सध्या दहावी-बारावीच्या परिक्षा चालू आहेत, त्यावरून अचानक एक मजा आठवली- लकी ड्रेसची. हा लकी ड्रेस काय प्रकार आहे माहित असेलच ना? तो ड्रेस घातला की सगळं चांगलं होतं, परिक्षेत उत्तम मार्क मिळतात, दुष्ट वठणीवर येतात, मुलाखतीत पास होऊन नोकरी मिळते, दुश्मनांचं खच्चीकरण होतं वगैरे वगैरे..
खरंतर हे एक फॅडच. नक्की कधी सुरू झालं आठवत नाही मला.. पण दहावीच्या परिक्षेच्या वेळीच असणार.. कारण त्या आधी शाळेच्या गणवेषामुळे साधे ड्रेसही घालणं होत नसे, लकी कुठचे घालायला! मला आठवतंय, दहावीच्या परिक्षेतलं ते एक एकमेव आकर्षण होतं- की परिक्षाभर वेगवेगळे ड्रेस घालता येतील!! एरवी गणवेषात घुसमटलेले विद्यार्थी नेहेमीच्या कपड्यात मोकळा श्वास घेतील! तर त्या परिक्षेला माझ्या वर्गात बसणारी आमच्या शाळेतलीच एक मुलगी सलग तीनचार दिवस एकच ड्रेस घालून आली.. एक तर मार्च महिन्याचे दिवस.. पेपरची वेळ अतिशय रम्य- सकाळी ११ ते सुपारी २. त्यात टेन्शनही. ह्या सगळ्या काँबीनेशनमध्ये तीनतीन दिवस एकच ड्रेस??? त्यावेळी मी फारच इनोसन्ट होते, त्यामुळे लोकांना विचारायचे चक्क अशा विचित्र वागण्याची कारणं- त्याप्रमाणे मी प्रचंड कुतुहलाने विचारलंही तिला, की का गं बाई असं? तेव्हा मी पहिल्यांदा ऐकले ते शब्द- ’अगं हा माझा लकी ड्रेस आहे. हा ड्रेस घातला की मला पेपर सोप्पे जातात. त्यामुळे परिक्षा आहे तोवर हाच ड्रेस!’ आईशप्पथ! मला फार भारी प्रकार वाटला होता तो. असे ड्रेसबिस असतात लकीबिकी! वॉव!! (पण म्हणून रोज????- रात्री धुवत असेल, उन्हाळा आहे, वाळत असेल वगैरे मीच माझ्या मनाशी प्रश्नोत्तराचा खेळ खेळले आणि ’लकी ड्रेस’ कन्सेप्टमध्ये रंगून गेले..)
माझा कोणता बरं आहे लकी ड्रेस?- संध्याकाळी मी कप्प्यासमोर! एकतर शाळेमुळे कपडे फारसे लागतच नसत. फारतर दहाबारा ड्रेस असतील माझ्याकडे तेव्हा.. त्यांच्याकडे टक लावून बघत, शोध घेत बसले की हा ड्रेस घातला होता तेव्हा काय बरं झालं होतं? तो घातला होता तेव्हा टीचरने कौतुक केलं होतं का वगैरे? पण काही आठवेचना!! शेवटी तो नाद सोडला.
कॉलेजमध्ये गेल्यावर मात्र भरपूर कपडे आले. त्यामुळे त्यांची वर्गवारी करणं सोपं पडलं- हा अनलकी- हा घातला तेव्हा मैत्रिणीशी भांडण झालं होतं, हा लकी- हा घातला तेव्हा ’तो’ पहिल्यांदा बोलला वगैरे.. त्यामुळे बारावीच्या परिक्षेच्या आधीच अभ्यासाबरोबरच प्लॅनिंग कोणत्या दिवशी कोणता ड्रेस घालायचा याचंही झालं होतं. त्यात कॉलेजमध्ये जाऊन अक्कलेत वाढ झाल्याने, ’एकच ड्रेस लकी नसतो काही, एक रंग असतो लकी’ असा साक्षात्कार झाला होता. त्यामुळे एकाच लकी ड्रेसवरची संक्रांत टळली होती.. त्या ऐवजी एकाच ’लकी’ रंगाचे अनेक कपडे कपटात आले, हा भाग वेगळा. कॉलेजमध्ये असताना सतत कोणती ना कोणती परिक्षा चालू आणि सतत नवीन कपडेही घेणं चालू. त्यामुळे सतत लकी ड्रेस बदलायला लागले! मग अनेक फॅडांसारखंच तेही मागे पडलं..
नंतर काही वर्षांनी मी मुंबईत रहात होते नोकरीनिमित्त पेईंग गेस्ट म्हणून, तेव्हा एका नवीन मुलीची ओळख झाली.. तिला नुकतीच नोकरी लागली होती म्हणून आमच्या रूमवर आली होती रहायला.. एकीकडे ओळख, गप्पा करता करता ती सामान लावत होती आणि तिने काढला तिच्या बॅगेतून तिचा तो लकी ड्रेस! तो हातात येताच तिची कळी एकदम खुलली. "हा माझा लकी ड्रेस आहे.. हा मी जेव्हा जेव्हा घालते, तेव्हा तेव्हा मला हमखास चांगली बातमी कळते.. मी इथे शिकायला आले, तेव्हा एन्ट्रन्स एक्झामला हाच ड्रेस होता, आणि परवा इन्टरव्ह्यूलाही हाच घातला होता मुद्दाम.. तसा झालाय आता जुना, पण तरी माझा लकी ड्रेस हाच!" इतक्या आत्मीयतेने ती त्या ड्रेसकडे पाहून बोलत होती, की मला खूप गंमत वाटली- हा प्रकार अजूनही चालू आहे बघून.
नंतर परत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मी परत पुण्याला आले, संसारात, मुलात, नोकरीत अडकले. एक सुरूवातीला अगदी मनासारखी असलेली नोकरी हळूहळू आपले रंग दाखवू लागली.. खूपच कंटाळा आला होता त्या मॅनेजमेन्टचा. बाहेर पडायची संधीच शोधत होते. आणि अशात नवीन नोकरी अगदी चालून वगैरे आली.. पगार, बाकी अटी, कामाचा स्कोप- सगळंच चांगलं होतं. इन्टरव्ह्यूला गेले, तेव्हा थोडी धाकधूक होती- इतकी आखूड शिंगी बहुदूधी गाय हाती लागत्ये की नाही- याची. पण मुलाखत झकास झाली. अजून एक मुलगी होती स्पर्धेत, पण मला मिळाला जॉब! हे इतकं अचानक, अकल्पितपणे घडलं होतं की मी काही वेळ चक्रावलेल्या अवस्थेतच होते. त्यामुळे देवाला हात जोडताना, घरी कळवताना वगैरे आपसूक लक्ष गेलं- आज कोणता ड्रेस घातलाय?- याकडे! बस्स, हाच माझा नक्की लक्की ड्रेस- आत्तापर्यंतचा सर्वात लकी.
आपसूकच त्या ड्रेसला मी खूपच जपायला लागले. काही स्पेशल ओकेजन असेल तरच तो घालायला लागले. तो ड्रेस कधीही नुसता कपाटात दिसला तरी उगाचच छान वाटायचं. अशातच ऑफिसमध्ये एक अत्यंत महत्त्वाची मीटिंग आली. मीटिंग वादळी होणार अशी चिन्ह होती. तयारी जय्यत होती. माझ्यावर एक मोठी जबाबदारी होती मीटिंगमध्ये, त्यामुळे चिकार टेन्शनही होतं डोक्यावर. त्या दिवशी अर्थातच मी माझा ’तो’ लकी ड्रेस घातला! लंचपूर्वी मीटिंग होती. जे जे अपेक्षित होतं, ते ते सर्व घडलं मीटिंगेत. पण ते अपेक्षित होतं, त्यामुळे फारसे धक्केबिक्के बसले नाहीत. ’सिच्युएशन अंडर कन्ट्रोल’ होती. मीटिंग व्यवस्थित पार पडली एकदाची. आम्ही सर्वांनीच मोठे मोकळे श्वास घेतले. कागदपत्रांची आवराआवर करून केबिनमध्ये आले, तर लक्षात आलं, की सकाळी डबा आणायचाच विसरल्ये! मग एक भन्नाट कल्पना आली डोक्यात- घरीच जाऊया. डबा खाऊ आणि निवांत येऊ दोन तासाने ऑफिसला. तडक बॉसची परवानगी घेतली आणि घरी आले. सावकाशपणे मीटिंगमधले क्षण, मी दिलेली उत्तरं वगैरे आठवत जेवले. घरी असल्याने दोन घास जास्तच गेले.. लगबगीने ऑफिसला निघाले.. मन अजूनही तरंगतच होते आणि खाडकन एका क्षणात जमिनीवर आले!
हो. लिटरली जमिनीवर. माझ्या दुचाकीला काटकोनातून येणार्या दुचाकीने धडक दिली होती आणि मी चक्क जमिनीवर फेकले गेले होते. हे इतक्या पटकन झालं की मला त्यातलं गांभीर्यच कळलं नाही तेव्हा. त्या मुलांनी माझी दुचाकी उचलली आणि पसार झाले. मी दुचाकीचा आधार घेऊन उठले आणि स्वत:ला तपासलं. हात-पाय-डोकं सगळं धड होतं. काहीही मोडलं नव्हतं, दुखत नव्हतं.. अरे! मग ड्रेसवर हे रक्त??? संपूर्ण ड्रेसवर रक्त कुठून आलं? ..येतंय अजूनही? तेव्हा लक्षात आलं- हनुवटी फाटली होती आणि त्यातून प्रचंड रक्त जात होतं!
एक क्षण पॅनिक झाले. एव्हाना रस्त्यावरचे दोन लोक माझ्या मदतीला आले. मी स्थळ ठरवून पडल्यासारखी एका हॉस्पिटलच्या दरातच आडवी झाले होते. त्यामुळे लगेचच ओपीडीत दाखल झाले. त्यांनीही झटपट माझी तपासणी केली, हनुवटीला टाके घातले वगैरे आणि अर्ध्या तासात मी परत एकदा ठीकही झाले होते. पण माझा ड्रेस? तो माझा लकी ड्रेस? ज्यामुळे मला नोकरी मिळाली, अनेक मीटिंगांमध्ये मी छाप वगैरे पाडलेली? पार वाट लागली होती त्याची. रक्ताने तर माखलेला होताच, पण रस्त्यावरची धूळ, माती, दुचाकीचं ऑईल- मस्त मेकप झाला होता त्याचा! मला त्याही स्थितीत हसू आलं! आता नवीन लकी ड्रेस शोधायला लागणार की! :-)
अर्थात, तो ड्रेस स्वच्छ झाल्यानंतर व्यवस्थित झाला. त्याच्या अंगावर पडलेले सर्व डग गेले. आधीसारखाच सुंदर दिसू लागला. पण अपघात झाल्या झाल्या माझ्या मनातून तो खूपच उतरला होता- माझी काहीही चूक नसताना ध्यानीमनी नसताना मी पडते काय, लागतं काय? हा कसला आलाय डोंबलाचा लकी? लकी असता तर असं झालंच नसतं.. वगैरे.. रागच आला होता त्याचा. वाटलं देऊनच टाकू याला कोणालातरी.. अगदी नजरेसमोर नको तो..
पण आज बरेच दिवस झाले ह्या घटनेला तरी अजूनही तो ड्रेस माझ्याकडे आहे, मी तो प्रेमाने वापरते आणि विचारांती तोच माझा लकी ड्रेस आहे हे मला पटलंही आहे. तो ड्रेस होता म्हणूनच मला कोणतीही गंभीर दुखापत झाली नाही. फक्त हनुवटीवर सुटका झाली. हात-पाय तर धड होतेच, पण किती धोका होता? जबड्याला, दातांना, ओठाला, डोळ्याला? सुदैवाने सगळं अगदी व्यवस्थित होतं. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी दुचाकीवर एकटी होते. माझ्याबरोबर नेहेमीसारखा माझा लहान मुलगा असता तर?? बापरे! विचार करवत नाही. हे सगळं टळलं ते देवाच्या कृपेने आणि त्या लकी ड्रेसमुळेच!
खरंतर तुम्हाला-मला हे पक्कं माहित आहे, की जे व्हायचं ते होणारच असतं. असे लकी/ अनलकी ड्रेस घालून म्हणा किंवा अजून कोणत्याही मार्गाने म्हणा, एखादी घटना काही होत नाही किंवा टळतही नाही. पण त्या निमित्ताने भाबड्या मनाची समजूत घालता येते. प्यूअर फॅक्ट्सच्यापलिकडेही काही अस्तित्वात आहे यावर विश्वास बसतो. जसं दुर्दैवाचं, नशीबाचं खापर फोडायला आपण नेहेमीच कोणालातरी अथवा कशालातरी वेठीला धरतो, तसंच चांगल्या गोष्टींचं क्रेडीट द्यायलाही कोणाला/ कशालातरी शोधायला काय हरकत आहे? म्हणूनच I am still fond of my lucky dress :-)

10 comments:
Mastach....
Shevatacha parichchhed aavadala!
avadlla lekh. I am from Pune and now in US for a while. Tumcha lekh vachun agdi punyat alyasarkha vatla. Mazya mate pratyekachyach manaat ashi ek lucky dress chi idea astech, fakta pratyek jan bolun dakhavat nahi itkech. Masta vishay nivadlaat. Simple likhanachi shaili sudha avadli.
खूप छान.. कोणीही कितीही नाही वगैरे म्हणालं तरी प्रत्येकाचा लकी ड्रेस/शर्ट वगैरे असतोच. पण त्या विषयावर पोस्ट होऊ शकेल असं डोक्यातही आलं नव्हतं. आवडलं. लेख आणि कल्पना दोन्हीही !!
Poonam, I can relate it to me... or is it me only?
pan kharach asa lucky dress asto, and because of that only you survived from that accident!
Believe me! :)
chhan zalay pan lekh
he he majha paN ek kissa aahe. to MB var VP madhe Taaken. tU saangitales mhaNun ithe comment dete aahe. chhan jamalaay. MB var Taakaa ki.
~Cindi
धन्यवाद मंडळी
शिल्पा, हो, तूच आहेस ती :)
सिंडी, लिही, वाट बघतेय.
chhan ahe lekh, maja ali...
सुन्दर लेख!! तुझी लिहिण्याची पद्धत छान आहे!!
chaan jamalay.:)
Kiti pranjal lihites Poonam.Sundar ...khoop aavadala lekh.
Tujha pratyek lekh tithehi taakat ja bare. Rahun jaatat na vachayache ...Hukumavarun :))
-Ashwini
Post a Comment