नवीन वर्षाची चाहूल कशाने लागते? अर्थातच नवीन वर्षाच्या कॅलेंडरमुळे! नवीन वर्षाचे संकल्प, नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी होणार्या पार्ट्या, हे सगळं कॅलेंडरपाठून येतं. साधारण १५ डिसेंबरपासून विविध दिनदर्शिका बाजारात येतात, जे नवीन वर्षाच्या भेटी देतात, त्यांच्याकडूनही कॅलेंडरं यायला लागतात.
मराठी मनांत कॅलेंडर आणि ’कालनिर्णय’ हे एक अपरिहार्य समीकरण झालंय. सुमंगल प्रकाशनची ही एक साधी दिनदर्शिका.. पण योग्य जाहिरातबाजी, अचूक टायमिंग आणि ’भिंतीवरी कालनिर्णय असावे’ या कॅप्शनमुळे ’कालनिर्णय’ला पूर्ण वर्षभराचा व्यवसाय केवळ एका महिन्यात मिळाला. कालानुरूप त्यांच्या जाहिरातीत बदलही झाले- ’कालनिर्णय द्या ना, कालनिर्णय घ्या ना’ पासून ’कालनिर्णय नसेल तर भिंत ओकीबोकी दिसते’ पर्यंत! मराठीनंतर गुजराथी आणि काही दक्षिणभारतीय भाषेतही हे कॅलेंडर आले. मग चक्क कॅलेंडरंही विविध ’साईझ’मधे उपलब्ध करून दिली ’सुमंगल’नी.. अगदी चारचाकीमधे लावण्यासाठी हाताच्या पंज्यात मावेल अश्या आकाराचं.. ते पूर्ण ऑफिसमधे नजरेच्या एका टप्प्यात दिसेल असं दोन फूट बाय एक फूटाचंही. मग आली खास परदेशस्थ लोकांसाठी असलेली ’इंटरनेट आवृत्ती’. आता तर अशी परिस्थिती आहे, की परदेशी रहाणार्या प्रत्येक मराठी कुटुंबाकडे तिकडे आपली मराठी संस्कृति जपण्यासाठी का होईना, पण ’कालनिर्णय’ नक्कीच असते. योगायोगानी बरीच परदेशस्थ मंडळी तिकडे त्यावेळी सुट्टीचा मौसम असल्यामुळे वर्षाखेर भारतात येतात आणि त्यांना आणि त्यांच्या तिकडच्या मित्रमंडळींसाठी ’कालनिर्णय’ आवर्जून नेतात.
हळूहळू पण निश्चितपणे कालनिर्णयनी इतकी लोकप्रियता गाठली की त्यांच्या स्पर्धकांनाही त्या जाहिरातबाजीची दखल घ्यावी लागली. मग ’महालक्ष्मी दिनदर्शिका’ तितक्याच धडाक्यानी आणि नामवंत, लोकप्रिय अभिनेत्री घेऊन आपलीही जाहिरात करायला लागली. इतर दिनदर्शिकाही स्पर्धेत उतरल्या.
या सर्वामुळे अर्थातच आपला सगळ्यांचां ’उपभोक्ता’ किंवा ’कन्झ्यूमर’ म्हणून फायदाच झाला. त्या बारा पानांवर, प्रत्येक दिवसाच्या चौकटीवर अक्षरश: ’माहितीचा भडीमार’ होऊ लागला. रोजची तिथी, तारीख, अमक्याची पुण्यतिथी, अमक्याची जयंती, रोजची रास, चंद्रोदय, सूर्योदय, सूर्यास्त.. एक ना अनेक.. बरं ती पानामागची जागा सुद्धा का म्हणून मोकळी सोडून वाया जाऊ द्यायची? मग आलेच त्यात ’नामवंत साहित्यकारांचे’ लेख, राशीभविष्य, पाककृति, ’स्वयंपाकघरातल्या टीप्स’, ’हे करून पहा’, ’वहिनीचा सल्ला’, ’रेल्वेचे टाईमटेबल’, ’पुस्तक परिक्षण’, ’योगाभ्यास’, ’उपयुक्त वनौषधी’ वगैरे वगैरे वगैरे..
ही तर झाली ’तिथी, वार’ दाखवणारी ’स्वयंपाकघरातली कॅलेंडरं’. पण ही काही दीवाणखान्यात शोभत नाहीत काही. तिथे पाहिजेत चकचकीत, गुळगुळीत कागदावर छापलेली, सुंदर चित्र (सुमारे पाऊण पान असलेली- शक्यतो सुंदर तरूणींची, तारीख दिसली नाही तरी चालेल) अश्या टाईपची ’कॅलेंडर्स’! पुष्कळ मोठ्या कंपन्या आजकाल या ’दीवाणखाना कॅटॅगरीत’ बसतील अशी कॅलेंडर्स काढतात. त्यांची आकर्षक छपाई आणि चित्र असलेली कॅलेंडर्स मोठ्या दिमाखात सर्वांचं लक्ष वेधून घेतात आणि अनायसेच त्या कंपनीची जाहिरात होते. ’एल.आय.सी’ अर्थातच ’जीवन बीमा निगम’ची कॅलेंडरं पाहिली आहेत? सरकारी कंपनीला अजिबातच शोभणार नाहीत असे सुरेख फोटो असतात कोणत्यातरी ’थीम’वर त्या कॅलेंडरवर दरवर्षी. तसंच काही औषधांच्या कंपन्या, जसं की ’हिमालय’ वगैरेंची कॅलेंडरं पण सुरेख असतात- त्यात गोंडस बाळं असतात आणि बाजूला अर्थातच त्यांच्या प्रॉडक्ट्सची जाहिरातही!
काही काही बॅंका/ कारखाने/ कंपन्या नित्यनियमानी दरवर्षी त्यांची टिपीकल प्रचंड मोठ्या तारखा असलेली कॅलेंडरं काढतात. त्यावर बाकी काऽऽऽऽही नसतं. एक रविवार आणि सार्वजनिक सुट्ट्या काय त्या ’लाल’ रंगात असतात. बाकी ठळक काळी शाई असलेल्या तारखा फक्त. कोपर्यात, रिकाम्या चौकोनात मिळते मग ’पौर्णिमा’, ’अमावस्या’, ’चतुर्थी’, त्या महिन्यातले आलेले महत्त्वाचे ’सण’ आदींना जागा. काही काही कार्यालयं मुद्दाम त्यांच्या कामगारांसाठी कॅलेंडर काढतात.. ही बहुतकरून ’देवीदेवतांचे फोटो’ असलेली असतात. कामगारांना नवीन वर्षाची छोटी भेट म्हणूनही दिल्यासारखं होतं, आणि घरी तसंही कॅलेंडर लागतच ना! डायर्या वगैरे लाड मोठ्या ’साहेब’ लोकांचे. कामगारांसाठी कॅलेंडर उत्तम! तसंच आजकाल वृत्तपत्रही स्वत:ची कॅलेंडरं काढतात.. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी रोजच्या दैनिकाबरोबर दिनदर्शिकाही! ’कम्झ्यूमर लॉयल्टी’ अशीच ’बिल्ड’ होते बरं!
सध्याचं अतिशय चर्चेतलं म्हणजे ’किंगफिशर’चं ’स्विमसूट स्पेशल’ कॅलेंडर! गेली ३ वर्षं हे कॅलेंडर येतंय.. याची ’थीम’ एकच.. ’स्विमसूट’ मधल्या सुंदर्या.. अर्थातच या कॅलेंडरच्या अगदी कमी प्रति ते काढतात आणि काही काही अतिमहत्त्वाच्या लोकांनाच गिफ्ट करतात. या कॅलेंडरवर आपला फोटो येण्यासाठी कित्येक नवीन, उगवत्या मॉडेल्स बरीच ’फील्डींग’ करतात असं ऐकीवात आहे. २००८चं हे कॅलेंडर सध्या नेटवर फिरत आहे. मी पाहिलं.. ठीकच वाटलं मला.. चोवीस फोटो आहेत, त्यातले अगदी मोजके म्हणजे ३-४च ’हॉट’ वगैरे आहेत. बाकीचे अगदीच ’ठाकठीक’..
बरं, कोणतंही कॅलेंडर हातात आलं की तुम्ही काय बघता आधी? मी आधी बघते की माझा वाढदिवस कोणत्या दिवशी आहे, मग त्यानंतर सर्वच आप्तांचे वाढदिवस, काहींच्या लग्नाचे वाढदिवस कोणत्या वारी येत आहेत ते.. शनिवार-रविवारला जोडून एखादा वाढदिवस असला तर सुट्टीचं, पार्टीचं प्लॅनिंग लग्गेचच सुरु होतं माझं! मग अर्थातच सर्व महत्त्वाचे सण कधी आहेत- गुढीपाडवा, गणपति, दसरा, दिवाळी वगैरे.. म्हणजे रजा कधीकधी घ्याव्या लागणार आहेत याचे हिशोब सुरु.. मग सार्वजनिक सुट्ट्या कधी आहेत.. २६ जानेवारी, १ मे, १५ ऑगस्ट, २ ऑक्टोबर हे या दृष्टीने फार महत्त्वाचे माझ्यासाठी. यांना जोडून एखादी सुट्टी असेल अजून एखादी तर सोनेपे सुहागा! थोडक्यात काय, की कॅलेंडर ’कालनिर्णय’चं असो की ’किंगफिशर’चं, माझ्यासारख्या नोकरी करणार्या संसारी बाईला त्यात सुट्ट्या कधी आहेत हेच जास्त महत्त्वाचं वाटतं! (अरे, पाहिलंत का? २००८ मधे २६ जानेवारी शनिवारी आहे.. म्हणजे मला ’लॉंग वीकेंड’! सही! कुठेतरी जवळ फिरायला जाता येईल.. चला, चौकशीला लागलं पाहिजे.. )
तर, मित्रहो, तुम्हाला सर्वांना माझ्यातर्फे नवीन वर्षाच्या शुभेच्छा! नवीन वर्ष सुखसमृद्धीचं, भरभराटीचं तर जावोच, पण नवीन वर्षाच्या तुमच्याकडच्या सर्व दिनदर्शिकांवर सुंदर चित्र असोत, (’किंगफिशर’ सारखं एखादं ’नेत्रसुखद’ कॅलेंडर तुमच्या private viewing साठी तुम्हाला मिळो,) ती माहितीपूर्ण असोत, मनोरंजक असोत आणि भरपूर सुट्ट्यायुक्त असोत हीच तुमच्यासाठी शुभेच्छा! विश यू अ व्हेरी हॅपी न्यू इयर!
December 27, 2007
December 12, 2007
स्ट्रेस बस्टर
’स्ट्रेस’ हा शब्द आपण आजकाल सर्रास वापरतो, नाही? ’स्ट्रेस, टेन्शन, मानसिक अस्वास्थ्य’ वगैरे.. सगळ्याचा अर्थ एकच.. वेगाने पळणार्या आयुष्यामुळे होणारे मनस्ताप, ऑफिसमधे, घरामधे निर्माण होणार्या समस्या, त्यामुळे डोक्यात अनावश्यक विचारांची गर्दी, त्यामुळे मनात निर्माण झालेले सुमारे पन्नास-शंभर प्रश्न, त्यांना न सापडलेली, किंवा मिळालेली असली तरी फारशी समाधानकारक नसलेली उत्तरं, त्यामुळे अजूनच वाढलेलं ’कन्फ्यूजन’.. आणि मेंदूचा टोटल राडा! आपला छोटासा मेंदू बिचारा ’स्ट्रेस’ होणार नाही तर काय?
मग ओघानी आलेच.. त्या स्ट्रेसला ’डीस्ट्रेस’ करायचे उपाय. ’योगा’ हा सध्याचा ’लेटेस्ट इन-थिंग स्ट्रेसबस्टर’ आहे हं. तसंच ’हास्यक्लब’चा फंडा पण खूप लोकप्रिय होत आहे. लोक निखळ, मनमोकळं हसायला दुर्दैवानी विसरले आहेत, त्यामुळे कृत्रिम का होईना, पण जीवनात हसू आणून तो ’स्ट्रेस’ थोडा कमी करायचा प्रयत्न करायचा. तसंच, सकाळी सकाळी ’मॉर्निंगवॉक’ ला जाणं, पळायला जाणं, संध्याकाळी टेकडीवर फिरायला जाणं... व्यक्ति तश्या प्रकृति, त्यामुळे प्रकृतिनुसार, तब्येतीला झेपतील, आवडतील असा मनावरचा ताण घालवायचा एखादा तरी प्रकार प्रत्येक व्यक्ति अनुसरते.
जगरहाटीनुसार मलाही येतोच की स्ट्रेस. डोक्याचं विचार करकरून पार भजं होतं. कळत असतं हं की हे सगळे विचार अनावश्यक आहेत, नकोयत हे आपल्याला, हे विचार कारण नसताना आपली झोप उडवत आहेत.. पण हे सगळं माहित असूनही त्या निगेटिव्ह विचारांवर मी नियंत्रण नाही आणू शकत. ते गर्दी करतातच डोक्यात. आणि मग माझी मानसिक अवस्था हळूहळू खालावत जाते. ’मी या जगातली सर्वात क्षूद्र व्यक्ति आहे, माझ्या हातून काहीही धड होऊ शकत नाही, काम जमत नाही, घर सांभाळता येत नाही, अवांतर वाचन नाही, तब्येत ठीक नाही..’ अगदी वाट्टेल त्या थरापर्यंत मन भटकून येतं. बरं, जात्याच आळशी असल्याकारणानी मी रोज काही फिरायला, व्यायामाला वगैरे जात नाही. त्यामुळे हा स्ट्रेस बिचारा माझ्या डोक्यात जागा मिळेल तिथे साचतच जातो. मग हळूहळू मानसिक अवस्था तळागाळाला जाते, एकदम ’रॉक बॉटम’च! आणि अशी एकदाची निचांकी पातळी गाठली गेली की अचानक कुठूनतरी संदेश येतो की ’बास आता. बक अप. आपण काही इतके गएगुजरे पण नाही. या स्टेजमधून बाहेर आलं पाहिजे.’ कसं? माझ्याकडे उपाय आहे ना, पण अगदी वेगळा आहे, तुम्हाला तो चमत्कारिकही वाटेल कदाचित.. पण माझ्यासाठी तो जालिम उपाय आहे खरा.
मी तडक गाठते ते ’ब्यूटीपार्लर’! तेही अपॉईंटमेन्ट वगैरे न घेता. एकदम धडक मोहीम.. नीचांकी पातळी कधी गाठली जाईल याचा नेम नसतो, साधारण दिड ते दोन महिने लागतात. पण त्यामुळे होतं काय, की अपॉईंटमेन्ट घेणं शक्य नसतं. मी तर मनात आलं की धाडकन अवतीर्णच होते तिथे. असो!
तर ब्यूटीपार्लरमधे पाऊल ठेवल्या ठेवल्या तिथली स्वागतिका गोड हसून स्वागत करते. नम्रपणे विचारते, "काय करायचंय?" उत्तर दिल्यानंतर पुन्हा तश्याच गोड आवाजात म्हणते, "एक मिनिट हं" आणि मग योग्य त्या ’डिपार्टमेन्ट’ कडून खातरजमा करून मला किती वेळ थांबायला लागेल याची कल्पना अगदी दिलगिरीयुक्त आवाजात देते. बास! इथेच माझा निम्मा शीण पळून जातो. इतकं गोड बोलणं, इतकं अदबीनं वागणं.. कल्पनातीत असतं हो माझ्यासारख्या सामान्य स्त्रीला. मग मी त्या स्वागतकक्षात बसते, नाही नाही, स्थानापन्न होते! तिथे माझ्यासारख्याच बायका, मुली आपापल्या नंबरची वाट पहात असतात. तिथेच पडलेल्या एका तद्दन फिल्मी मासिकाच्या आड चेहरा लपवून मी त्यांचं उगाचच निरिक्षण करते आणि त्यांच्या रंगरूपाला नाक मुरडते- अर्थात मनातल्यामनातच. (दुसर्याला हीन लेखणं हाही एक स्ट्रेसबस्टरच आहे बरंका!) एवढं होईपर्यंत मला पुष्कळच बरं वाटायला लागलेलं असतं.
अजून थोडा वेळ शांततेत गेल्यानंतर मला माझ्या ’डिपार्टमेन्ट’ मधे बोलावणं येतं. तिथे किमान दोन मुली माझ्या दिमतीला असतात. त्यांच्या ताब्यात मी माझा चेहरा, हात, पाय देते. त्या मन लावून त्यांना सांगितलेलं काम करतात. एकमेकींचे सल्ले घेतात, आपसात चर्चा करतात- ’मला सुंदर करण्यासाठी त्या किती कष्ट घेत आहेत’ असा विचार करून मी मनातल्यामनात धन्य होते. पण तसं न दाखवता मी एक विचारी चेहरा धारण करते आणि त्यांना माझ्या बहुमोल सूचना देते. त्या मुली त्या सूचना ’सर-आँखोंपर’ वगैरे घेत माझ्या अपेक्षा पूर्ण करायच्या मागे लागतात. माझ्या मताला कोणीतरी इतकी किंमत देतंय, माझ्या सूचनाबरहुकुमच काम होतंय.. याची एरवी मला सवय नसल्यामुळे माझं मन समाधानानी काठोकाठ भरतं. हा एक-दीड तास तरी अगदी ’रॉयल’ जातो. डोक्याला थंडावा देणारा मसाज होतो, चेहर्यावरच्या ’स्ट्रेसलाईन्स’ काढल्या जातात, हात-पाय तजेलदार दिसायला लागतात.. आईशप्पथ, फार मस्त वाटतं!
मग एकदाचं त्यांचं समाधान झालं की त्या मला पुन्हा त्याच गोड आणि नम्र आवाजात म्हणतात, "बघा मॅडम, ठीक आहे?" मग मी पुन्हा पुन्हा स्वत:ला निरखते आणि मग खडूसपणे, शक्य तितका आखूड हुंकार देते. त्या बिचार्या, त्यातही समाधान मानतात आणि आवराआवरीला लागतात. आत्तापर्यंत मी ’टोटली स्ट्रेस-फ्री’ झालेली असते.. मन उल्हसित वगैरे झालेलं असतं, ’तू सुंदर दिसत आहेस’ हे नुकतीच पर्स मधून गेलेली तीन आकडी नोट सांगत असते, निघता निघता ’कम अगेन’ असं ती स्वागतिका पुन्हा हसून म्हणते आणि मला सूचित करते की ’तुम्ही आम्हाला हव्याहव्याश्या आहात’! बस, और क्या चाहिये?
तरंगतच मी घरी पोचते. अत्यंत उत्साहानी नवर्याला विचारते, ’मी कशी दिसतीये?’
तो मला सुमारे दहा सेकंद अगदी व्यवस्थित टक लावून बघतो आणि म्हणतो, ’आज काय विशेष? तू नेहेमीच सुंदर दिसतेस मला.’
मी नुकतीच ’स्ट्रेस-फ्री’ झाल्यामुळे यातली खोच माझ्या लगेच लक्षात येत नाही. उलट मी अजूनच खुश होते. गुणगुणायला सुद्धा लागते चक्क!
कालांतराने ती खोच येते माझ्या लक्षात. ’मी कशीही दिसले तरी याला काहीच फरक पडत नाही’ अश्यासारखे निराशाजनक विचार यायला अजून साधारण एक महिना जातो. तोवर बाकी नकारात्मक विचारही प्रवेशकर्ते झालेले असतात. कुठेतरी काहीतरी बिनसलेलं असतं, मानापमान झडलेले असतात, डोक्यावर कसलं ना कसलं टेन्शन असतंच.. पुन्हा तेच चक्र सुरु होतं- विचार, विचार आणि विचार!!
आणि मग पुन्हा येते ती वेळ- स्ट्रेस-फ्री व्हायची! ब्यूटीपार्लर गाठायची!!

Labels:
हलकंफुलकं लेखन
December 4, 2007
आई!
नुकतीच आठ दिवसांचं माहेरपण संपवून घरी आले परत. निघताना नेहेमीप्रमाणेच घशात काहीतरी अडकल्यासारखं झालं, रडू येत होतं, ’संपलं माहेरपण, आता पुन्हा सुरु’ सारखं काहीतरी उगाचच वाटत होतं. वास्तविक माझं सासर-माहेर एकाच गावात- अगदी मोजायचंच झालं तर केवळ पाच किलोमीटरवर.. मी मनात आणलं तर अर्ध्या तासात बॅग भरून आईकडे मुक्कामाला येऊ शकते.. कधीही. फोन तर चालू असतातच. अडीअडचणीला आईची मदत असतेच. आई इतकी accessible असूनही तिच्याकडे रहायला आल्यानंतर परत जाताना रडायला येतंच. लग्नाला इतकी वर्ष झाली तरीही..
काय जादू असते त्या माहेरात? त्या वातावरणात? त्या जागेमधे? तर, तिथे ’आई’ असते!! मला अगदी मनापासून वाटतं की घराला घरपण जसं तिथल्या करत्या स्त्री मुळे येतं, तसं माहेराला माहेरपण आईमुळे येतं. तिचं तिथे असणंच खूप दिलासा देणारं असतं. माहेर म्हणलं की आई हवीच. तसंही कोणत्याही विवाहित बाईला माहेरची ओढ असतेच, पण ती टिकून रहाते ती आईमुळे. जितकी ओढ पंचविशीतल्या मुलीला असते, अगदी तितकीच ओढ साठीतल्या बाईलाही आपल्या ऐंशी वर्षाच्या आईबद्दल असते. ’आई गेली की माहेर संपलं’ असं माझ्या ओळखीच्या एक आजीबाई म्हणायचा, आणि ते मला मनापासून पटतं. आईचा अकृत्रिम स्नेह, तिचं नुसतं असणंच इतकं दिलासादायक असतं की ’माहेरी जायचं’ या कल्पनेनीच नवीन उभारी मिळते.
वास्तविक माझे आणि माझ्या आईचे चिकार मतभेद होतात, आमच्या आवडीनिवडीत फरक आहे, शाब्दिक चकमकी तर नित्याच्याच. तरीपण मला आई लागते! अगदी अजूनही. नवीन केलेली प्रत्येक गोष्ट, किरकोळपासून मोठी खरेदी, मनातले प्लॅन्स, ऑफिसातल्या घटना, मैत्रिणींबरोबरच्या गप्पा, तब्येतीच्या तक्रारी.. सगळं सगळं ऐकवण्याचं माझं हक्काचं स्थान आहे ते. तिचे सल्ले तर पदोपदी मला लागतातच.. मी ते ऐकेनच असं नाही, पण लागतात मला. तिच्या मताचं महत्त्व खूपच असतं माझ्या फायनल निर्णयामधे.
आई आणि मुलांमधे किती सहज नातं असतं ना? ती किती करत असते सतत आपल्या मुलांसाठी.. आणि अगदी सहजपणे. त्यात कसला अभिनिवेष नसतो, ना कसला आव. अगदी नैसर्गिक. मुलांवर आलेलं प्रत्येक संकट, त्यांना भेडसावणारा प्रत्येक छोटा-मोठा प्रश्न, त्यांना त्रास देणारी प्रत्येक बारीकसारिक गोष्ट ही जणू आपली स्वत:चीच असल्याप्रमाणे आई ती निस्तरायला, सावरायला पुढे येतेच. आपण तिच्या मदतही मागितलेली नसते, तोवर तिचा हात पुढे आलेलाही असतो! मुलं तिच्यावर अवलंबून असतात तेव्हा, आणि ती सक्षम झाली, स्वतंत्र झाली तरीही हा आधार असतोच. मला तर कित्येक वेळा आईशी नुसतं बोललं, अगदी साध्या शिळोप्याच्या गप्पा मारल्या तरी खूप बरं वाटतं.
खरं तर आपण सगळेच आपापल्या आईला इतकं गृहित धरत असतो की ’आई’बद्दल असा वेगळा विचार कधी करत नाही. मी तरी नव्हता केला कधी.. मग आजच हे सगळं असं लिहून काढावसं का वाटलं? तर.. गेल्या काही दिवसात फार वाईट बातम्या ऐकल्या काही. दोन मैत्रिणींना त्यांच्या आईला कायमचा निरोप द्यावा लागला. माझी एक नणंद अचानक गेली, तिचा तर मुलगा अवघा १२ वर्षाचा आहे.. पुन्हा एकदा जाणवलं की जीवन किती क्षणभंगूर आहे.. कित्येक लोक आपल्याला भेटत असतात, मदत करत असतात.. त्यांना आपण सहजपणे thank you म्हणून जातो.. पण आपलं सर्वात जवळचं, सर्वात पहिलं नातं- आईचं.. तिला किती वेळा आपण साधं acknowledge ही करत नाही.. अगणित कष्ट, खस्ता, चिंता वहात असते बिचारी आपल्या मुलांच्या, आणि काही अपेक्षाही ठेवत नाही.. उलट मला खात्री आहे- हे असलं काही बोललेलंदेखील आवडणार नाही तिला.. ’त्यात काय विशेष?’ ’ते आपोआप होतं, काही वेगळं करावं लागत नाही त्याला’ असंच म्हणेल ती. तरी पण.. राहवत नाही..
आत्तापर्यंत आईने कधीच मला काही मागितलं नाही, कायम दिलंच आहे.. आणि आई, पुन्हा एकदा मी मागतच आहे तुझ्याकडे.. तुझ्या मायेची पाखर, तुझ्या अव्यक्त प्रेमाची ऊब, तुझ्या स्पर्शातला दिलासा, तुझ्या शब्दातली आपुलकी.. हे सगळं सगळं मला हवंय..आणि खूप खूप हवंय..

ललित
Subscribe to:
Posts (Atom)