--२--
दोन दिवस हरवल्यासारखे गेले अजिंक्यचे.. म्हणजे रोजची कामं सुरू होती, ऑफिसमधेही रूटीन चालू होते. पण हरेक रिकामा क्षण ऋजुताच्या आठवणी येत होत्या.. ट्रेकच्या दुसर्या दिवशी ती त्याच्या ग्रूपबरोबबरच उतरली होती.. गप्पच होती, सगळं लक्ष नीट उतरण्याकडे होतं.. अजिचे विनोद चालू होते, बरोबर नितेशही होता.. तेव्हाच मोबाईल नं exchange झाले होते. परत पुण्याला आल्यावर ऋजुनी त्याला पुन्हा एकदा thanks दिले होते. आता सगळेच पुन्हा मनूच्या साखरपुड्याला भेटणार होते. दहा दिवस होते त्याला.. तब्बल दहाऽऽऽऽ दिवस! कसे जाणार होते इतके दिवस? कित्येक वेळा अजिचा हात मोबाईलकडे गेला होता.. पण तिचा नंबर दिसला की धीर व्हायचा नाही.. काय बोलायचे तिच्याशी? की मला तुझी फ़ार आठवण येतीये.. मला दुसरं काहीच सुचत नाहिये.. माझ्या डोळ्यासमोर सतत तूच आहेस.. मी प्रेमात पडलोय का तुझ्या? ई! हेही तिलाच विचारायचे? अजिला हसू आलं! त्याने आज ट्रेकचे फोटो develop करायला टाकले होते.. कसे आले असतील फोटो? चंद्राचे? आणि ऋजुचे? ऋजुचे मस्तच आले असणार.. दिसतेच कसली सुरेख ती! मनूच्या साखरपुड्याचा तो official photographer होता.. त्यासाठी रोल घ्यायचे होते त्याला तेव्हाच.. चला, कामं आहेत फ़ार!
इतक्यात मोबाईलवर नवीन मेसेज आल्याचे कळले.. अजिनी पाहिले तर.. New Message Rujuta ! ऋजु!! चक्क ऋजुचा मेसेज! अजिची धडधड वाढली! काय असेल? काय म्हणत असेल? काही कारणानी रागावली नसेल ना? तिचा फोटो काढला मी हे समजलं का तिला? कसाबसा त्याने मेसेज ओपन केला.. "तुझ्याशी जरा बोलायचे होते.. भेटू शकशील का आज संध्याकाळी थोडा वेळ please ?" आयला! हा काय मेसेज आहे? काय बोलायचे आहे नक्की?? भेटू शकशील??? हा काय प्रश्न आहे- आत्ताही भेटू शकेन मी! पण का?? का भेटायचे आहे??? काय बोलायचे आहे??? ऋजु.. तुलाही तसेच होतंय का जसं मला होतंय? काय confusion आहे!!!! अजिंक्यानी रीप्लाय दिला.. "हो, भेटू आज.. ६.३० वैशाली" मेसेज पाठवल्यानंतर त्याला आठवले की फोटो आणायचे होते! जाऊदे! मरुदे!!! ऋजु भेटतीये आपणहोऊन.. तिच्यापेक्षा काय फोटो महत्त्वाचे आहेत? बावळट!
कसाबसा कामाला लागला तो पुन्हा.. झाली एकदाची संध्याकाळ! ऑफिसमधून लवकरच बाहेर पडला तो थोडा.. ऋजुतासाठी काही घ्यावं का असा विचार आला होता मनात, पण झटकला त्याने तो! मुळात भेटायला कशाला बोलावले आहे माहित नाही.. कदाचित पत्ता कटही असेल! उगाच अजून घोळ नको!
काय गर्दी वैशालीपाशी! parking ला जागा पण लांब मिळाली.. चालत चालत आला तर दारातच ती उभी.. अजिच्या हृदयाचा एक ठोका चुकला! काय सुंदर दिसते ही.. साधासा पिस्ता कलरचा ड्रेस होता.. केस बांधलेले होते.. पण गोड दिसत होती.. त्याला पाहिल्यावर ती हलकेच हसली.. अजिचा जीव भांड्यात! चला, म्हणजे रागवली नाहिये तर! हुश्श्श! वैशाली भरलं होतं नेहेमीसारखच! पण त्यांना luckily कोपर्यातलं टेबल मिळालं! अजिच्या चेहरावर एक हरवलेला, पण हिनी कशासाठी बोलावलं असेल याची उत्सुकता असलेला असा संमिश्र लूक होता!! ऋजुताचा चेहरा पण विचारमग्न होता.. वैशालीच्या वेटरला नेहेमीप्रमाणे घाई होती.. पाण्याचे ग्लास आपटून गेला तो..
"अरे तुला एक विचारायचं होतं.."
(अगं विचार ना मग! जीव घेऊनच विचारणार का आता!) "काय?"
"तुझा आवाज छान आहे, परवा ऐकला ना.. शिकला आहेस?"
(ई! फ़ुस्स! पण हुश्शही.. सेफ़ टॉपिक आहे!) "नाही नाही.. शिकलोबिकलो नाहिये.. असंच गातो.. बरा गातो असं म्हणतात लोक" अजि हसला.. तीही.. "पण तू जबरदस्त गातेस.. मस्तच.. किती वर्षं शिकत आहेस?" " thanks .. झाली खूप वर्षं! सातवीपासून.. परिक्षाही दिल्यात.. बरं मला काय विचारायचं होतं.. बघ हा.. प्लीज हसू नकोस, आवडलं नाही तर सांग तसं हं.."
(ही विचारणार तरी काय आहे? आणि विचारूनच का नाही टाकत पटकन? किती ताणायचे याला काही लिमिट??? )
शेवटी ऋजुतानी विचारलच.. "मनूचा साखरपुडा आहे ना.. तर समारंभ झाला की माझी अशी idea आहे की गाण्याचा program करायचा.. म्हणजे अगदी program असा नाही, पण थोडी गंमत.. घरचे लोक, आपण friends असू तेव्हा.. थोडी चिडवाचिडवी, थोडी मजा.."
"ए, छान idea आहे.."
"त्यांच्या लग्नात खूप गडबड होईल.. चालली ना US ला.. तेव्हा जमणार नाही, तर आत्तातरी.. तू गाशील का माझ्याबरोबर?"
"मी??? काहीही काय?"
"का? तुझा आवाज चांगला आहे.. थोडी तयारी केली, रियाझ केला तर छान लागेल तुझा आवाज.. आणि आपल्याला कुठे स्पर्धेत गायचय? सगळे घरचेच असतील.."
"तरीपण काय.. कुठे तू, कुठे मी.. ह्यॅऽऽ!" अजि आढेवेढे घ्यायला लागला..
"तसं कॉलेजमधला प्रीतम आहे.. तो मस्त गातो, तयारीचा आहे.. पण तो मनूला ओळखत नाही.. उगाच तेवढ्यासाठी त्याला बोलवायचं engagement ला म्हणजे नको वाटतं ना.. "
(प्रीतम???? काही नको!!!) "असं आहे होय? गाईन की मी मग. प्रीतम वगैरे नको.." ऋजुता अजिंक्यकडे पाहून हसली. सारवासारव करत तो म्हणाला.. "नाही म्हणजे तसं नाही.. बाहेरची लोक कशाला family function मधे असं वाटलं मला.."
"बरं, ठरलं मग.. पण आपल्याकडे जेमतेम ५-६ दिवस आहेत. गाणी मी काढते.. पण रोज प्रॅक्टिस करायला लागेल. माझ्या घरी येऊ शकशील? एक-दिड तास पुरेल.."
"घरी? हो, येईन की.. माझं ऑफिस संपल्यानंतर.. से, ७ ला?"
"चालेल की.. कसलं काम करतोस तू?"
"अगं मी CS करतोय.. Inter झालंय.. सध्या articleship करतोय एका फ़र्म मधे.. जूनमधे final देणार.. तू MCom ना?"
"हो, पण मला गाण्यात जास्त रस आहे.."
"मग त्या सारेगमप मधे नाही का घेतलास भाग तू?"
"शी, ते किती commercialised आहे.. गाण्यावर कमी आणि ड्रेसवर जास्त भर त्यांचा.. मला नाही आवडत.."
हे संभाषण कितीही चाललं असतं, पण ऋजुला घरी जायचं होतं आणि ते फोटो! अजि विसरलाच होता जवळजवळ..
"कशी आली आहेस तू? घरी सोडू का तुला? कुठे राहतेस? उद्यापासून यायचय ना?"
"माझी activa आहे, पण बरोबर जाऊ आपण.. घर दाखवते तुला.."
"पण मला मधे एक काम आहे.. परवाचे ट्रेकचे फोटो पिकप करायचे आहेत.."
"हो? वॉव.. म्हणजे मला लग्गेच पहायला मिळतील.."
अं? नको! त्यात तिचे तिला न विचारता काढलेले फोटो पण होते ना! आता?? अजिनी डोक्याला हात लावला..
"ए, मला एक अजून काम आठवलं अचानक.. आज नाही येत मी तुझ्याबरोबर.. तू हो पुढे.. मी उद्या तुला फोन करतो ऑफिसनंतर आणि तिथूनच येईन.. चालेल?"
ऋजुताला विचित्र वाटलं, पण म्हणली ठिके आणि गेली पुढे.
अजिनी हुश्श केले आणि तो फोटो आणायला गेला.. फोटो मिळाले, पण excitement, nervousness मुळे अजिला तिथे ते पाहवलेच नाहित. तो थेट घरी आला.. जेवून मग खोलीत आला आणि हळूच त्याने envelope उघडलं.. अधीरतेनी चंद्राच्या फोटोंच्या आधीही त्याने ऋजुचे फोटो पाहिले! वॉव.. सुंदर आले होते.. जसे त्याला हवे होते तसेच.. त्या गाण्यात ओतलेले सगळे भाव तिच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते.. काय सुंदर होती ती.. उद्यापासून तिच्याबरोबर रोज संध्याकाळ घालवायची.. रोज! रोज ८ दिवस.. सही! भगवान जब देता है, छप्पर फ़ाड के!! पण गाणी गावी लागतील नीट, नाहितर येईल तो प्रीतम! काय पण नाव आहे प्रीतम!! .. man, time to brush up your singing!!
btw, चंद्राचे फोटो इतके खास नव्हते आले, clarity कमी होती, जरा धूसरच आले होते.. का ऋजुपुढे चंद्रही पसंत पडत नाहिये? ह्यॅ काहीही काय! अजिनी झोपायचा प्रयत्न केला.. पण आजही ती पळाली होती!!
क्रमश:
September 11, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comments:
छान रंगतेय कथा...
Post a Comment