-------
Romance
“मला
कसं react व्हायचं
हेच समजत नाही आजकाल. कधी तू गप्प असतोस, कधी घुम्यासारखा,
तर कधी हसतोस-बिसतोस.
सारखे guessing games खेळून मी कंटाळलेय
आता. काय ते घडाघडा
बोलून का टाकत नाहीस?” वैतागून
ती म्हणाली.
“तुला
आठवतं, तुलाही
असे mood swings सारखे व्हायचे
एकेकाळी.
तेव्हा
मी काय करायचो?”
तो त्याच्या
नेहेमीच्या
शांत आवाजात
म्हणाला.
“तू?
तू गप्प राहून फक्त बघत बसायचास.
मग मीच तुला सांगायचे,
की अरे बाबा मी upset आहे. मला जवळ घे. तेवढंच
पुरेसं
आहे माझा मूड ठीक होण्यासाठी.”
एक
क्षण शांतता
पसरली.
तो
तिच्याकडे
बघत होता.
शांतता
दाट झाली.
आणखे
एक शब्दही
न उच्चारता
तिने त्याला
फक्त जवळ घेतलं.
***********
अनाम
खूप
खूप वर्षांनी
एका गेटटुगेदरला
ते आज भेटले. मधली कितीतरी
वर्ष काहीही
संपर्क
नसतानाही
भेटल्यावर
लगेचच पहिल्याइकीच
आपुलकी,
प्रेम आणि camaraderie दोघांनाही
जाणवली
आणि हायसंही
वाटलं. नंतरचा
दिवस मग सर्वांबरोबर
मजेत गेला. हास्यविनोद,
चिडवाचिडवीला
ऊत आला, फोटो काढले गेले, परतपरत
भेटायचे
वायदे केले गेले. आणि शेवटी निरोपाची
वेळ आलीच.
तो
तिला चिडवत म्हणाला,
“तू थोडीशी
तरी सुंदर असतीस ना, तर लग्न केलं असतं तुझ्याशी.”
“तू
इतका चांगला
मित्र नसतास ना, तर मीही लग्न केलं असतं तुझ्याशी”,
त्याच्या
नजरेला
नजर भिडवत ती म्हणाली.
हॅन्डशेक
करून दोघंही
आपापल्या
दिशांना
पांगले.
*************
चंद्र
“माणसं
धार्जिणी
नाहीत, भांडणं,
गैरसमज
होऊन किंवा आपसुकच
काही कारण नसतांना
लोक दुरावतात.
ग्रहशांत
करून किंवा रत्न वगैरे वापरून
हा दोष दुरुस्त
करता येईल का?” आपली पत्रिका
गुरुजींपुढे
सरकवत तिनं विचारलं.
“अहो,
चंद्राचा
प्रभाव
असलेली
पत्रिका
आहे तुमची! आणि चंद्र म्हणजे
सतत बदल. यावरूनच
काय ते समजा!”
तिचा
चेहरा पडला.
“ग्रहदशा
असते, थोड्या
चुकाही
होतात आपल्याहातून.
त्या होऊ नयेत याची काळजी घ्या. चंद्राला
सूर्य, पृथ्वी,
तारे यांचा आधार आहे. तरीही रोज रूप बदलायचं
नशीब त्यानंही
स्वीकारलंच
ना?”
’जिथे
चंद्रही
नशीबाच्या
आधीन असतो, तिथे आपली काय गत?’ ती बाहेर पडली.
समोर
उगवणारी
प्रतिपदेची
कोर पाहून तिला एखाद्या
मैत्रिणीला
भेटल्यासारखं
वाटलं.
**********
सावध
“कालच
नेलेलं
पुस्तक
झालं पण वाचून?” लायब्ररियनने
आश्चर्यानं
विचारलं,
तशी ती दचकली.
ओह्ह! कालच
नेलं होतं नाही का? लक्षातच
राहिलं
नाही!! इतकं obvious वागत नाही खरंतर आपण.
“फारसं
आवडलं नाही.” पटकन तिनं सांगितलं.
“खरंतर
ब-याच लोकांना आवडलंय. पण तुमचा चॉईस वेगळा असतो..”
वेगळा? ती
स्वत:शीच उपहासानं हसली.
पुस्तक फक्त
चाळा म्हणून… डोळ्यासमोर असतो ’तो’. रात्रभर डोळ्याला डोळा लागत नाही. तो आणि तोच आठवत
राहतो. मनापर्यंत एक अक्षरही पोचत नाही. आणि माझा चॉईस वेगळा! ह्म्म!
“ही
घेते.” तिनं यावेळी
१५० पानांचीच
कादंबरी
उचलली.
हिच्यासाठी
तीन दिवस. शनिवारी
यायचं आता. मुखवटा चढवला आहे तो सहजी उतरता कामा
नये. तिनं स्वत:लाच बजावलं.
**********
विजय
वीस-पंचवीस
मिनिटं आरशासमोर झटापट करून झाल्यावर तिनं त्याला विचारलं, “कशी दिसतेय मी?”
“मस्त” एका
सेकंदात उत्तर!
“बघितलंस का
तरी? त्या मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसलायस नुसता…” फणकारा…
“मोठं कानातलं
मस्त दिसतंय, ड्रेसचं फिटिंग छान आहे, स्टोल मॅच होतोय, आयलायनरमुळे डोळे सुंदर
दिसतायेत,
लिपस्टिकची शेड तुला सूट होतेय.” परत एका सेकंदात उत्तर. यावेळेला डोळे तिच्यावर रोखलेले.
“मला चॅलेंज?” असे भाव.
बॅंग ऑन!!
पण मनातून हरखली असली, तरी तिनंही त्याच्या नजरेला नजर भिडवली.
“हे सगळं हसून
सांगितलं असतंस तर?”
एका क्षणात
त्याचे डोळे हरले.
“मला चॅलेंज?”
असं म्हणत, विजयी हास्य करत ती बाहेर पडली.
***********
महिलादीन
त्यांची रोजची
वेळ टळली तशी ती धास्तावली. आजच्या दिवसासाठीचा खास ड्रेस, मेक-अप, ऍक्सेसरीज सगळं
काही तयार होतं. आता फक्त त्या तिघी वेळेवर यायला हव्या होत्या. त्यांच्यासाठी आणलेली
गुलाबाची फुलं आणि चॉकलेट बॉक्सेस रेडी होते. त्यांचं काम झाल्यावरच त्यांना ती ते
मोठ्या प्रेमानं देणार होती. पण त्या होत्या कुठे? चिडूनच ती खिडकीपाशी जाऊन उभी राहिली.
इतक्यात त्यांच्यातली एक येताना दिसली आणि तिनं नि:श्वास टाकला. तिच्याच मागे बाकीच्या
दोघीही एकत्रच येत होत्या. ती सुटली!
आज महिलादिन
असला म्हणून काय झालं! धुणं-भांडी, केर-फरशी, पोळी-भाजी करणा-या तिघींनीही आजही यायलाच
हवं होतं. महिलादिनाची फॅडं त्यांच्यासाठी नव्हती.
गुणगुणतच ती
ऑफिससाठी तयार व्हायला लागली.
***********
स्वागत
“वेलकम होम,
बाबा” दार उघडताच बायको-मुलगा उत्साहानं हसून त्याला म्हणाले. खुश झाला तो.
पुढच्या खोलीत
पसरलेली पुस्तकं-पत्र-वर्तमानपत्र, तिरक्या झालेल्या उशा, सुरकुत्या पडलेला सोफा पाहून
त्याला बरं वाटलं. परीटघडीची हॉटेल पाहून जीव अगदी उबला होता त्याचा.
यावेळेची टूर
खूप लांबली होती आणि दगदगही चिकार झाली होती. घरात शिरल्याशिरल्या झालेलं स्वागत आणि
घरातलं घरपण जाणवून तो सैलावला.
“फ्रेश होऊन
ये, तुझ्यासाठी सरप्राईज आहे…” बायकोनं सूतोवाच केलं आणि तो उत्सुकतेनचं पटपट आवरून
आला.
“हं…” बायकोनं
हातात डिश ठेवली.
ढोकळा! तोही
नेहेमीप्रमाणे फसलेला. त्याला मनापासून हसायला आलं. बायको-मुलगाही खुसखुसायला लागले.
This was
what he had missed… his imperfect home with the perfect people!
*********
8 comments:
all are superb!
Thank you Bob!
all are good, Last two are best :)
Shilpa
Thank you Shilpa!
उत्तम जमल्या आहेत. एक तपशिलाचा मुद्दा - प्रतिपदेची कोर सहसा बघायला मिळत नाही, कारण चंद्र सूर्यापाठोपाठ उगवतो, त्यामुळे बहुतेक दिवशी चंद्र उगवताना दिसतच नाही. शिवाय इतक्या सकाळी गुरुजींकडून बाहेर पडणे जरा कठीणच... :-)
सगळ्या कथा वाचल्या आणि मुख्य म्हणजे सगळ्या कथांमधले शब्द मोजले. खरच १०० शब्दांमध्ये मस्त मांडल्या आहेस. हलक्याफुलक्या. मी देखील प्रयत्न करेन. अर्थात तुझ्याएवढ्या चांगल्या सुचणार नाहीत. Keep it up!
too good
Mast ..swagat khup aawadali
Post a Comment