सत्तेपुढे सारंच गौण होतं. आणि सत्ता मिळवून असे करणार तरी काय होती? ना तिच्याजवळ दूरदृष्टी होती ना लोकांना बांधून ठेवण्याची हातोटी, ना राज्यकारभार चालवण्याची क्षमता.
सोयराबाईनी संभाजींना संपवण्यासाठी दोनदा कारस्थान केलं. दोन्ही वेळा ते फसलं. पहिल्याच वेळी, शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर लगेचच तिने त्यांची पुण्याई वापरून त्यांच्या निष्ठावान सरदारांना संभाजींविरुद्ध भडकवलं आणि त्यांचा पाठींबा मिळवला. पण संभाजी शेवटी शिवाजीचेच रक्त. ते तिच्या हाती आलेच नाहीत, उलट तिचा कट तिच्याचवर उलटला. हा कट फसल्यानंतर आणि दगाबाजांची नावं उघडकीला आल्यानंतरही संभाजीमहाराजांनी सगळ्यांना माफी दिली, इतकंच नाही तर राज्यातल्या जबाबदारीच्या जागाही दिल्या. यातही नवल म्हणजे सोयराबाईचे सख्खे बंधू ’हंबीरराव मोहिते’ हे शेवटपर्यंत स्वराज्याचे सच्चे सेवक राहिले. ते सोयराबाईच्या कटकारस्थानांना कधीही प्रोत्साहन दिले नाही. उलट ते कायम संभाजींबरोबर राहिले. ’सरलष्कर’ म्हणून त्यांच्या मावळ्यांचं नेतृत्त्व केलं त्यांनी आणि शेवटी लढाईच्या मैदानावरच त्यांच्या पराक्रमाला साजेसं वीरमरण आलं त्यांना. याच वेळी मराठेशाही अनेक पातळ्यावर सर्व शत्रूंशी झुंझत होती- इंग्रज, पोर्तूगीज, सिद्दी आणि सर्वात मोठा मुगल- औरंगझेब स्वत: दख्खनेत उतरला होता. या व्यवधानात संभाजींना घरून भक्कम पाठींबा हवा होता. पण बाहेरचे शत्रू परवडले असे हे घरातलेच शत्रू होते.
संभाजींविरुद्धचा दुसरा कटही उघडकीस आल्यानंतर मात्र संभाजींनी कोणाचीच गय केली नाही. सर्व सहभागी दगाबाज हत्तीच्या पायाखाली चिरडले गेले. सोयराबाई या त्यांच्या मातोश्री, आणि राज्याच्या महाराणीही. त्यांना अर्थातच अशी शिक्षा ते देऊ शकत नव्हते. अर्थात देहदंडाला ती तितक्याच ताठ मानेनी सामोरी गेली असती, पश्चात्तापाचा लवलेशही तिला कधी झाला नाही... तिची मान कायमच ताठ राहिली. शेवटी पूर्ण एकटी पडल्यानंतर आणि बाकी सगळे मार्ग बंद झाल्यानंतर सोयराबाईने आत्महत्या केली- तीही विष घेऊनच!! दैव, दुसरे काय! ज्या विषाने खुद्द शिवाजीमहाराजांचा जीव घेतला, जो विषप्रयोग संभाजींवर फसला, त्यानेच शेवटी सोयराबाईचाही घोट घेतला. पोएटीक जस्टिस म्हणतात हो हाच का?
सत्तेची आस या पलिकडे सोयराबाईने काय मिळवले? ’महाराणी’, ’पट्टराणी’ ती होतीच. शिवाजीमहाराजांच्या राणीवश्यावरही तिचा वचकही होता. मात्र सत्तेची हाव ठेवल्यामुळे सर्वच नातेसंबंधांपासून ती दूर झाली. अलोट प्रेम, माया अशी कोणावर तिने केली नाही, ना ही तिला कधी कोणाचे मिळाले. राजारामांनांही तिने स्वत:च्या तालमीत तयार केले नाही. उलट कायम तिच्या छायेखालीच राहिल्यामुळे ते मनानीही शरीराप्रमाणेच कमकुवत राहिले. आपल्या जवळच्या माणसांवर प्राणघातक हल्ले तेवढे करवले तिने. अगदी सत्ता तिच्या हाती आली असती तरी ती किती टिकली असती हाही एक प्रश्नच आहे. त्यापेक्षा तिने संभाजींना माया लावली असती तर त्यांनी आपणहोऊन सर्व सूत्र तिच्या हातात दिली असती, इतके ते हळवे आणि सत्तेचा मोह नसलेले होते. सोयराबाईची महत्वाकांक्षा आणि संभाजींचा पराक्रम यांनी मराठेशाही शिवाजीमहाराजांनंतर खूप पुढेही गेली असती कदाचित, कोण जाणे! पण अंतर्गत हेवेदावे आणि स्वार्थी वृत्ति यांनी मराठी लोकांना कायमच ग्रासले आहे. ज्या शिवाजीमहाराजांनी कधीही स्वत:ला राज्यहितापुढे, लोकहितापुढे मोठे पाहिले नाही, त्यांच्याच घरात अशी सत्तांध फांदी वाढावी याची खूप खंत वाटते. कोणीच ’सोयरा’ नसलेली आणि कशाचच ’सुतक’ नसलेली सोयराबाई खर्या अर्थानी मराठेशाहीची पहिली खलनायिका ठरली.

Labels:
ललित
July 6, 2007
अंतर
"प्रिया, आम्हाला नवीन प्रोजेक्ट मिळालय.. US चा क्लायंट आहे. मी हेड असेन त्याचा.."
"वा. छान बातमी आहे.."
"हो. काम चांगलं असेल, नवा अनुभव पण मिळेल.. रमणनी मोठ्याच विश्वासानी ही responsibility दिलीये.. पण I am happy and quite excited ! अगं पण एक होणारे.. US चा client असल्यामुळे मला शिफ़्ट ड्युटी असणारे.. "
"ई? खरच? म्हणजे किती ते किती?"
" mostly दुपारी २ ते १०"
"ही कसली वेळ रे? १० म्हणलं की सहज ११ तुला ऑफिसातच होतील.. पुन्हा जायला यायला अर्धा अर्धा तास.. आणि हे किती दिवस?"
"अगं दिवस कसले? ६-८ महिने तरी"
"शी फ़ारच बोर आहे हे.. तू कसं काय accept केलस हे? माझी शाळा सकाळी ७.३० ते १२.००.. मी जेमतेम घरी येते तोवर तू ऑफिसला जाणार.. आणि चिनुला तर कधी भेटणार तू? बोर होईल ती फ़ार.."
"अगं वीकेंड असेल ना आपलाच.. त्यात काय.. हे इतकं मोठ prestigious project मिळालं मला की हे असले विचार सुद्धा आले नाहित मनात माझ्या.. whats the big deal? चल, उद्या मस्तपैकी जेवायला जाऊ Goa express मधे celebrate करायला, ओके?"
--------------
"प्रिया, उठ.. अशी सोफ़्यावर का झोपलीयेस?"
"आलास का? अरे तुझी वाट पाहता पाहता झोपच लागली.. किती वाजले? पावणेबारा.. बापरे किती उशीर रे.."
"हो, एक महत्त्वाचे काम करायचे होते.. मग झाला उशीर.. पण तू अशी का झोपली आहेस?"
"हां! अरे अरविंदरावांना ऍडमिट केलय.. घरात घसरून पडले. प्लास्टर घातलय. उद्या त्यांना भेटून ये सकाळी. मी जाऊन आले आज संध्याकाळी. तुझा सेल का बंद होता रे? "
"बापरे! कसे काय पडले अचानक? या म्हातार्या लोकांच काही कळतच नाही.. आता आला ना ताप मावशीच्या डोक्याला?"
"ताप काय? ते काय मुद्दामहून पडले का? काहीतरीच बोलतोस! "
"बरं चल, कंटाळा आलाय फ़ार.."
"ते एक, आणि ईलेक्ट्रिकचं बिल पण भरशील का? त्याच बाजूला आहे ऑफिस.."
"मीच का? आयला, हे बर झालं तुला.. दिवसाची कामं पण मीच करायची, आणि रात्री ऑफिसात आहेच पुन्हा.."
"असं काय बोलतोस रे? त्या बाजूला आहे, तुला वेळही आहे म्हणून म्हणले.. नाहीतर मी शनिवारी भरते आहेच.. बघ तुला जमलं तर.."
----------------
"बापरे, फ़ारच उशीर झाला नाही?"
"उशीर तर उशीर, एवढ काय? पण मजा आली ना पार्टीला?"
"मजा आली रे, पण मी फ़ारस कोणाला ओळखत नाही ना..मला जरा एकटं पडल्यासारखं झालं.. चिनुनी एंजॉय केलं पण.. २-४ मुलं होती ना, आणि महत्त्वाचं म्हणजे तू होतास... "
"हो हो. आधी तर चिकटूनच होती मला.. म्हणलं ही अशी चिकटली तर कसं बोलणार मी कलीग्जशी.. पण ती मुलं होती म्हणून thank God ! आज मनोज आणि हरीशी चांगली ओळख झाली.. हे पण सीनीयर्स आहेत.. यांच्याकडे visibility असली की बरं असतं.. मग चांगली projects मिळतात. म्हणून असल्या पार्ट्या अटेंड करणं मस्ट झालय. एरवी कुठे वेळ असतो नाहीतर त्यांना.."
-----------------
"अरे वा, आज मॅडम चक्क जाग्या.."
" ह्म्म. तुझी वाट पहात होते रे..'चष्मेबद्दूर' लागलाय तो पहात पहात म्हणल तुझी वाट पहावी.."
"सिनेमे तसे रोजच असतात की, पण तु कधी जागी रहात नाहीस मी येईपर्यंत.."
"तसं नाही रे.. तुला आजकाल फ़ारच उशीर व्हायला लागलाय रे.. ११.३० नंतरच येतोस तू जवळपास रोज.. मला ५ला उठावच लागतं सकाळी माहिते तुला.. या तुझ्या शिफ़्टच्या आधी तरी कधी जागत होते मी? सकाळची शाळा, दुपारच्या शिकवण्या.. संध्याकाळी इतकं बोर होतं की तेव्हाच झोप येत असते खरतर, पण कशीबशी चिनु झोपेपर्यंत तरी थांबते"
"मग आज काय विशेष ते सांग"
"अरे काहीच नाही, अगदी सहज. सिनेमा लागला छान, म्हणल थांबून पाहू..येतोस तरी कधी ते.."
"हं काम फ़ारच आहे या प्रोजेक्ट मधे.. आणि co-ordination करायचे आहे ना तिकडच्या लोकांशी म्हणून असं शिफ़्टमधे काम करणं भाग आहे. मी रमणला जरा मस्का लावतोय की मीच जातो US ला म्हणजे हे सगळे त्रास नकोत!"
" USA ला? अरे बापरे.. म्हणजे तर तू दुर्मिळच होशील आम्हाला.. "
"अगं पण प्रोजेक्टची मागणी असेल तर जायलाच लागेल. लोक जाऊन जुनी झाली.. मस्त ऐश करतात.. मी इतकी वर्ष आहे इथे, पण मला एकदाही chance लागला नाही अजून.. तूही खुश व्हायला हवस खरंतर, पण तुझं काहीतरी तिसरच.."
"अजित, तसं नाही रे.. मी म्हणत होते की इथे एकाच घरात राहून आपण भेटत नाही, तर तू US ला गेल्यावर तर.."
"काही होत नाही गं... मी कायमचा जाणारे का? काही महिने फ़क्त. आणि benefits बघ ना.. increment, bonus, performance incentive, onsite experience, big dollars सगळे प्लसेसच प्लसेस आहेत.. हो की नाही? काम आहे या प्रोजेक्टमधे पण मी खुश आहे ते याचसाठी.."
--------------------
"अरे.. आज १०लाच आलास..! चिनु आत्ताच झोपली बघ.."
"हं, काम लवकर संपल म्हणून.. आता सेटल होतय ना हळूहळू.."
"वा! रोजच येत जा तू असा.. छान वाटतं"
"रोजचं मी सांगत नाही हं! आज आलोय तर तू लगेच सुरु झालीस की.."
"बरं बाबा जमेल तसं ये, पण ये.. हे बघ..."
"हे काय? ग्रीटींग? कोणी दिलं? तुला? का? आज काय विशेष? आज वाढदिवस तर नाही तुझा.."
"अरे आज शिक्षकदिन नाही का? शाळेतल्या मुलांनी दिलं ते आणि हे अजून एक शिकवणीच्या मुलांनी, आणि काळे सरांनी आज सगळ्यांना हे छोटे बुके दिले.. छोटा पण छान आहे ना?"
"वा, मजा झाली की मग तुमची आज.. आज मॅडम डीमांडमधे होत्या तर.. काळे सरांनी फ़क्त फ़ुलंच दिली का अजून काही पण? आमच्या तर लक्षातही नाहीत हे असले दिवस.."
"हो रे, तू फ़ार बिझी आहेस ना.. बरं मी काय म्हणते दिवाळीत जायचं का आपण कुठे फ़िरायला ४ दिवस?"
"काय वेडीबिडी आहेस का प्रिया? इथे मी गळ्यापर्यंत बुडालोय कामात आणि तुला फ़िरणं सुचतय?"
"अरे, आत्ताच म्हणालास ना की होईल सुरळीत म्हनून.. झाले ना ४ महिने आता असं काम करून.. आपण किती दिवसात मनमोकळं बोललो नाही, फ़िरलो नाही कुठे.. वीकेंडला कामच असतात इतकी.. पटकन येतो आणि जातो.."
"कबूल आहे मला सगळ.. पण सॉरी, नाही जमणार मला.. मे महिन्यात पाहू.."
-------------------
"बाबा आपल्याकडे दिवाळीच्या सुट्टीत अनुमावाशी, काका आणि अबोली, आभा येऊदेत?"
"कधी यायचा प्लॅन करत आहेत? आणि तू मला काही बोलली नाहीस प्रिया.."
"अरे काल संध्याकाळीच फोन आला होता.. चिनुला राहवेना....
" "सांगा ना बाबा.. दिवाळी झाली की मला सुट्टी आहे आणि आईलाही.."
"तुला सुट्टीतला अभ्यास नाही का चिनु? "
"तो मी करीन की बाबा.. युनिट्स मधले माझे मार्क पाहिलेत ना?"
"अजित, अरे करेल manage ती.. terminals चा पण अभ्यास मन लावून करतिये ती.. आपलं बाहेर जायचं बारगळलं त्यामुळे नाराज आहे, थोडी cheerup होईल.."
"म्हणजे तुम्ही ठरवलंच आहे सगळं.. येऊदेत की मग. पण मला दिवाळीत २च दिवस सुट्टी असेल हं. त्यांना मी वेळ नाही देऊ शकणार.. चालेल ना? मागाहून बोलायचे नाही की तू त्यांच्याशी बोललाही नाहीस म्हणून.."
"अरे, असं कसं म्हणीन.. मलाही दिसतंय ना तू किती बिझी आहेस ते.. तेही काही म्हणायचे नाहीत. दिवाळीचे दिवस संपले की येतील ४ दिवस. आम्हालाही change ..
"मला कधी change मिळणार काय माहित.."
"अरे मग काढ की तूही २ दिवस.. खूप मजा येईल"
"हो ना बाबा, घ्या की तुम्ही सुट्टी.."
"शक्य नाहिये ते, नाहीतर मलाही मजा करायला आवडली असतीच की.. चिनु, your baba is working on an important project, u know.. so नो सुट्टी, फ़क्त काम!! तुम्ही करा ऐश.."
------------
"हे काय, तू या ड्रेसमधे?"
"अरे आत्ताच येतीये बाहेरून"
"आत्ता या वेळेला कुठे गेली होतीस? आणि कोणाबरोबर? मला सांगितलं नव्हतंस काही.. आणि चिनु? तिला घेऊन गेली होतीस का एकटीच होती?"
"४ला फोन आला रे.."
"कोणाचा?"
"अरे सांगू तर देशील.. सुजाताचा फोन आला ४ ला.. ६.३०ला 'आयुष्यावर बोलू काही'चा प्रयोग होता आणि तिच्याकडे extra ticket होते, तर येतेस का अस विचारलं तिनी.."
"कसला प्रयोग हा म्हणे?"
"अरे मराठी कविता आणि गीतांचा संदीप खरे आणि सलील कुलकर्णींचा खूप फ़ेमस प्रोग्रॅम आहे. मीही ऐकूनच होते फ़क्त. जायची खूप इच्छा होती.."
"हो ना.. मला ते तसलं काही आवडत नाही.. माझ्यामुळे तुला जाता येत नाही असच ना?"
"असं म्हणलं का मी? "
"आणि चिनुला काय घरात कोंडून गेलीस की काय मग?"
"असं बोलवतं कसं तुला अजित? अशी जाईन मी? खाली आजी आजोबा राहतात. त्यांना सांगितलं एक दिवस.. त्यांनाही काही वाटलं नाही आणि चिनुलाही.. तुलाच का राग येतोय?"
"त्यांना वाटलं तरी काही बोलायचे नाहित ते.. आणि चिनु काय बोलणार तुझ्यापुढे?"
"त्यात बोलण्यासारख काहीच नाही म्हणून बोलले नाहीत ते. चुकुन कधीतरी मी एकटी बाहेर जाते, ते समजून घेतात. आणि आता चिनुकडे बघावं लागत नाही.. फ़क्त सोबत लागते तिला.. खालीच झोपलीये ती आज"
"पण इतकं काय अडलं होतं तुझं?"
"प्रश्न अडण्याचा नाहिये अजित.. हा कार्यक्रम छान असतो, तो अचानक बघायची संधी मिळाली, घरचं सगळं करून गेले मी, that's it . issue तू बनवतोयेस.. आज लवकर आलास म्हणून कळलं तुला, नाहीतर अजून तासानी आला असतास तर तुला मी सांगेपर्यंत काही कळलही नसतं"
"अच्छा! म्हणजे असं काय काय लपवलं आहेस तू माझ्यापासून? कुठे कुठे आणि कोणाबरोबर भटकत असतेस कळूदे तरी.."
"भटकत? काय बोलतोयेस, समजतय तुला? माझी शाळा, शिकवण्या आणि थोड्या मैत्रिणी या व्यतिरिक्त कुठे जाते मी? आणि जाईन असं वाटतय तुला? तुला काय suggest करायचंय? तू तुझ्या कामात कायम बिझी.. त्याबद्दलही काही म्हणणं नाही माझं, कारण शेवटी कामच आहे तुझं ते.. पण म्हणून मला काही आयुष्यच नाही का? फ़क्त तुझंच ऐकायचं का? तू का नाही असा विचार करत की कवितांमधे आपल्याला interest नाही तर हिला पाहुदे.. तू तुझ्या मित्रांसोबत जाऊन सिनेमे पाहतोस तेव्हा कधीतरी त्रागा केलाय मी? हे तुझं project सुरू झाल्यापासून तुझी चिडचिड वाढलीये.. आत्तापर्यंत काहीच बोलले नाही.. पण म्हणून तू काहीही बोलायला लागला आहेस. प्रत्यक्ष बायकोवर संशय? शी अजित! ’मी किती ग्रेट आहे, मी किती पैसे मिळवतो, ऑफिस मधे मला कसे विचारता” या पलिकडे तू जातच नाहियेस सध्या.. कधी माझी, चिनुची, तुझ्या आईबाबांची चौकशी तरी केलीस? माझ्या शाळेची वेळ तुझ्या सेकंड शिफ़्टशी clash होते म्हणून माझी नोकरी ’फ़डतूस’ असं म्हणाला होतास आठवतंय? पण तो माझा विरंगुळा आहे, मीही काही करू शकते हा आत्मविश्वास मला मिळतो असा विचार नाही करत तू.. इतका त्रास होतो तर तू का नाही बाहेर पडत या प्रोजेक्ट मधून? दुसरं प्रोजेक्ट सहज मिळेल तुला.. पण तुझा ईगो तुला परवानगी देत नाही ना.. त्याची सगळी चिडचिड माझ्यावर.. एक रविवार मिळतो आपल्याला.. पण तोही तू कधी एकदा ही सुट्टी संपतीये असं वागतोस.. ताणतणाव मलाही आहेत, पण विचारलेस कधी तू मला? तुझ्या रूटीनमधे काही आलेल चालत नाही तुला म्हणून तुझे मूड सांभाळून सगळं manage करते मी... सगळंच तुझ्या नजरे आड जातय अजित?"
"ओके ओके. I am sorry about that comment . पण म्हणून इतकं lecture कशाला देतेस? सवयच झालीये तुला बडबड करायची.. माझे frustrations कसे समजणार तुला? मी घरी यावं तर तू झोपलेली, सकाळी कोणी घरी नाही.. दुपारी जेवताना कितीसं आणि काय बोलणार.. promotion मिळवायचं असेल तर हे प्रोजेक्ट किती प्रतिष्ठेचं आहे हे तुला काय समजणार.. आणि the fat paycheck I bring in every month? तो बरा नजरेआड होतोय तुझ्या? आणि या पुढे असंच होणार.. मला तुमच्यासाठी वेळ नसणारे.. आणि आता इच्छाही होत नाही.. चिनु मोठी होतीये.. तुला तुझी शाळा, घरकाम आहे.. I feel lost out .. तुम्ही दोघी आणि मी एकटा अस विश्व झालं आहे.. मला ऑफिसचं कामच बरं वाटतं त्यापुढे.. lets accept these facts and live, ok? "
एकाच घराच्या एकाच खोलीत असूनही किती अंतर पडलं होतं दोघांमधे.. न भरून येणारं अंतर...
समाप्त

कथा
Subscribe to:
Posts (Atom)