November 21, 2012

हस्तकला


लोकांच्या बोटात जादू असते, नाही? वीणकाम, भरतकाम, रांगोळ्या, चित्रकला, हस्तकलेचे विविध प्रकार लोकांच्या बोटांमधून अक्षरश: जन्म घेतात, ते पाहूनच डोळ्याचं पारणं फिटतं, स्तिमित व्हायला होतं दुसर्‍या कोणीतरी केलेली हस्तकला पाहूनच जिथे आपल्याला आनंद होतो, तिथे त्या घडवणार्‍याला काय अवर्णनीय समाधान लाभत असेल, नाही? प्रत्यक्ष आपल्या हातूनच एखादी कलाकृती घडली आहे, हे एका चमत्कारापेक्षा खचितच कमी नाही.

माझ्यासारख्या अभागी जीवांचं जीवन म्हणजे कोणतंच कौशल्य अंगी नाही अशा सामान्य वकूबाचं. आम्ही दुसर्‍यांचं पाहून सर्व कलांच्या सागरात गुडघे भिजतील इतपतच पाण्यात शिरतो, त्यातच थोडे फार हात मारतो, डुबतो, गटांगळ्या खातो आणि दम संपला म्हणून बाहेर पडतो. आपल्या हातून खरंच काहीच भरीव घडणार नाही का कधीच? आजूबाजूचे लोक जेव्हा एका साध्या शाळेच्या प्रोजेक्टमध्येदेखील क्रियेटिव्हिटी ओततात, ते पाहून हे प्रश्न आणि त्यांची उत्तरं कोण्या एका क्षणी एकदम निराश करतात. चौसष्ट कला अस्तित्वात असताना; एकट्या हस्तकला ह्या विभागात अनेक उपशाखा असताना आपल्याला त्यातली एकही जमू नये हा विचार जीवनमरणाइतका भयंकर नसेल कदाचित, पण मनाला खंत वाटेल इतका तरी आहे. 

अशी खंत मनाच्या कोपर्‍यात साठवून जगत असताना, अचानक मला एक आशेचा किरण गवसला. रांगोळी. आता तुम्ही म्हणाल, त्यात काय मोठंसं? पाच वर्षाच्या चिमुरडीपासून ते ऐंशी वर्षाच्या आजीबाई रांगोळी काढण्यात अगदी पटाईत असतात. पारंपारिक पद्धतीच्या ठिपक्यांच्या देवघरातल्या रांगोळीपासून ते आजच्या पद्धतीच्या संस्कारभारतीच्या रांगोळीच्या गालिच्यांपर्यंत घराघरात रांगोळी काढली जाते. पण तुमचा परिचय कदाचित माझ्यासारख्या रांगोळीची एक सरळ रेघही धड न येणार्‍या बाईशी झाला नसावा. जिथे मुलीबायका सहजपणे अतिशय सुबक, देखणी रांगोळी काढून त्यात रंगही भरून एकूणच वातावरण प्रसन्न करतात, त्याही विभागात मला शून्य मार्क! कैक प्रयत्न केले, पण ती दोन ठिपक्यांना जोडणारी पातळ सुबक रेषा काही जमली नाही. आणि अचानक वाळवंटात ओअ‍ॅसिस दिसावा, तसा मार्ग दिसला- निसर्गचित्रांची रांगोळी! सहज म्हणून ही पाटी दिसली आणि चौकशी केली. आधीच सांगितलं की मला अजिबात काहीही येत नाही. पण शिकवणार्‍या बाईंनी तो एक निर्वाळा दिला, की नेहेमीच्या रांगोळीसारखे नाहीये हे काही, त्यासाठी रांगोळी येत नसेल तरी हरकत नाही. मी एक भला मोठा सुस्कारा सोडून नाव नोंदवलं. 

निसर्गचित्रांची रांगोळी हे एक तंत्र आहे. ते तंत्र एकदा जमलं, की कोणत्याही तंत्रासारखंच ते वापरून तुम्ही त्यात अनंत व्हेरिएशन्स करू शकता. सुरूवातीला अर्थातच खूप जड गेलं. बाई जे सांगत आहे, ते मनाला जरी समजत असलं, तरी बोटातून बाहेर पडेना. पण त्यांच्या मृदू प्रोत्साहनामुळे चिकटून राहिले. अर्थात, जे काही ओबडधोबड घडत होतं तेही मलाच इतकं सुंदर भासत होतं, की मी आपोआप त्यात समरस झाले. आणि मग जाणवलं, की एखाद्या कलेत झोकून देणं म्हणजे काय असतं.. एखादा ध्यास लागणं, सतत तोच विचार करणं म्हणजे काय असतं, आणि एखादी कलाकृती आपल्या हातावेगळी, मनावेगळी होणं म्हणजे काय असतं. 

अर्थात, मी अजून जिन्याच्या पहिल्या पायरीवरदेखील नाहीये ह्याची जाणिव अगदी नक्की आहे. पण हा सर्व प्रपंच म्हणजे ट्यूब लावून सहा महिने पोहल्यानंतर पहिल्यांदाच सुट्टं पोहोण्याचा जो आनंद असतो, तशापैकी आहे.

पहिलावहिला प्रयत्न:


 2.

3.


4.


5.पहिलीवहिल्या रांगोळीनंतर तीच रांगोळी माझी स्वत:ची रंगसंगती लावून काढायला जास्त मजा आली. खूप आनंद आणि समाधान लाभले:
10 comments:

Vidya Bhutkar said...

mastach aahet sarv rangolya. :) khupach sundar. Shalet rangoli spardha madhil chitr baghun honaara aanand milala aaj parat.

Keep it up.
-Vidya.

भानस said...

Khoop chaan kadhalyas ga! Dhyasavin Fal nahich.... :)

श्रद्धा said...

mast :) :)

Anonymous said...

Mast :) :)_

poonam said...

mana:poorvak dhanyawaad Vidya, Bhanas, Shraddha aaNi Hindole :)

मोहना said...

निसर्गचित्रांची रांगोळी सुंदर जमली आहे.

Unknown said...

Mast....chaan jamlyat

प्राची कुलकर्णी said...

surekh jamalya aahet rangolya. ekase ek agadi. :)
nehamipeksha vegali tech. aahe ka kahi? agadi chan galiche vatatahet. :)

manju said...

जबरीच बरं का!!

भारी जमतं बॉ एकेकांना :-)

- manjud

Anonymous said...

छानच जमल्या आहेत रांगोळ्या.... आवडल्या !!