March 19, 2008

चीटींग!

मी बाथटब मधे पहुडली होती.. बाजूला सुगंधी मेणबत्त्या जळत होत्या, पाण्याला अरोमा ऑईलचा एक मंद सुगंध येत होता.. पाणी अगदी योग्य गरम होतं.. एक प्रकारची नशा चढल्यासारखी झाली होती तिला.. आत्ता या क्षणी इथे, आपल्याबरोबर कार्लो असता तर! कल्पनेनीच तिच्या अंगावर एक शिरशिरी पसरली.. आत्ता नसला तरी काय झालं? काही तासांत येणारच होता तो.. मग बस! तो आणि ती आणि त्यांच्यामधला धुंद प्रणय! आऽऽह! तिने डोळे मिटून घेतले..

केवळ पाच वर्षात कुठून कुठे आली होती ती!.. आणि आता कुठून कुठे निघाली होती!! एक छोटीशी टोचणी लागली तिला, पण आत्ता या क्षणी कार्लोचा धसमुसळेपणा, त्याचा रांगडेपणा यापुढे तिला काहीच जाणवत नव्हतं..

पाच वर्षापूर्वी ती एल.ए मधल्या एका ’ग्रूव्ह’ नावाच्या फालतू बार कम डिस्कोथेक मधे बार-वेट्रेसचं काम करत होती. दिसायला एमी अगदी लाखात एक अशी होती. साधारण परिस्थितल्या एमीला देवानी भरभरून सौंदर्य बहाल केलं होतं. सोनेरी केस, निळे डोळे, मोहक हास्य आणि अतिशय कमनीय बांधा. ना तिच्याकडे उत्तम पेहराव करायला पैसे होते, ना शरीर सुडौल वगैरे ठेवण्यासाठी नीट खातपीत होती ती.. पण चीप मेकप आणि स्वस्त कपड्यांमधेही ती हजारात उठून दिसे. सहाजिकच ’ग्रूव्ह’ मधे गिर्‍हाईकांची ती लाडकी होती.

खरंतर एमी मनानी भावूक, स्वप्नाळू अशी होती. अगदी स्वप्नातला राजकुमार जरी आला नाही भेटायला, तरी आपला जोडीदार प्रेमळ असावा अशी अगदी छोटी अपेक्षा होती तिची. प्रेमाचे दोनच गोड बोल कोणत्याही परिस्थितीतून माणसाला वर कढू शकतात असा विश्वास होता तिचा. पण! एका अर्थानी तिच्या सौंदर्यानी घात केला असंच म्हणावं लागेल. समज आल्यापासूनच्या वयात पुरुषांच्या लोचट नजराच तिचा पाठलाग करत होत्या. त्यामुळे एमीची स्वप्नपण आमूलाग्र बदलली. आता तिला हवा होता पैसा, फक्त पैसा आणि आराम. त्यासाठी तिला ’ग्रूव्ह’ मधून बाहेर पडायचं होतं. ’ग्रूव्ह’मधली गिर्‍हाईकं ही सामान्य परिस्थितीतली, दोन घटका करमणूकीसाठी आलेली असायची. त्यांचा तिला तसा काही ’उपयोग’ नव्हता.. त्यांच्या किळसवाण्या स्पर्शांच्या बदल्यात शक्य तितक्या जास्त टीप्स मिळवायच्या, इतकंच. ’ग्रूव्ह’ मधून बाहेर पडून कोणत्यातरी अश्या ठीकाणी जावं जिथे श्रीमंत धेंडं येत असतील, त्यांच्यातलाच एक गाठावा आणि आयुष्या आरामात घालवावं हेच आता तिचं ध्येय होतं!

आणि अचानक देवानी हाक ऐकावी, तशी लिलीमार्फत तिला ’क्लब ७’ या एल.ए मधल्या उच्च्भ्रू क्लब मधे नोकरी मिळाली. नोकरी तीच, पण दर्जा वरचा. क्लब ७ ला एक वलय होतं. प्रतिष्ठित लोक तिकडे यायचे. त्यांना ’हरप्रकारे’ खुश ठेवणं हेच या बार-वेट्रेसेसचं काम. त्याची भरपाई ही घसघशीत टीप्सच्या मोबदल्यात मिळायची. सगळाच मामला खुशीचा आणि शांतीचा ठेवायचा ही एकमेव अट होती क्लब ७ ची. या अटी मान्य असतील तरच तिकडे काम मिळायचं. एमीच्या स्वप्नांकडे नेणारा तो रस्ता होता, त्यामुळे तिने मनात कोणताही किन्तू न ठेवता तो घेतला.

आणि तिकडेच भेटला होता फिलिप- फिल. फिल एक मुरब्बी व्यावसाईक होता. व्यवसायासाठी कोणत्याही तडजोडी करण्यासाठी तयार असणारा. त्याचं व्यक्तिमत्त्व गूढ होतं. तो अत्यंत मितभाषी होता. एमी नवीन असतानाच त्याने तिला पाहिलं होतं. एमी कोणाच्याही नजरेत भरेल अशी होतीच अर्थात.. तेव्हाच त्याने ठरवले होते की हिच्याशी ओळख वाढवायची. फिलबद्दल एमीलाही एक प्रकारचे आकर्षण वाटले, कदाचित त्याचे गूढ डोळे पाहून. त्याचे डोळे कशाचाच अंदाज लागू देत नसत. त्याला वश करून घेतलं, तर जन्माचं कल्याण होईल अशी एमीला खात्री होती.

एमीचा फिलवर चांगलाच प्रभाव पडला होता. तिच्याबद्दलचं आकर्षण त्याला स्वस्थ बसू देईना. शेवटी एके दिवशी फिलनी चक्क एमीला ’वर चल’ अशी खूण केली. एमी आश्चर्यचकित! त्याला अशी काय माहिती होती तिच्याबद्दल की फिलसारख्या माणसाला एमीचं आकर्षण वाटावं? पण तारुण्याची मस्ती आणि मादक सौंदर्याचा प्रभाव कसा पडतो लोकांवर हे एमीला पक्कं ठाऊक होतं. त्या संध्याकाळी एमी आणि फिल दोघांनीही एकमेकांना हरप्रकारे खुश केलं.

मग त्यानंतर रोजच त्यांच्या भेटी होऊ लागल्या.
फिलला तर खजिनाच गवसल्यासारखा झाला. इतकी अप्रतिम यौवना इतक्या उशीरा का सापडली होती त्याला? त्याला अगदी हवी तशीच होती ती- सौंदर्य आणि एकसे एक अदा- कोणालाही घायाळ करतील अश्या.. बिझनेसमधे तिचा काय फायदा झाला असता! वॉव! खडूस क्लायंटला एमीची नुसती झलक जरी दाखवली तरी तो मऊ होईल अशी जादू होती एमीमधे.

यानंतरच्या संध्याकाळी खूपच वेगानी गेल्या. फिल आणि एमी दोघांनाही एकमेकांचं वेड लागल्यासारखं झालं होतं. शेवटी फिलनी तिला विचारलंच, "माझ्या घरी कधी मूव्ह होतेस? उद्याच?"

मग नुसत्या सुखांच्या राशी! ज्या सुखाची केवळ स्वप्नच पाहिली होती ते आता हात-पाय जोडून समोर उभं होतं. पाहिजे तितका पैसा, हवा तितका आराम! फिलबरोबर पार्ट्या अटेंड करणं, पार्ट्या होस्ट करणं, सुंदर कपडे घलणं, किंमती दागिने घालणं, विमान, क्रूजचे प्रवास, देशविदेश फिरणं, वेगवेगळे खाद्यपदार्थ खाणं आणि त्या बदल्यात फिलला सुख देणं, बस! या ऐश्वर्यपुढे शरीराची किम्मत काहीच नव्हती. फिलही तिच्या तारुण्यावर, सौंदर्यावर लट्टू होता.. दोन वर्ष कशी कुठे गेली समजलंही नाही.

पण जितक्या लवकर ते जवळ आले, तसेच एकमेकांपासून लांबही जायला लागले. पहिलं उधाण संपल्यावर एकमेकांचे स्वभाव खुपू लागले. फिलला ती फार उथळ आणि आळशी वाटू लागली, तर एमीच्या मते फिल फार हिशोबी आणि थंड झाला होता तिच्या बाबतीत. हळूहळू ते एकमेकांना टाळायला लागले. फिल बिझनेसच्या निमित्तानी टूर्सवर एकटाच जाऊ लागला, तर एमीनेही तिचं रूटीन जिम, मैत्रिणी, वीकेंडपार्टीज, क्लब्ज यामधे बसवून टाकलं. पण मनातून एमी थोडी घाबरली होती. फिलनी तिच्यावर रागावून तिला घराबाहेर काढलं तर? एमीच्या जागी त्याला कोणीही भेटली असती. मग तिचं भवितव्य काय असणार होतं? तिला आता पैश्याची चटक लागली होती. श्रीमंतीची तुकतुकी तिच्या शरीरावर पसरली होती. पण तिच्या हातात ’तिचा’ असा काहीच पैसा नव्हता. फिल त्या बाबतीत खूपच सावध होता. तिला लागेल तेवढा पैसा तो तिला देत होता, त्याच्या हिशोबही मागत नव्हता, पण तिच्या नावे काहीच संपत्ति नव्हती.. होईल अशी शाश्वती नव्हती. म्हणून एमी शक्यतो सगळं फिलच्या मनासारखं करायची, वागायची. आजकाल त्यांच्या रात्रीही शृंगारिक, उत्कट वगैरे नव्हत्या, एक उपचार राहिला होता. एमी खूपदा फिलच्या मनाचा थांग लावायचा प्रयत्न करायची, पण फिल मूळचाच घुमा आणि अबोल. तिला काही पत्ता लागत नव्हता त्याच्या वागण्याचा.

आणि एमीच्या आयुष्याला पुन्हा एकदा कलाटणी मिळाली. तिच्या आयुष्यात एखाद्या झंझावातासारखा दाखल झाला कार्लो!

कार्लो फिलचा ऑफिसमधला एक साधा मॅनेजर होता. पार्ट्यांबरोबर मीटींगा अरेंज करणं हे त्याचं काम. तो हल्लीच फिलच्या ऑफिसात लागला होता आणि फिल त्याच्यावर बेहद्द खुश होता. कार्लो दिसायला इटालियन सौंदर्याचा नमुना म्हणता येईल असा होता. सावळा रंग, भरपूर उंची, तगडं शरीर आणि ब्राऊन डोळे.. बोलणं तर अतिशय मिठ्ठास. समोरच्याला बोलण्यात गुंगवून ठेवणं त्याच्या डाव्या हातचा मळ होता. तो एकदा क्लायंट्सशी बोलायला लागला की त्याला हवे तसेच वागायचे ते, म्हणतील तिथे भेटायला यायचे, फिलच्या बर्‍याच टर्म्स मान्यही करायचे.

अशीच एक बिझनेस डिनर पार्टी फिलनी घरी ठेवली होती. फिल अतिशय धोरणी होता. त्याने एमीसारख्या मुलीला बार मधून उचलून स्वत:च्या घरात आणलं होतं ते त्याचा फायदा पाहूनच. आता एमीमधला त्याचा इन्टरेस्ट कमी झाला असला, तरी लोकांसाठी ती अजूनही आकर्षक होतीच- बिझनेस सर्कल मधे तर तिचा निश्चितच उपयोग होता, हे फिलने मनाशी कधीच मान्य केलं होतं. तिच्याकडे अजूनही तोच तो कमनीय देह होता, आकर्षक हास्य होतं, निरागस डोळे होते आणि सर्व आकर्षक अदा होत्या. लोक तिच्याकडे एकदा आकर्षित झाली की फिलचं पुढचं काम सोपं होत होतं. पुढे त्या ओळखीचं रूपांतर बिझनेस मधे कसं करायचं हे त्याला पक्कं ठाऊक होतं.

आता तर साथ द्यायला कार्लोही होता. म्हणूनच त्याने मुद्दाम ही पार्टी घरी ठेवली होती, आणि त्यात कार्लोलाही आमंत्रण होतं. एमीच्या रूपानी क्लायंट स्तिमित झाला की कार्लोनी त्याच्याशी बिझनेसबद्दल बोलणी करायला सुरुवात करायची आणि मग फिलनी सूत्र हातात घ्यायची असा साधा प्लॅन होता त्याचा. शक्यतो एकदा फिलनी बोलणी सुरु केली की ती त्याच्या मनासारखी पूर्ण होईपर्यंत तो सोडत नसे. सुरुवातीला एकदोन वेळा एमीनी त्याच्यासाठी ’क्लायंट’ला ’खुश’ही केले होते. पण सध्या एमी त्याच्या बरोबर रहात असल्याने तिलाही एक स्टेटस मिळालं होतं. त्यामुळे आजकाल असल्या काही अपेक्षा असतील क्लायंटच्या तर तो ’बाहेरच्या बाहेर’ त्या मागण्या पुर्‍या करून देत असे. एल.ए मधे क्लब्ज काही कमी नव्हते. आणि त्या निमित्तानी त्यालाही ’बदल’ होत असे.

एमी आणि कार्लोला कल्पनाही नव्हती की त्यांचा असा वापर फिल करतोय ते. एमी फिलच्या उपकाराखाली आणि कार्लो तो देत असलेल्या पगाराच्या ओझ्याखाली फिल म्हणेल तसं करायला बांधील होते.

तर अशी ओळख झाली कार्लोची. कार्लो पाहुणे मंडळींना घेऊनच आला. एमीची आणि त्याची ओळख झाली तेव्हा एमीचा क्षणभर विश्वासच बसला नाही की कार्लो एक साधा पगारदार माणूस आहे. त्याचे कपडे उच्च अभिरुचीचे होते, त्याचा वावर सहज होता, त्याचं वागणं अदबीचं होतं, आणि खिळवून ठेवत होती ती त्याची नजर! कोणाचाही आरपार वेध घेणारी! मनातल्यामनात एमी त्याला बघताच त्याच्यावर भाळली!

कार्लोचीही स्थिती काही वेगळी नव्हती. पण काहीही झालं तरी एमी त्याच्या मालकाची ’मैत्रिण’ होती. तिच्याकडे त्याच दृष्टीने बघणं श्रेयस्कर होतं. तरीही त्याची नजर राहून राहून तिच्यावर पडत होती. तिनी त्या दिवशी वाईनरेड रंगाचा गाऊन परिधान केला होता, जो तिच्या शरीरावर लपेटून बसला होता, तिचं अंगांग खुलवत होता. कार्लोनी त्या संध्याकाळी मोठ्या मुश्किलीने कामाकडे लक्ष केंद्रीत केलं.

दुसर्‍याच दिवशी सकाळी एमीचा फोन वाजला. नंबर अपरिचित होता.
"हॅलो"
"एमी? काय मी एमीशी बोलत आहे?"
कार्लो! कार्लोचा आवाज होता तो. एमीच्या घशाला कोरड पडली. तिला पटकन उमजलंच नाही, पुढे काय बोलावं?
"हो.. एमी बोलतेय"
"आह! तुमचा आवाजही काय मुलायम आहे मॅडम! एक्स्क्यूज मी, मी असं बोलतोय थेट.. पण सुंदर मुलीला सुंदर म्हणणं यात काय चूक, बरोबर? मॅडम, तुम्हाला अनेक लोक आत्तापर्यंत असं म्हणले असतील ना.. मीही सांगतो, तुम्ही फ़ार सुंदर आहात.. यू आर टू ब्यूटीफूल..."
त्याच्या आवाजात अशी काही जादू होती की एमीच्या अंगावरून एक शिरशिरी गेली.. असं रोमँटिक तर ती आणि फिल कधी बोललेच नव्हते..
"मॅडम, तुम्ही काही बोलत का नाही? सॉरी, मी एक साधा नोकर तुमचा, आणि मी हे असं बोलायला नको होतं.. मी उद्धट वाटलो असेन ना तुम्हाला? पण हे सांगितल्याशिवाय राहवलं नाही मला. आता याबद्दल तुम्ही द्याल ती शिक्षा भोगायला मी तयार आहे. पण यापुढच्या अनेक रात्री बेचैनीत घालवण्यापेक्षा तुम्हाला हे एकदाच सांगून टाकणं ठीक असं वाटलं मला.. मी बरोबर केलं ना मॅडम?"
हाय! असं आर्जवी बोलणं की जणू अंगावरून पीस फिरत आहे.. एमी सुखावली.
"इतकं हक्कानी सांगत आहेस, तर हे ’मॅडम’ काय आहे? नुसतं ’एमी’ म्हण.." तिने हलकेच हसत सांगितलं..
"एमी! ओह! काय गोड नाव आहे.. एमी.." त्याने असा काही उच्चार केला तिच्या नावाचा की एमीला आपण तरंगत आहोत असं वाटलं. "एमी, कालची आपली भेट खूपच फॉर्मल होती.. काय आपण एकेमेकांशी मोकळेपणी बोलायला भेटू शकतो? आपण दोघंच.. इफ यू डोन्ट माईंड.."
माईंड? एमीनी त्याला कधी ’हो’ म्हणलं हे तिलाही समजलं नाही!

सगळंच जादूई होतं.. कार्लोची मोहिनी तिच्यावर पसरली होती. तिचा कधीच न सापडलेला स्वप्नातला राजकुमार तिच्याबरोबर होता! त्याचं बोलणं असं मधाळ होतं की एमी विरघळायची, त्याची नजर संमोहित करणारी होती आणि त्याचा साधा स्पर्शही तिच्या अंगात एक वीजेची लहर फिरवायचा. तो कधीच तिची तारीफ करताना थकायचा नाही, त्याच्या नजरेत तिला अथांग प्रेम दिसत होतं. प्रणय म्हणजे काय हे त्याने तिला शिकवले.. तिल खुलवणं, फुलवणं ही त्याची हातोटी होती..

ईट वॉज अ ड्रीम.. हातात पैसा खेळत होता, कार्लोची बेधुंद करणारी सोबत होती.. अजून काय हवं? आणि या प्रणयात एक एक्साईट्मेन्टही होती. हे सगळंच फिलपासून चोरून चाललं होतं. फिल शहराबाहेर असेल तेव्हा दिवस अन रात्र, आणि तो असेल तर थोडा वेळ का होईना, पण ते भेटत होतेच.

मधूनच एमी विचार करत असे- फिलला हे प्रकरण समजलं तर काय होईल? एका क्षणात होत्याचं नव्हतं होईल. फिल तत्काळ तिला घराबाहेर काढेल आणि कार्लोला नोकरीवरून. कार्लोला दुसरी नोकरी मिळाली असती, पण तिचं काय? पुन्हा एकदा बार-वेट्रेस होऊन तेच ते बकाल जीवन जगायचं??? का पुन्हा कोणीतरी गाठायचा? कार्लोनी तिचा स्वीकार केला असता का? हा तिचा प्रवास कुठेच संपणार नव्हता का? विचार करकरून तिला अस्वस्थ वाटत असे, पण तरीही ती स्वत:ला कार्लोपासून दूर ठेवू शकत नव्हती, ना तो त्याला तिच्यापासून. एकमेकांपुढे सर्वच शहाणपण विसरले होते ते..

आणि आज ते भेटणार होते, इथेच.. एमीच्या घरी. आत्तापर्यंत ते नेहेमीच बाहेर भेटत आले होते. फिल जेव्हा जेव्हा बाहेरगावी जायचा तेव्हाही. त्यांची अगदी पहिली भेट या घरी झाली होती.. पण ती औपचारिक. त्यानंतर आज तो येणार होता इथे.. एमीच्या हट्टाखातरच. ते घर म्हणजे एक आलीशान महालच होता.. स्वत:चा प्रायव्हेट बीच असलेला सांटा बार्बरा मधला.. सहा बेडरूम्स मधली एकच वरची बेडरूम ती आणि फिल वापरायचे. पण खालची बेडरूम एमीची खास लाडकी होती.. कारण तिच्या समोरच समुद्र होता.. पण फिलला वरचीच खोली आवडायची.. त्यांनी ही खोली कधीच वापरली नव्हती. एमीची फँटसी होती.. कँडललाईट डिनर, समुद्रास्नान आणि मग या खोलीत आपल्या प्रियकराबरोबर रात्र जागवणे.. ती फँटसी आज कार्लोबरोबर ती पूर्ण करणार होती.

तिनी अगदी पर्फेक्ट आखणी केली होती. फिल हवाईला गेला होता. तो उद्या सकाळी तिथून निघणार होता. सांटा बार्बराला तो संध्याकाळशिवाय येणार नव्हता. तिनी त्याला सांगितलं होतं की ती आज फ्रेस्नो मधल्या तिच्या मैत्रिणीकडे रात्रभर रहायला जाणार आहे, त्यामुळे आज तो घरी फोन वगैरेही करणार नव्हता. तिला आणि कार्लोला हवा तेवढा एकांत मिळणार होता.. तिने खुशीतच टबमधले पाणी वरखाली केले.. खास आजच्यासाठी आणलेला झिरझिरीत गाऊन बेडवर तिची प्रतिक्षा करत होता.. आह! आता फक्त कार्लोची कमी होती.. आणि इतक्यात बेल वाजलीच..

तिने दार उघडले. कार्लो हातात शँपेनची बाटली आणि लाल गुलाब घेऊन उभा होता. त्याने तिला हलकेच ’बो’ केला. मिस्किल हसत म्हणाला,
"मॅडम, फॉर यू.."हसत हसतच एमीनी ते दोन्ही घेतले. आणि तिला काही कळायच्या आत कार्लोनी तिला उचलून घेतलं होतं.
"माय गॉड! काय दिसतेस तू.. काय घडवलंय तुला देवानी.. नुसतं बघितलं की कधी एकदा तुला जवळ घेतो असं होतं मला.. चल.. कुठे जायचं?"
"ए.. लगेच?"
"मग? वेळ कशाला घालवायचा?"

ती त्याला घेऊन ’त्या’ खोलीत आली.. तिथला व्ह्यू पाहून तो एकदम खुश झाला..
"वॉव! यू लकी गर्ल.. तुझ्यासारख्या मुलीला असंच घर पाहिजे.. चल.. समुद्रावर जाऊ.."

कसं एमीच्या मनासारखं होत होतं. काय थरार होता या रोमान्सला. समुद्रामधे दंगामस्ती, मग परत येऊन एकत्र शॉवर, डिनर आणि मग त्यांच्यातली तीच ती केमिस्ट्री. फिलनी तिला पैसा दिला होता हे मान्य.. पण त्याचा मोबदलाही पुरेपूर वसूल केला होता त्याने.. ही अशी कार्लोबरोबर वाहून जात होती तशी ती त्याच्याबरोबर कधीच वाहून गेली नव्हती. सुखाचे सर्वोच्च क्षण जगत होती ती आत्ता.

तृप्तीनी त्याच्या मिठीत विसावलेली असताना अचानक पहाटे तिला आठवले.. तिनी कार्लोसाठी पर्फ्यूम आणला होता.. कालच्या धुंदीत त्याला द्यायचा विसरलीच होती की ती..
"कार्लो, वर जाऊया ना.. तुझ्यासाठी आणलंय मी काहीतरी.."
आळसावल्या स्वरात तिच्या केसांमधून बोटं फिरवत तो म्हणाला, "काय आहे डार्लिंग? तू हे जे मला दिलं आहेस, देत आहेस तेच इतकं मूल्यवान आहे.. आता अजून काही नको.."
"असं काय, चल ना.. बर, मी आलेच मग २ मिनिटांत.."
"ए मला सोडून जाऊ नकोस कुठेही.. चल.. दोघे जाऊ.."

जिना चढून होताच त्याने तिला उचलले, तीही त्याला बिलगली. तिने पायानीच तिच्या बेडरूमचा दरवाजा ढकलला आणि ते आत आले.. आत आल्याक्षणीच एमीला जाणवले, काहीतरी चुकतंय.. तिने दिवा लावला..

आणि ती आणि कार्लो अक्षरश: जागीच थिजले..

फिल बेडवर पालथा पसरलेला होता!!!

दिवा लागताच तो सरळ झाला आणि त्याच्या तोंडून शब्द निसटले, ’आता दिवा कशाला?’

समोर एमी आणि कर्लोला बघताच तोही पूर्णपणे दचकला. त्यांच्याकडे अविश्वासाने डोळे फाडफाडून पहायला लागला..

एमीनी कसाबसा अंगावर गाऊन चढवला होता.. कार्लो तर शॉर्ट्स मधेच होता.. त्या दोघांमधे काय चालू आहे हे त्यांच्याकडे नुसतं बघूनच कळत होतं.. एमीला ब्रम्हांड आठवलं.. सुखाच्या झोका असा इतका खाडकन थांबून तिला जमिनीवर फेकेल अशी अपेक्षाही नव्हती तिची.. मनाच्या कोपर्‍यात असलेली भिती अशी इतक्या लवकर प्रत्यक्षात उतरेल याची तिने कल्पनाही केली नव्हती. ती आणि कार्लो खरोखर जागच्याजागी दगड बनले..

हे सगळं ५ सेकंदाच्या अवधीतच घडलं असेल.. ही अशी कोंडी होती जी कोणालाच फोडता येत नव्हती..

आणि एमी धीर गोळा करून काहीतरी बोलायला शब्द जुळवतच होती इतक्यात..

बेडरूमच्या अटॅच्ड बाथरूमचा दरवाजा उघडला आणि आतून बाहेर आली एक संपूर्ण विवस्त्र तरुणी!


समाप्त!

(काहीतरी वेगळं लिहायचा एक क्षीण प्रयत्न!)

18 comments:

HAREKRISHNAJI said...

विलक्षण कलाटणी. वेगळं लिहीण्याचा प्रयत्न छान जमलाय.

Mangesh said...

its too lengthy poonam...2-3 divas tari lagtil mala vachyala...pahile 2 para chaan aahe....

सर्किट said...

छान लिहीलंयेस, पूनम. खूप मेहनत घेऊन लिहीलंयेस. आवडलं. :)

काही मामूली सूचवायचं तर - सुरुवातीचे ६/७ पॅराग्राफ़्स तू नुकत्याच पाहिलेल्या सिनेमाची स्टोरी सांगते आहेस अशा स्टाईलचे झालेत. कण्टेण्ट आणि भाषा एकदम मस्त, पण निरुपण (सांगणं) एकदम सरळसोट. त्यात संवाद पेरून चुरचुरीत करता आलं असतं. (आय वुड सजेस्ट - तुझ्या आवडत्या लेखकांच्या कथा, गोष्टीकडे दुर्लक्ष करून, वाक्यांची मांडणी यादॄष्टीने अभ्यासून बघ. म्हणजे वाक्ये "आला. गेला. म्हणाला." अशा साध्या भूतकाळाने थांबतात, की "आला होता. गेला होता. म्हणाला होता." अशा पूर्ण भूतकाळाने? पॅराग्राफ़्स निबंधासारखे एका साईझचे असतात, की असमान? काही फ़क्त एका वाक्याचे? त्यातून पंच जास्त चांगला पडतो का? संवाद किती असतात? नेमके कुठे? कथेचा कोणता भाग संवादांतून पुढे सरकतो, आणि कोणता निरुपणातून? तशीच विभागणी का केली जाते? कथेमध्ये आणि नाटकाच्या स्क्रिप्ट मध्ये नेमका फ़रक कसा असतो, असावा? (नाटकाच्या स्क्रिप्टमध्ये सगळे संवादच असतात, आणि रंगमंचावरच्या पात्रांच्या हालचाली फ़क्त कंसात निरुपणात दिलेल्या असतात. त्याबद्दल म्हणतोय मी.)

तू एक अनुभवी मायबोलीकर, मनोगती, ब्लॉगर आणि कथालेखिका आहेसच. ही कथा कुणीतरी नवोदित लेखिकेने लिहीली आहे असं ऍझुम करून मी सल्ला द्यायचा प्रयत्न केला - टेक लाईट.

जस्ट अ लि’ल इम्प्रूव्हमेण्ट ऍण्ड यू’ल बी देअर - विथ अ पर्फ़ेक्ट पीस.

अजून एक कॉम्प्लिमेण्ट - कथा रोमॅण्टिक असूनही तू ती मस्त संयतपणे मांडलीस, कुठेही शॄंगारिक केली नाहीस. कधीकधी तर लेखिकांनाही "तो" मोह आवरत नाही असं पाहिलंय. :)

abhijit said...

chhaan utarlee aahe katha! liheet rahaa....:-)

कोहम said...

Poonam,

Katha chaan aahe. pan shevat apekshit vaTala. mala asa vaTat hota ki phil la he sagala aadhipasunach mahitey. But he is a businessman and as far as amy serves the purpose he wouldnt mind paying for Amy.

Anyways, I think its too lengthy for a single post, if you had split it into 3, maybe it would have encouraged many to read it fully. Me pan skip karat karat vachali.......

evadhi effort gheun ti neet pochalich nahi janateparyanta tar kay maja?

पूनम छत्रे said...

आभारी आहे हरेकृष्णाजी, मंगेश, सर्किट, अभिजित आणि कोहम.

हरेकृष्णाजी, मंगेश, अभिजित- हा प्रयत्न आवडल्याबद्दल आणि तसे कळवल्याबद्दल धन्स. मंगेश, कथा पूर्ण वाचल्यानंतरही तुला ती आवडेल अशी आशा करते :)

सर्किटभाय! या प्रोत्साहनाबद्दल किती आभार मानू? :) तू लिहिलं आहेस त्यातला शब्दनशब्द पटला. खरंय, माझी शैली निवेदनात्मक होते जाते.. आणि ती वाचकाला मग खिळवून ठेवू शकत नाही. खरंच आता आवडते लेखक ’कसे’ लिहितात याचा गंभीरपणे अभ्यास केला पाहिजे. ही अशी कथा मी प्रथमच लिहिली आहे, त्यामुळे या सल्ल्याची नक्कीच आवश्यकता होती. मनापासून धन्यवाद.

कोहम, बरोबर. तू मागेही म्हणला होतास की लांबी खूप जास्त होते आणि मग स्किप करत वाचलं जातं. पण कथा म्हणलं की इतकी लांबी हवीच ना? :( २-३ भागात लिहायचं झालं तर आवश्यक तिथे थांबायचं, योग्य ती कलाटणी द्यायची, असं ठरवून मग ती दीर्घकथा लिहावी लागेल. तरीही या पेक्षा ही कथा क्रिस्प होऊ शकली असती हे अगदीच मान्य! :)

पुन्हा एकदा आभार लोक्स :) क लो अ ही वि!

Shraddha said...

पूनम,

कथा वाचून खरं सांगायचं तर निराशा झाली. मला जाणवलेले मुद्दे खालीलप्रमाणे -

१. एक गंमत... :-) अशा प्रकारचे व्यवहार असणार्‍या कथा ह्या परदेशी पार्श्र्वभूमीवर का बेतलेल्या असाव्यात? (दुसरे उदाहरण ती शून्य कादंबरी.)
२. मुळात ऍमी ही फिलची लग्नाची बायको नाही त्यामुळे शेवटची कलाटणी निष्प्रभ वाटते. फिल हा त्याला हवे तसे वागू शकतो. ऍमीला धक्का बसू शकतो फिलला तिथे पाहून, तसं तू दाखवलंही आहेस. पण त्या तरुणीला तिथे दाखवायचे प्रयोजन अस्पष्टच राहतं.
३. काही ठिकाणी हे चक्क तंतोतंत भाषांतर वाटायला लागतं.
"एमी? काय मी एमीशी बोलत आहे?" (Am I talking to Amee?)
४. संवाद किंवा पार्श्वभूमी रेखाटन हे कमी झाल्यामुळे ऍमीची घालमेल पुरेशी पोचत नाही, हे माझं मत.

अशा गोष्टींमुळे कथा मराठी मिल्स आणि बूनच्या पातळीवर राहते.
आपण जेव्हा अनुभवलेल्या गोष्टींच्या आधारे कथा लिहितो तेव्हा प्रसंग खुलवायला, रंगवायला आपल्याला अडचण येत नाही. कारण सर्व गोष्टी परिचयाच्या असतात. उदा. तुझ्या आधीच्या कथा किंवा मी सॉफ्टवेअर इंजिनीयर्स ना केंद्रभागी ठेवून लिहिलेल्या कथा.
वेगळ्या, अपरिचित वातावरणातल्या कथा लिहिताना कथा समाधानकारक होईपर्यंत तिचे पुनर्लेखन करत राहणे, हा एक उपाय! आणि एखाद्या व्यक्तीला तिचे वाचन करायला लावून ती कितपत प्रभावी वाटतेय, हे जाणून घेणेदेखील उपयुक्त ठरावे.
असो. अशाच वेगळ्या प्रयत्नांसाठी शुभेच्छा. :-)

Webcam said...

Hello. This post is likeable, and your blog is very interesting, congratulations :-). I will add in my blogroll =). If possible gives a last there on my blog, it is about the Webcam, I hope you enjoy. The address is http://webcam-brasil.blogspot.com. A hug.

rakesh said...

GOOD ONE.

English kadambari cha touch janavtoy, pan kalatni chhan aahe.

jevha kahi lokanna anuvad vattoy mhanaje khupach pudhchi majal aahe.

mazya mate swatah (muktpane)lihine he mul kadambari la dharun aanuvad karanya peksha sope aaste.

Anonymous said...

humm vegala lihayacha prayatna changala ahe. shevatachi kalatani apexita asali tari kadachit yahun dusara changala shevata asu shakala nasata ya kathecha.

meenu

Anonymous said...

बर्‍याच दिवसांनी तुझा ब्लॉग बघितला. एक कथा आणि एक ललित.... वॉव. ललित वाचायचंय अजून.

'चीटींग' मध्ये मला वाटलं की कार्लो आणि एमीचं एकत्र येणं हे फिलचंच कारस्थान असतं की काय.... पण तसं घडत नाही. श्रद्धा म्हणाली ते मलाही पटलं की अश्या प्रकारच्या कथांमध्ये परदेशी पार्श्वभूमीच का मांडाविशी वाटते? असो. प्रयत्न जमलाय बर्‍यापैकी. 'कॅरॅक्टर स्केचिंग' मधला तुझा हातखंडा इथेही प्रभावी ठरलाय नेहमीप्रमाणेच......

मंजूडी

Anonymous said...

बर्‍याच दिवसांनी तुझा ब्लॉग बघितला. एक कथा आणि एक ललित.... वॉव. ललित वाचायचंय अजून.

'चीटींग' मध्ये मला वाटलं की कार्लो आणि एमीचं एकत्र येणं हे फिलचंच कारस्थान असतं की काय.... पण तसं घडत नाही. श्रद्धा म्हणाली ते मलाही पटलं की अश्या प्रकारच्या कथांमध्ये परदेशी पार्श्वभूमीच का मांडाविशी वाटते? असो. प्रयत्न जमलाय बर्‍यापैकी. 'कॅरॅक्टर स्केचिंग' मधला तुझा हातखंडा इथेही प्रभावी ठरलाय नेहमीप्रमाणेच......

मंजूडी

Anonymous said...

बर्‍याच दिवसांनी तुझा ब्लॉग बघितला. एक कथा आणि एक ललित.... वॉव. ललित वाचायचंय अजून.

'चीटींग' मध्ये मला वाटलं की कार्लो आणि एमीचं एकत्र येणं हे फिलचंच कारस्थान असतं की काय.... पण तसं घडत नाही. श्रद्धा म्हणाली ते मलाही पटलं की अश्या प्रकारच्या कथांमध्ये परदेशी पार्श्वभूमीच का मांडाविशी वाटते? असो. प्रयत्न जमलाय बर्‍यापैकी. 'कॅरॅक्टर स्केचिंग' मधला तुझा हातखंडा इथेही प्रभावी ठरलाय नेहमीप्रमाणेच......

मंजूडी

Anonymous said...

baki sagal theek ahe. pan te khush kela - khush kela ugach padadyadun bolalyasarkha watat. hyat saralsotpana dakhwata ala asata.

Anonymous said...

JAGICH HADARLE GA MI.
ASHI KAHI HOU SHAKT KA GA?
ITS REALLY HORRIBLE STAGE ON THEM LIFE. TOO MUCH HORRIBLE IT IS YAAR.
BUT I LIKE UR SCRIPT ITS TOO GOOD.

Anonymous said...

by the way kontya picture chi story dhapli aahe ?

atul said...

u write V'well, so soft & sombre, I like it, BestWishes & W'regards 2 u all.

Unknown said...

sundar katha ahe pan shevat ajun changla karta ala asta