August 17, 2010

मावसबोलीतल्या कविता

जास्वंदीकडून हा खो मिळून बरेच दिवस झाले.. एव्हाना सगळ्यांचा हा खोखो खेळूनही झाला असेल. पण हा खो मिळाल्यापासून डोक्यात एक किडा वळवळायला लागला.. तसा माझा आणि कवितांचा संबंध फारच कमी. मला भाषाही स्टँडर्ड तीनच येतात.. त्यामुळे भाषांतर करण्यायोग्य अशी हिंदी वा इन्ग्रजी कविता शोधायची, हाच पर्याय होता माझ्यापुढे. मग त्या भोवर्‍यात फिरत असताना, अनेकांकडे मदतीचा हात पसरला आणि एका मित्राने काही कविता दिल्या.. त्यातली ही कविता वाचता वाचताच अंगावर रोमांच आले.. करायची तर हीच कविता असं मनाशी ठरवलं.. मध्ये खाचखळगे बरेच लागले, धडपडत, चाचपडत, बरंच काही शिकताशिकता हा अनुवाद केला आहे..

एखादी कविता करणे आधी मुळात अवघड, त्यातून एखाद्या तयार कवितेचा भावानुवाद करणे तर त्याहून मोठी तारेवरची कसरत, कारण मूळ कवितेच्या आशयाला हात लागता कामा नये.. ह्या कामात परत एकदा त्या मित्राचं बहुमोल सहकार्य मिळालं..

तर, ही ती कविता.. मूळ कविता तर उच्च आहे. अत्यंत सोप्या, प्रवाही आणि मोजक्याच शब्दात मायाने स्त्रीत्वाचं जे सत्त्व मांडलं आहे, त्यासाठी केवळ ’हॅट्स ऑफ’! ही कविता वाचताच तिच्याकडे आकर्षिले गेले.. तिचा भावानुवाद करणं हा एक सुंदर अनुभव होता.. आशा आहे तुम्हालाही आवडेल:


Phenomenal Woman

Pretty women wonder where my secret lies
I'm not cute or built to suit a fashion models' size
But when I start to tell them,
They think I'm telling lies.
I say,
It's in the reach of my arms
The span of my hips,
The stride of my step,
The curl of my lips.
I'm a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That's me.

I walk into a room
Just as cool as you please,
And to a man,
The fellows stand or
Fall down on their knees.
Then they swarm around me,
A hive of honey bees.
I say,
It's the fire in my eyes,
And the flash of my teeth,
The swing in my waist,
And the joy in my feet.

I'm a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That's me.

Men themselves have wondered
What they see in me.
They try so much
But they can't touch
My inner mystery.
When I try to show them
They say they still can't see.
I say,
It's in the arch of my back,
The sun of my smile,
The ride of my breasts
The grace of my style.
I'm a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That's me.

Now you understand
Just why my head's not bowed.
I don't shout or jump about
Or have to talk real loud.
When you see me passing
It ought to make you proud.
I say,
It's in the click of my heels,
The bend of my hair,
The palm of my hand,
The need of my care.
'Cause I'm a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That's me.

-Maya Angelou.


एक अद्भुत घटना!

सुंदर बायका विचारात पडतात
असं आहे तरी काय माझ्यात?
कारण मी काही हुशार नाही
ना काही आकर्षक माझ्या बांध्यात..
आणि, मी त्यांना सांगू पहाते
तर त्यांना वाटतं मी खोटं बोलत्ये..

मी त्यांना सांगते,
की ते गुपित
माझ्या दोन हातांच्या कक्षेत येईल असं आहे
माझ्या कंबरेच्या घेरात
माझ्या दोन ढांगांच्या अंतरात
माझ्या ओठांच्या मुरडीत..

कारण,
मी आहे एक ललना
एक अद्भुत घटना
एक विलक्षण स्त्री
मी.

अगदी शांतपणे मी शिरते
एखाद्या खोलीत
आणि उपस्थित पुरुषमंडळी...
जागच्याजागी खिळून उभी रहातात
नाहीतर चक्क त्यांचे पाय लटपटतात
आणि मग होतात गोळा माझ्या भोवती
जशा पोळ्यावरच्या मधमाशा

मी त्यांना सांगते,
माझी गंमत
माझ्या डोळ्यामधल्या चमकेत आहे
माझ्या स्मितहास्यात
माझ्या कंबरेच्या एकाच हेलकाव्यात
आणि माझ्या नाचर्‍या पावलात

मी एक नारी.
एक गूढ कलाकारी
एक आश्चर्य
ती मी.

पुरुष स्वत:लाच विचारतात..
काय बरं पाहिलं त्यांनी माझ्यात?
खूप प्रयत्न करूनही
ते माझ्या अंतरीच्या गूढापर्यंत
पोचू शकत नाहीत..
आणि मी दाखवायचा प्रयत्न केला, तर
ते म्हणतात त्यांना दिसत नाही..

मी त्यांना सांगते
ते रहस्य
माझ्या पाठीच्या ताठ कण्यात आहे
माझ्या लख्खसूर्य हास्यात
माझ्या वक्षांच्या उभारात
माझ्या ऐटीत, माझ्या रूबाबात..

कारण
मी एक सबला
एक असाधारण रचना
एक स्त्री
तीच मी.

आता तुम्हाला समजलं ना
का नाहीये माझी मान झुकलेली
मी ओरडत नाही, थयथयाट करत नाही
मला जोरात बोलायची गरज नाही..
उलट मला पाहून
तुमची मान अभिमानानं उंचावायला हवी

कारण
माझं मर्म दडलंय
माझ्या सँडलच्या टिकटिकीत..
माझ्या केसाच्या बटेत
माझ्या तळव्याच्या मृदू स्पर्शात
माझ्या मायेच्या अपरिहार्यतेत

कारण मी एक स्त्री आहे
एक अद्भुत चमत्कार
एक विलक्षण स्त्री
होय. तीच मी.

-माया अँजलू

टीपः हा खोखो आता बराच जुना झालाय, त्यामुळे पुढे पास करत नाहीये.

4 comments:

Anonymous said...

पूनम, सुंदर भावानुवाद ! कविता आवडलीच. वाचतावाचता वाटलं ह्याचा अनुवाद करणं सोपं नाही पण तू अगदी सहज, ओघवतं लिहून गेली आहेस.
-अश्विनी

Rakesh Chhatre said...

Marathi translation of the poem like 'Phenomenal Woman' is truly a difficult task, but you have done
it …!!

Nice One.

भानस said...

खूपच भावला गं अनुवाद. आणि निवडही. :)

Dk said...

WOW!

Isn't it enough? :)