September 12, 2007

प्रथम तुज पाहता.. (३)

--३--

नंतरचे ८ दिवस मात्र वेड्यासारखे fast गेले.. दिवसभर ऑफिसात कसंतरी काम करायचं.. संध्याकाळी जवळजवळ उडतच ऋजुताकडे जायचं, काकू चहा, खायला द्यायच्या, त्यानंतर गाणी.. मस्त romantic गाणी शोधून काढली होती ऋजुनी.. मग प्रॅक्टीस.. गाण्याबरोबर ऋजु harmonium पण घ्यायची बरोबर सूर लावायला.. काय सुंदर दिसायची तेव्हा.. तल्लीन होऊन गाणं म्हणायची अगदी.. अजिंक्य बरेचदा नुसतं पहातच रहायचा तिच्याकडे. त्याचा आवाज चांगलाच होता.. आणि मनापासून मेहनत घेतही होता तो.. गाणी मस्त बसली त्यांची.. त्याच बरोबर नवीन रोल आणले होते, कॅमेरा साफ़सूफ़ करून ठेवला त्याने.. सलवार कुडता ड्रायक्लीन केला होता.. आधी नेहेमीची शर्ट-पँट घालणार होता.. पण शर्ट-पँट म्हणल्यावर ऋजूनी इतक्या जोरात 'ईऽऽऽ' केलं की अजिनी लग्गेच कॅन्सल केला तो ड्रेस.. ती म्हणली traditional घाल.. तो म्हणला बरं! तिचं सगळच ऐकत होता ना सध्या..

मग उजाडला साखरपुड्याचा दिवस. मनू हायपर झाली होती. सकाळपासून फोन चालू होते. समारंभ ६ ला सुरु होता, पण मनूनी अजिला ४ पासूनच बोलावले होते.. 'तू झोपा काढशील, फोटोंचं विसरशील, माझे फोटो यायचेच नाहीत' असलं काही बडबडत होती आणि त्याला छळत होती..एरवी अजि बोअरच झाला असता, पण ऋजुताही तिथेच असणार होती, त्यामुळे तो खुश होता.. धडपडत बरोब्बर ४ला मनूकडे पोचला तो, तर मनू कुठे तयार होती? घरभर लोकच लोक होते. ऋजुही आली नव्हती.. अजिंक्यला काय करावे कळेचना एकदम. मनूनी त्याला लांबूनच 'आलास का, थांब रे, आलेच' केले. तो मग गॅलरीत जाऊन उभा राहिला. कॅमेरा ठीकठाक आहे ना पाहिलं आणि संध्याकाळची गाणी गुणगुणायला लागला.

इतक्यात ऋजुता आली. तिला पाहिल्याबरोबर अजि खुलला.. पण तिनी चक्क जीन्स घातली होती. मला traditional dress चा आग्रह आणि ही चक्क जीन्स मधे??? नॉट फ़ेअर यार!! ती वर आल्या आल्याच अजिनी तिला गाठलं..
"हाय! तू अशी येणार आहेस?"
"अशी? हां.. जीन्स मधे? नाही रे.. ही भली मोठी बॅग पाहिलीस ना? साडी नेसणार आहे, पण नंतर.. आधी मनूची तयारी करायची आहे ना, म्हणून आत्ता जरा सुटसुटीत.. तुला काय वाटलं, तुला traditional dress घालायला सांगून मी अशी येईन? आपण गायला बसू तेव्हा किती विचित्र दिसेल ते? बरं पुन्हा गाऊन पाहिलस ना सगळं? मी तर तेच गुणगुणतीये सारखं! आणि हे कागद ठेव.. २ कॉपीज आहेत.."

अजिंक्य impressed .. family function साठी इतकी तयारी? त्याने मान डोलावली फ़क्त. थोड्या वेळानी झाली एकदाची मनू तयार! मेकप, साडी.. पन्नास वेळा 'सगळं ठीक आहे ना?', 'मी कशी दिसतीये?' विचारत होती. अजिनी तिचे फोटो काढले.. मग कार्यालयात जायचा गोंधळ.. कोण, कोणाबरोबर, आधी कोण, नंतर कोण, घराला कुलुप कोण लावणार इत्यादी.. शेवटी असं ठरलं की ऋजुता आणि मनूचा भाऊ शेवटी येतील.. बाकी सगळ्यांनी पुढे जायचं, अजिंक्यनी सर्वात आधी.. hall चे फोटो, 'ते लोक' येतील तेव्हाचे फोटो.. मनू आणि तिच्या नवर्‍याचे एकत्र फोटो.. अजिंक्य बिझी झाला.. तो पुढे गेला हॉलवर..

हळुहळू समारंभाला सुरुवात झाली.. मग तर त्याला इकडे तिकडे बघायला वेळच नाही मिळाला.. अचानक त्याला ऋजुता दिसाली.. Oh my God!! केवळ सुरेख! मरून रंगाची साडी, त्यावर सोनेरी embroidery , तसेच दागिने, भरपूर बांगड्या, केस मोकळे.. simply beautiful ! अजिंक्यचं लक्ष पुन्हा उडालं.. तिचा फोटो काढायचाच, पण या वेळी तिला सांगून! every free moment त्याचे डोळे ऋजुताला शोधत होते.. ती कशी मनूला मदत करत होती, हसत होती, लोकांना भेटत होती, त्यांच्याशी बोलत होती.. actual साखरपुडा झाला, अंगठ्या घातल्या, पेढा भरवला.. अजिचं काम संपलं. तो तसा मोकळा झाला.. त्याने ऋजुला हाक मारली..
"छान दिसत आहेस."
" Thanks.. तुलाही सलवार कुडता चांगला दिसतोय.. बरं झालं माझं ऐकलस.. "
"तुझा फोटो काढू?"
"अं?"
"नाही, आज साडीत छान दिसत आहेस... आता माझं काम पण संपलं आहे, रोल शिल्लक आहे अजून, म्हणून विचारलं"
"बरं काढ की.. actually मला जरा complex च येतो फ़ोटोबीटो म्हणजे.."
" complex ?? बरी आहेस ना? इथे उभी रहा, आणि be natural .. उगाच खोटं हसू नकोस, just camera कडे पहा.. ओके, perfect ! झाला. अजून एक? ही घे, या खुर्चीवर बस.. relax yaar.. tension नही लेनेका.. बास.. माझ्याकडे बघ, एक छोटं स्माईल प्लीज.. हं! झालं! छान आले फोटो.."
"तुला काय माहित?"
"अरे फोटोग्राफर आहे मी, मला कळतं कोणते फोटो चांगले येतील ते.."
"त्यावरून आठवलं.. ट्रेकचे फोटो शेवटपर्यंत दाखवलेच नाहिस.."
"अरे सॉरी.. आता हे आणि ते एकदमच दाखवीन, चालेल?"
"बरं, तिकडचे लोक ओके आहेत आपल्या प्रोग्राम बद्दल.. मनूनी राजीवला विचारलं.. सगळे बाहेरचे लोक गेले की सुरू करू आपण.. मी harmonium पण आणला आहे.."
"तू म्हणशील तसं.. मी तयार आहे..पण मला जरा tension च आहे.. मी असं कधी लोकांसमोर गायलो नाहिये गं.. आपल्या मित्र मैत्रीणींमधे ठीक आहे.. हे असं म्हणजे.."
" tension कसलं घेतोस? छान गात आहेस.. आणि आपण प्रॅक्टीस केलीये ना.. छान होईल सगळं, be confident ! "
"ok, whatever you say !"

प्रोग्रॅमला सुरुवात झाली.... ऋजुतानी थोडंसं निवेदन केलं.. थीम अशी साधारणपणे होती की मनू आणि राजीव यांचा नुकताच साखरपुडा झाला आहे, आणि आता राजीव लगेच US लाही जाणार आहे, तर या पार्श्वभूमीवर जर त्यांनी एकमेकांसाठी गाणी गायली तर ती कोणती असतील..

सुरुवातच ऋजुनी "जीवनात ही घडी अशीच राहुदे"नी केली.. मग अजिंक्यनी "धुंदी कळ्यांना, धुंदी फ़ुलांना, शब्दरूप आहे मुक्या भावनांना" गायलं.. दोन्ही आवडली सगळ्यांनाच. मग ऋजुनी गायलं "प्रतिमा उरी धरूनी मे प्रीति गीत गावे".. त्यावर अजिचं "लाजून हासणे अन हासून ते पहाणे" झालं.. मग दोघांचही "प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं/ प्रिया उगाच संशयात मी बुडाले रे" झालं.. हेही खूपच आवडलं.. मग थोडा खेळकर मूड अजून extend करण्यासाठी ऋजुनी "ये लडका हाये अल्ला कैसा है दीवाना" म्हणलं. यावर अजिनी एकदम "एक लडकी को देखा तो ऐसा लगा" सादर केलं.. त्यांच्या लिस्ट मधलं शेवटचं गाणं ओतं "तुमसे मिलके ऐसा लगा तुमसे मिलके अरमाँ हुए पुरे दिलके.." दोघांचेही आवाज छान लागले होते, आणि एकमेकांना पूरक गात होते. सगळ्यांनाच यांची गाणी इतकी आवडली की 'अजून अजून' ची demand आली.. ऋजूताला अपेक्षित होतं आणि ती तयारही होतीच.. "चांदण्यात फ़िरताना माझा धरलास हात" गायली ती.. काय सूर लागला होता.. आवाज खरच छान होता तिचा..

पण कमाल केली ती अजिंक्यनी!! ऋजुता गायल्यावर तो गाईल असे कोणालाच वाटले नव्हते.. पण त्याने या क्षणासाठीच भरपूर मेहनत घेतलेले आणि बसवलेले "प्रथम तुज पाहता, जीव वेडावला.. उचलुनी घेतले निजरथी मी तुलाऽऽ.." सुरु केले.. सगळेच impressed !! आवाज मस्त लागला होता त्याचा.. जीव ओतून गायला तो.. एकदम perfect ! ऋजुता ऐकतच राहिली..

जेव्हा या गाण्याच्या कार्यक्रमाचं ठरलं तेव्हाच अजिंक्यनी ठरवलं होतं की संधी मिळाली तर हे गाणं नक्की गायचं! ऋजुला प्रथम त्याने पाहिले त्यावेळी हेच गाणे त्याला आठवले होते.. त्या आठवणीची आठवण म्हणून हे गाणं तरी तिला ऐकवायचच..

उपस्थित लोकांनी दोघांचही भरपूर कौतुक केलं.. मनू-राजीव खुश झाले, मित्र मंडळींनी शिट्ट्या वाजवल्या.. एकूण त्यांचा कार्यक्रम successful झाला.. काही वेळानी त्या दोघांना थोडी उसंत मिळाली..

"छान गायलास.. खूपच छान.. आवाज सूट होतो तुझा या गाण्याला.."
" thanks . खरंच आवडलं?"
"अरे म्हणजे काय? खरंच.. एकदम surprise .. कधी बसवलंस? सांगितलं नाहीस.."
"अरे, surprise च द्यायचं होतं.. मग सांगणार कसं? "
"हो? मस्त surprise होतं मग.. आपला कार्यक्रम पण hit झाला एकदम.."
"पूर्ण श्रेय तुला.. आयडीया तुझीच होती.."
"पण तू साथही दिलीस ना.. एकटीचं माझं गाणं बोर झालं असतं!"
"छे, तुझं काहीच बोर होत नाही.."
"अं?"
"काही नाही.."

मग आवरा आवरीला सुरुवात झाली.. मनू राजीवबरोबर बाहेर जाणार होती.. ऋजुच्या घरचे लोकही होतेच, ती त्यांच्या बरोबर जाणार होती.. अजिंक्यही घरी पोचला..

आजची संध्याकाळ अगदी त्याच्या मनासारखी गेली होती.. ऋजुचा अधिकृत फोटो होता त्याच्याकडे, मेहनत घेऊन बसवलेलं गाणं तिला आवडलं होतं, त्यांचा joint program appreciate झाला होता.. आज शांत झोप नक्की लागणार होती त्याला!

क्रमश:

4 comments:

Vidya Bhutkar said...

Sahiiiiiiii....I cant wait to read the next part. Pleaseeeeeeee make it fast. Chaan lihite aahes.Mala katha avadaliy ekdam....Waiting....
-Vidya.

Anonymous said...

Thanks for the treat!
I am a fan of your blog..

poonam said...

thanks vidya, harshad..

shevaTachaa bhaag takala ahe. awadala ka sanga.. :)

Anonymous said...

"छे, तुझं काहीच बोर होत नाही.."
"अं?"
"काही नाही..".......

he jaga jabri aahe:-)