एखादी १९ वर्षाची मुलगी कशी असते? अल्लड, अवखळ, हसरी, कपड्यांच्या बाबतीत चोखंदळ, स्वतःचं कौतुक घरातल्या मंडळींकडून करून घ्यायला आवडणारी, आयुष्यातलं ध्येय ठरवून ते साकार करण्यासाठी धडपडणारी...
'कृष्णा पाटील' ही अशीच एक मुलगी. नाव ओळखीचं वाटतंय ना? होय, हीच ती वीरांगना, जिने वयाच्या केवळ एकोणीसाव्या वर्षी जगातले सर्वात उत्तुंग शिखर काबीज केलेय- जिने 'माऊंट एव्हरेस्ट' सर केलाय!!! भारतातली सर्वात दुसरी कमी वयाची आणि पहिलीच मराठी मुलगी ही जिने हा विक्रम केलाय!
ज्या वयात मुलं 'आपलं ध्येय काय आहे?' 'आपल्याला आयुष्यात काय करायचं आहे?' हे अजूनही नक्की करू शकलेले नसतात, त्या वयात ही मुलगी काय पराक्रम करून आलीये याचं महत्त्व तिचं वय पाहिलं की कळतं! जगातल्या सर्वात उंच जागी जाऊन आल्यानंतरही तिचे पाय जमिनीवरच आहेत हे तिचं आणि केवळ तिचंच कौतुक! आणि कृष्णाच्या दृष्टीने ही तर केवळ सुरूवात आहे. तिला 'पर्यावरण रक्षणा'र्थ खूप काम करायचं आहे. वसुंधरेची हानी रोखण्यासाठी खारीचा वाटा उचलायचा आहे. तिची ही 'एव्हरेस्ट'ची मोहिम ही देखील 'ईको-फ्रेन्डली' मोहिम होती.
कृष्णाशी संवाद साधू शकण्याचं भाग्य मला लाभलं. तिच्याविषयी, तिच्या मोहिमेविषयी अजून जाणून घ्यायला नक्कीच आवडेल तुम्हाला. या लिंकवर एक टीचकी मारा, बस्स! -http://www.maayboli.com/node/8358
1 comments:
http://theburningface.blogspot.com/
take a look at krishna patil's own blog ...!!!
Post a Comment