September 13, 2007

प्रथम तुज पाहता.. (अंतिम भाग)

--४--

जिंक्यचा मूड पार गेला होता, ऑफिसमधल्या colleagues बरोबर बोलायचीही लाज वाटत होती त्याला.. मनूचा साखरपुडा होऊन ४ दिवस झाले होते, तरीही तो त्या आठवणींतून बाहेर येत नव्हता.. सारखं तेच आठवत होतं.. काय मस्त गायले होते ते.. duets मधे तर perfect understanding होतं दोघांमधे.. जबरदस्त chemistry होती त्यांची.. त्याचं कामात अजिबात लक्ष लागत नव्हतं.. त्याच हरवलेल्या मूडमधे त्याने ऑफिसमधे एक अत्यंत क्षुल्लक चूक केली होती, आणि त्यामुळे निष्कारण penalty भरायला लागणार होती त्यांना.. त्याच्या लक्षातच आली नव्हती ती चूक.. आधी penalty ची demand पाहून चक्रावलाच तो, पण नंतर त्याचं कारण लक्षात आलं त्याच्या आणि इतकं शरमिंदं वाटलं!

सरांनी त्याला केबिनमधे बोलावून घेतलं होतं आणि त्याच्याशी one to one बोलले होते ते.. "अजिंक्य काय झालंय? is everything ok? या अश्या चूका तुझ्याकडून कधीच झाल्या नाहित. You have a spark in you . घरी काही problem आहे का, का अभ्यासाचं टेन्शन घेतलं आहेस? हे बघ, जास्त टेन्शन घेऊ नकोस. अभ्यासाला काही मदत हवी असेल तर सांग, काही reference books हवी असतील तरी सांग. Afterall, I look to you as my future partner! .. अलिकडे कामात लक्षं नाहिये तुझं. असं करू नकोस, just concentrate, ok?

मान खाली घालून अजिंक्य बाहेर आला.. मेल्याहून मेल्यासारखं होत होतं त्याला.. असं कसं झालं आपल्या हातून? शी! कुठे होतं लक्षं आपलं काम करताना? ऋजुता!! ऋजुच्याच विचारात आहोत आपण गेले कित्येक दिवस.. तिच्याशिवाय दुसरं काही सुचत नाहिये.. आधी तो ट्रेक आणि नंतर गाण्याची तयारी, आणि त्या नंतर ती engagement ceremony ! त्यानंतर रोज फोन, sms चालू आहेतच.. काय दिवास्वप्नं पाहिली आहेत आत्तापर्यंत तिला समोर imagine करून.. त्यातूनच अश्या फ़ालतू mistakes होताहेत.. पण ऋजुताचा विचार का करतोय आपण इतका? का?? बास. आता ऋजुताचा विचार करायचा नाही, ती किती सुंदर दिसते, ती किती अप्रतिम गाते, ती कशी आपल्याशी बोलते, ती कशी चिडते, ती कशी फ़ार चांगली मुलगी आहे, तिच्याबरोबर कसं सतत बोलावसं वाटत., ती कशी photogenic आहे, ती कशी........ तिचा विचार करायचा नाही असं ठरवताना इतकं आठवतय, मग विचार करायचा असं ठरवल्यावर तर... ... ... विचार करायचा ऋजुचा? असा वेगळा, मुद्दामहून करता येतो तिचा विचार? ती आहेच ना मनात..

पण मग त्यामुळे अश्या गोच्या होतात ना.. आजची चूक.. definitely not acceptable!! आणि अभ्यास?? किती मागे पडलाय? june attempt मधे पास व्हायचय की नाही? माहिते ना एकदा एखादा रखडला की रखडला.. असं नकोय व्हायला आपल्याला आपल्याबद्दल.. सर चक्क junior partner करायला तयार आहेत, पण मोठ्या कंपनीत जॉब मिळाला तर ते काही नाही म्हणणार नाहित.. आणि बाबा तर म्हणत होते की CA कर पूरक म्हणून, तेही पटलं होतं, लगेच काही जॉबची गरज नाहिये.. CS + CA झालो तर लाईफ़ बन जायेगी.. पण त्यासाठी अभ्यास करायला हवा ना? तोही पूर्ण जोर देऊन.. हे असे ऋजुचे विचार सारखे मनात असतील तर अभ्यास कसा होणार? पण ऋजुचे विचार येतातच मनात.. का? तिलाही असं होतं का? इतकी खळबळ फ़क्त माझ्याच मनात आहे का? ऋजु, हम यहाँ तडप रहे है और क्या आप चैनसे दिन गुजार रही हो? नॉट फ़ेअर यार.. पण तुला मी विचारूही शकत नाही ना की ऋजुता, माझ्या मनात सतत तुझे विचार असतात, तसेच तुझ्याही मनात माझे विचार असतात का? अजिचं डोकं बधीर झालं. काहीच सुचेना त्याला.. रोग सापडलाय पण इलाज नाही असं झालं त्याचं.. आपल्या मनात ऋजु आहे, पण तिच्या मनात आपण आहोत का हे कळवून घेणं जमणार नाही आपल्याला.. त्यापेक्षा आपण अभ्यास करावा हे उत्तम. सध्याचा अभ्यासाचा बॅकलॉग पूर्णं केला की पुन्हा यावर विचार करू. आणि ऋजु काही लांब नाहिये.. बोलतोय की आपण तिच्याशी रोजच! हे इतकं ठरवल्यानंतर अजिला बरं वाटलं थोडं.. मनातल्या मनात त्याने सरांना पुन्हा सॉरी म्हणलं. अशी चूक पुन्हा करणार नव्हता तो.

मग रूटीन सुरू झालं अजिंक्यचं.. सकाळी- रात्री अभ्यास, reference books, case laws वाचणं, पेपर्स बघणं, मधल्या काळात ऑफिसातली कामं, संध्याकाळी मित्रांशी गप्पा, फोन.. ऋजुचे विचार प्रयत्नपूर्वक कमी केले होते त्याने. पण जमत नव्हतं ते नीट.. त्रास व्हायचा फ़ार.. तिच्याशी आता अगदी रोज बोलणही व्हायचं नाही.. एक-दोन दिवसांनी फोन व्हायचे.. पण कितीही नाही म्हणलं तरी तिच्याशी बोलल्यावर खूप छान वाटायचं अजिंक्यला.. असं वाटायचं की काय वेडेपणा आहे हा आपला, वेडेपणा कसला, चक्क पळपुटेपणा आहे.. तीपण नाराज वाटायची.. 'अलिकडे बोलत नाहीस माझ्याशी' असं म्हणाली होती.. पण त्याने अभ्यासाचे कारण सांगितल्याबरोबर तिला पटलं होतं. तिलाही अभ्यास होताच तिचा.. किती mature होती ना ऋजु.. किती चांगली होती ती.. तोच मूर्ख होता.. त्यालाच अभ्यास आणि तिची मैत्री balance करता येत नव्हती.. अजिच्या मनातले उलट सुलट विचार काही कमी झाले नव्हते, पण तरी अभ्यासाची आठवण झाली की सगळं मागे ठेवावं लागत होतंच.

कसाबसा महिना उलटला... अजिंक्यचा अभ्यास मार्गाला लागला, ऑफिसचं कामही ठीक सुरु होतं, पण मनाला चैन पडत नव्हतं.. नक्की काय होत होतं त्यालाच समजत नव्हतं.. सारखी कसलीतरी अस्वस्थता जाणवत होती.. शेवटी त्याने ऋजुताला भेटायचं ठरवलं.. तिला फोन करून वैशाली मधे बोलवलं. तीही लगेच हो म्हणाली.. संध्याकाळी तिच्या आधी पोचला तो वैशालीपाशी.. थोड्या वेळानी आली ती. तिला पाहूनच त्याला खूप बरं वाटलं..
"हाय!"
"हाय! कसा आहेस?"
"ठीक, तू कशी आहेस? अभ्यास कसा चालू आहे?"
"अभ्यास काय, ओके.. मला काही तुझ्याइतका अभ्यास नसतो काही.. चालू आहे थोडा थोडा.. तुझा अभ्यास कसा चालू आहे?"
"चालू आहे. आता गाडी मार्गाला लागली असं वाटतय. टफ़ आहे गं, आत्तापासून अभ्यास केला नाही तर खरं नाही, वाट लागेल.."
"हो, माहिते. कसा इतका अभ्यास करवतो तुम्हाला कोण जाणे.. मला तर बोर होतं.. "
"असं कसं? हेच करीयर आहे म्हणल्यावर करायला लागणारच ना.. आणि मला आवडतात पण सगळे विषय.. आता गाण्याचा अभ्यास करताना तुला बोर होतं का कधी?"
"हं, तेही आहेच. तुला माहित्ये मला कधी कधी वाटतं की मी गाण्याच्या मागे इतकी मेहनत घेते ती बरोबर आहे की नाही?"
"म्हणजे?"
"म्हणजे मला गाण्यातच interest आहे. M.Com करत्ये मी, पण मला ते करून काही accounts किंवा taxation मधली नोकरी नाही करायची.. मी गाण्यातच रमते जास्त. रागांची ओळख, त्यांचा रियाझ, वेगवेगळ्या बंदिशी.. गुरुजींकडे तर अक्षरश: खजिना आहे माहितीचा, ज्ञानाचा.. तर माझं बरोबर आहे ना की चूक? स्टेज शोज, competitions मधे भाग घेणं नाही आवडत मला.. गाण्याचं commercialisation च पटत नाही मुळात.. आपल्या आनंदासाठी गावं आणि दुसर्‍यांना गाणं शिकवावं हेच आवडतं मला.. पण अजिंक्य am I having a wrong attitude? "
"wrong attitude? what about? अजिबात नाही.. चकचकाटाला न भुलता केवळ गाणं शिकणं किती जणांना जमतं ऋजुता? आपल्या कलेचा निखळ आनंद घेणं किती जणांना शक्य होतं? I am proud ऋजुता की तू असा विचार करतेस.. आणि नुसता विचारच नाही करत, तर कृतिही करतेस.. तुझं काहीच चुकत नाहिये, be assured about it .."
" oh thanks अजि.. किती बरं वाटलं तुझ्याशी बोलून. नाहितर अश्या मनातल्या insecurities generally मी सांगत नाही कोणाला.. पण तुझ्याशी share करायला काही हरकत नाही असं वाटतं मला कायमच!"
" The pleasure is all mine ma'm ! आता मागे नाही का मी तुला पकवलं होतं मला सर बोलले आणि माझा अभ्यास मागे पडला होता तेव्हा.."
"ए, पकवलं कुठे? तेव्हा तर तू फ़ारच अपसेट झाला होतास.."
"पण तू नीटपणे ऐकून घेतलस माझं गं.. it was so important for me at that time !!"
अजि एकदम गंभीर झाला..
"ऋजुता even I feel very comfortable talking to you .. असं वाटतं की मी काहीही बोलु शकतो तुझ्याशी.. अगदी तुला पाहिल्यापासूनच त्या ट्रेकला.. नाहितर आपली ओळख अशी कितीशी आहे? १-२ महिने? आत्ता अभ्यास म्हणून आपण गेले काही दिवस बोलत नव्हतो तर मला कसंतरीच व्हायचं, माहिते? वाटायचं की सगळं टेन्शन तुझ्याबरोबर शेअर करायला हरकत नाही.. I dont think मी माझ्या करीयर विषयी अजून कोणाशी बोललो असेन.. म्हणजे मित्र आहेत, पण त्यातल्या insecurities मी सांगायला लागलो त्यांना तर खिल्लीच उडवतील माझी.. आणि कधीकधी हे pressure unbearable होतं गं.. आई-बाबा पण relate करू शकत नाहित त्याच्याशी.. उलट ते काळजीत पडतात.. मग मी त्यांना काही सांगतच नाही.."
"सेम अजि.." ऋजुता हसली.. "सेम. मलाही असच होतं.. हे मी गाण्याविषयी बोलले ना तुला आत्ता ते कधीच कोणाशी बोलू नव्हते शकले.. माझ्या आईबाबांना तर वाटतं की हा छंद आहे आणि मी तो छंदापुरताच ठेवावा.. हे असं full time गाणं करणं त्यांना नाही आवडणार. मग असं वाटलं होतं की माझे विचार बरोबर आहेत ना की चुकीचे, कोणी समजून घेऊ शकेल का माझी बाजूही? पण का कोण जाणे असंही वाटलं होतं की तुला नक्की कळेल.. somehow never had a doubt about you !"
"आयला.. गंमतच आहे!"

दोघही एकमेकांकडे पाहून हसले.. आणि दोघांनाही काहीतरी जाणवलं.. क्षणभर शांतता पसरली..

"ऋजु, I don't know how to say this.... पण तू असशील का अशी नेहेमीच माझं सगळं ऐकून घ्यायला? can I hope that you'll be always around ?"
"अजि, मला आवडेल, खूप आवडेल.. कारण मलाही कोणीतरी हवं आहेच ना माझं मन मोकळं करायला.. an Agony Uncle!! "
दोघही पुन्हा हसले..
"अजि, पण आपण काही conclude करायला नको आत्ताच आणि इतक्या घाईघाईनी.. प्लीज! let's not take anything for granted . समजतंय तुला मला काय म्हणायचय ते? आपली मैत्री अगदी नवी आहे, आणि सध्या आपल्या करीयर्समधेही major decisions घ्यायला लागत आहेत आपल्याला.. सगळंच कन्फ़्यूजन आहे.. सो ते sort out करायलाच महत्त्व देऊया सध्या.. आपले सूर एकमेकांशी perfect जुळतात, पण त्या पलिकडे जाऊन आत्ता लगेचच काही विचार करूया नको.. इतक्या लगेच, इतक्या झटपट तर नकोच.."

अजिंक्य एक मिनिट गप्प झाला. त्याला पटलं ऋजुताचं बोलणं..
" agreed ऋजु! you are such a good thinker ! खरंच, इतकी टेन्शन्स आहेत आसपास की ती clear करणं ही priority आहे. maybe, in the coming few months पुष्कळ गोष्टी आपोआप क्लीयर होत जातील.. सगळं काही आत्ताच, याच वेळी ठरवलं पाहिजे असं नाही.. पण या सर्व काळात I hope आपण एकमेकांशी सगळं काही बोलायला, शेअर करायला असू, राहू. मी खूप जास्त expect करतोय का?"
"नाही अजि.. तुला कळलं, पटलं.. you got the point , अजून काय हवं?"
"मग? लगेच कळलं की नाही? आहेच मी हुशार.. अगदी लहानपणापासूनच!"
"हो? खरं की काय?"
"आणि मला माहिते की तू खूप खूप चांगली आहेस.."
"हो का? हे आणि कधी समजलं म्हणे आपल्याला?"
"अर्रे! बस क्या.. लग्गेच कळलं मला.. अगदी प्रथम तुज पाहता.."
"अं?"

दोघंही खळखळून हसले!


समाप्त!

8 comments:

HAREKRISHNAJI said...

कथा खुपच भावली

Abhijit said...

sunder katha! ekhadya diwaLi ankala pathawoon de..kharach..no jokes:-)

Harshad said...

Apratim! ekdum aavadala, shevatacha bhag sudhha!
Jabardast ch.

संदीप चित्रे said...

kathaa khoopach chhan jamalee aahe. You have a nice and simple style of writing. Keep it up.

Anonymous said...

खूप छान लिहिता तुम्ही. इथे अमेरिकेत मराठी पुस्तके वाचायला मिळत नाहीत. अशा वेळी चांगल्या ब्लॉग्जचा खूप आधार वाटतो. गेले दोन दिवस एकहाती सगळ्या कथा वाचल्या तुमच्या. आज दीर्घकथा वाचायला बसले पण इथे दोनच कथा दिसत आहेत. त्यातली मंगळागौर आधीच वाचली आहे. उरलेल्या कथा कशा आणि कुठे वाचायला मिळतील ?
-एक वाचक, अश्विनी.

पूनम छत्रे said...

अश्विनी, मनापासून धन्यवाद, कथा वाचल्या त्याबद्दल. दीर्घकथा (सध्या तरी) या दोनच आहेत. शक्यतो लघुकथाच लिहीते मी.. दीर्घकथा लिहायचा धीर आणि चिकाटी दोन्ही, थोडं कमी पडतं.. :) तरी, प्रयत्न करेन.
असाच लोभ ठेवा, पूनम

Anonymous said...

अजून चार दीर्घकथा वाचायला मिळणार नाहीत म्हणून निराशा झाली ( दीर्घकथांपुढे सहाचा आकडा दिसत आहे. ) पण मला लघुकथा ही आवडतात ... किंबहुना माझा ओढा त्या कडेच जास्त आहे. तुमच्या सगळ्याच कथा मला आवडल्या ...पण ’स्वीकार’ आणि ’मोकळीक’ या कथा खूप भावल्या. ’स्वीकार’ सारख्या कथेवर तर ’रिश्ते’ मालिकेत एखादा सुंदर भाग बनला असता. ’मोकळीक’ खूप realistic वाटली. असे प्रसंग आणि पात्रं मी खूप घरातून पाहिली आहेत.
या पुढेही अशाच उत्तम कथा वाचायला मिळोत.
-अश्विनी.
ता.क. : मला प्लीज ’अहो’ म्हणू नका :) I'm between 25-30 agegroup :))

Nima said...

पूनम, तुमची ही कथा छानच आहे. पण एक गोष्ट खटकली, अजिंक्यच्या reactions ई, शी अशा येत होत्या. या टिपीकल बायकी रिअॅक्शन्स आहेत. मुलांच्या वाटत नाहीत.