October 30, 2025

या वर्षी दिवाळी अंकांतले माझे लेखन 😊

 या वर्षी पाच दिवाळी अंकांमध्ये लिहिण्याची संधी मिळाली😊

 "इलॉन मस्क" या बहुचर्चित अमेरिकन उद्योगपतीचा परिचय "अक्षरमुद्रा"मध्ये आहे. 
 
सध्याच्या ट्रेडिंग Q Commerce म्हणजेच Quick Commerce ची माहिती, फायदे आणि तोटे यांच्याबद्दल मी "अनुराधा"मध्ये लिहिले आहे.  
 
 
या वर्षी हॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते जीन हॅकमन आणि त्यांची पत्नी बेट्सी अराकावा यांचा त्यांच्या राहत्या घरीच अतिशय दुःखद मृत्यू झाला. मृत्यूचे कारण आणि घटनाक्रम सगळ्यांना बुचकळ्यात टाकेल असा होता. त्याबद्दल आणि एकूणच एकटेपणा, खासगीपणा यावर मी या वर्षीच्या "नवल"मध्ये लिहिले आहे. लेखाचं नाव आहे, "विचित्र नेमानेम". जरूर वाचा. अर्थातच, नवलच्या लौकिकाप्रमाणे एकूण अंकही जबरदस्त झाला आहे.
 
 
तुमचा योगायोगांवर विश्वास आहे? 😊 एका अनोख्या योगायोगाची "भेटीत तुष्टता मोठी" ही कथा या वर्षीच्या "मानिनी" दिवाळी अंकात मी लिहिली आहे 😊 बाकी अंकही दर वर्षीप्रमाणे उत्तम आहे. "मानिनी"मध्ये प्रकाशित झालेली माझी ही तिसरी कथा आहे. हा योग दर वर्षी येवो, अशी आशा😊
 
"निर्मळ रानवारा" हा एक सुंदर दिवाळी अंक आहे, खास लहान मुलांसाठी. त्यात मी अनेक वर्षांनी एक बालकथा लिहिली आहे 😊 बालकथा लिहिताना नेहेमीच धाकधूक होते, पण ही बरी जमली आहे, असं वाटत आहे 😊 आपल्या तिरंग्यात हेच तीन रंग का, ते सांगणारी ही गोष्ट नक्की वाचा आणि छोटू कंपनीलाही वाचायला द्या. अंकात भरपूर गोष्टी, चित्र, कोडी असा मुलांना आवडेल असा content ही आहे. दर वर्षी मुलांसाठी काहीतरी लिहिण्याचा मी नक्की प्रयत्न करणार आहे. "निर्मळ रानवारा" या अंकायोग्य काहीतरी लिहून व्हावे, हीच इच्छा
🙏
 
 
"हंस", "नवल" आणि "मोहिनी" हे उत्कृष्ट साहित्यमूल्य असलेले दिवाळी अंक म्हणून सुप्रसिद्ध आहेत. या अंकामध्ये आपलंही साहित्य प्रसिद्ध व्हावं अशी मनापासून इच्छा होती. चार वर्षांपूर्वी "हंस" साठी कथा पाठवली होती, पण काही अपरिहार्य कारणांमुळे ती स्वीकृत होऊनही प्रसिद्ध होऊ शकली नव्हती 🙁 या वर्षी त्यांपैकी नवल मध्ये प्रथमच माझा लेख आला, म्हणून फार मस्त वाटत आहे 😊 😇
 
तुम्हीही हे आणि भरपूर दिवाळी अंक नक्की वाचा आणि मी लिहिलेले काही वाचले, तर जरूर प्रतिक्रिया कळवा. 
 
 

0 comments: