May 21, 2025

कथापौर्णिमा

#कथापौर्णिमा या माझ्या कथासंग्रहाची माहीत नवीन (आणि जुन्या) वाचकांसाठी 😊

ज्येष्ठ साहित्यिका मंगला गोडबोले आणि लेखक, दिग्दर्शक किरण यज्ञोपवीत यांच्या शुभहस्ते २८ ऑक्टोबर, २०२३ ला कोजागिरी पौर्णिमेच्या सुंदर संध्याकाळी #कथापौर्णिमा चे प्रकाशन झाले. रसिक साहित्य, पुणे यांनी या कथासंग्रहाची उत्कृष्ट निर्मिती केली आहे. ज्येष्ठ साहित्यिका डॉ. विजया वाड यांनी सुंदर प्रस्तावना लिहिली आहे. 
 


“एखादी कथा सुरू केली, की पूर्ण होईपर्यंत चैन पडत नाही, पुढे काय असेल याची उत्सुकता वाटत राहते...”
“संवाद अतिशय ओघवते आहेत.”
“जणू काही माझ्यासमोर कथा घडत आहे, असं वाटत होतं.”
“आम्ही वेळा ठरवून संग्रह वाचतोय, नाहीतर भांडणं होत आहेत.”
“unputdownable!” 
 
“कथापौर्णिमा” वाचून मला मिळालेल्या काही खऱ्याखुऱ्या प्रतिक्रिया आहेत! 😊
 


मानवी भावभावनांना शब्दबद्ध करणाऱ्या १५ कथा संग्रहात आहेत. संग्रह शेकडो वाचकांनी वाचला आहे आणि त्यांना तो आवडला आहे. संग्रहाला "सर्वोत्कृष्ट लक्षवेधी कथासंग्रह" असे साहित्यवलय या संस्थेचे पारितोषिकही प्राप्त झाले आहे. 
 
स्वतः वाचायला आणि भेट द्यायला हा कथासंग्रह अगदी योग्य आहे. हवा असेल, तर मला कॉमेंट करून सांगा, किंवा मेसेंजर वर मेसेज करा. मी संग्रह तुम्हाला पाठवेन.
पृष्ठसंख्या : २७० पाने
किंमत : रु. ३०० पोस्टेजसहित.
स्पीड पोस्टने ३ दिवसात तुम्हाला घरपोच हा उत्तम कथासंग्रह मिळेल.
तुमच्या कॉमेंटच्या प्रतीक्षेत 😊

No comments:

Post a Comment