नमस्कार! माझ्या ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत!!
कथालेखनात मी नवीनच! २००६ मधेच लिहायला सुरुवात केली मायबोली.कॉम या वेबसाईटवर. सुरुवात तशी दबकत दबकतच केली, पण लोकांनी कथा वाचल्या, प्रतिक्रिया दिल्या आणि मला लिहायला हुरुप मिळाला, थोडा आत्मविश्वासही आला.
मी लिहिलेल्या कथा काही उच्च साहित्यिक दर्जाच्या नाहीत. आजूबाजूला ज्या घटना घडतात, तेव्हा त्यातली पात्रं कशी वागू शकतील हेच मी सांगायचा प्रयत्न करते- अर्थात माझ्या दृष्टितून! त्यातून कोणाला उपदेश करायचा अथवा संदेश द्यायचा हेतू नाही. साधंसरळ लेखन आहे, ते गोड मानून घ्याल अशी इच्छा आहे.
या ब्लॉगवर पूर्वी मायबोलीवर लिहिलेल्या कथा, ललित आहेतच. त्याबरोबर नव्या कथा, ललित इत्यादी लिहायचा मानस आहे. तुम्ही ते वाचाल, तुम्हाला ते आवडेल अशी अपेक्षा ठेवते. तुमच्या चांगल्या-वाईट प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. माझ्यासाठी लेखन जितकं महत्वाचं आहे, तितकच हे सुद्धा जाणून घेणं की लोकांना ते आवडतय की नाही...
वाचून जे काही वाटलं ते अवश्य कळवा, सुधारणा सुचवा, काही खटकलं तर तेही!
तुमचं पुन्हा एकदा इथे मनापासून स्वागत!
येत राहा...
पूनम
May 16, 2007
Subscribe to:
Post Comments (Atom)
14 comments:
वा!! मस्त आहे blog
पूनम, जालनिशी सुरू केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन आणि मन:पूर्वक शुभेच्छा!
प्रसाद
www.sadha-sopa.com
हार्दिक अभिनंदन, पूनम!!!
कथा छान आहेत. सर्वांना आवडतील!
तुझ्या ब्लॉगचं ले-आऊटही छान केलयंस तू!
पुढील उपक्रमांसाठी शुभेच्छा! :-)
मन:पूर्वक अभिनंदन पूनम छानच झालाय तुझा ब्लॉग,नावही मस्त घेतलयस,
हार्दिक शुभेच्छा ग!
कथा वाचुन झाल्या की सविस्तर प्रतिक्रिया देते :)
हाय पूनम.....नव्या ब्लॉगबद्दल मन:पूर्वक अभिनंदन !!
तुझ्या कथापौर्णिमेच्या चांदण्यात मनसोक्त भिजायला मिळणार तर....!!
तुझ्या लेखनाला खूप खूप शुभेच्छा!!
पूनम,
तुझ्या उपक्रमाला हार्दिक शुभेच्छा. सवडीने वाचून अभिप्राय कळवतो
विवेक काजरेकर
Welcome to the club! :)
एकदम देखणा दिसतोय. लेखन सवडीने वाचून अभिप्राय लिहीनच.
ब्लॉगसाठी अभिनंदन आणि शुभेच्छा!!
हार्दिक अभिनंदन
तुझ्या कथा खरच छान असतात.. अगदी कुणाच्याही जिवनात घडु शकतील्ल अशा! नेहमीच पौर्णिमा राहु दे या blog वर! शुभेच्छा!
वाह ! सुंदर ब्लॉग . अप्रतिम डिझाईन झालंय. कथांबद्दल मी काय बोलावं ? शुभेच्छा
KathapaurNimA
surekh nAv Ani lekhanahI chhAn asaNAr yAt vAdach nAhI
navin blog sAThI subhechchhA :)
Indradhanushya
hi
aawadal tujhya blogch naav... apratiim...
ani te chandratal chitra pan.... tumha tighanch
surekh:)
maudee
Hi Poonam,
Khupach avadali tuzi katha..
mastach......
chaangalaa jamalaay blog
-peshawa
Blog khup chaan aahe!!! me aaj baghitla... lalit tar khupach sundar lihilet. kay lihava tech kalat nahie :)
Dhanashree
Post a Comment